गाव- गप्पा जालना जिल्ह्यात पुनेगाव आहे. माझं आजूळ. माझं बरचस बालपण तिकडे गेलेलं.आईला भाऊ नाही. एक लहान बहिण आजोबा माझ्या जन्माच्या आधीच वारलेले.तसं बघायला गेलं तर पन्नास साठ घराचं हे गाव.या गावाभोवती जी जमीन आहे त्यात मुग,मटकी,भुईमूग,तीळ ही पिकं प्रामुख्यानं घेतली जातात...आज इथे माझं कुणीच नाही.आजी गेली.मावशी संसाराला लागली.नंतर या गावाशी कधी नीट भेट झाली नाही. पण ते आठवत … [Read more...] about गाव-गप्पा| कॉलेज कट्टा
गाव गप्पा
गाव गप्पा
गाव गप्पातेव्हा गावातले उसतोड कामगार सोडले तर कुणी गाव सोडत नव्हतं.उसतोडीचे चारपाच महिने गावातले काही कामगार कारखान्याच्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यात जायचे.पण नंतर परत यायचेही.गावात सगळे लाकं गुण्यागोविंदाने राहत होते.वेळाला मदतीला पुढे यायचे.बलुतेदारी चालू होती.पैसा ही कुणाची गरज बनला नव्हता. हळूहळू चैन करण्याकडे माणसांचा कल जाऊ लागला.गाडी घेणे हे श्रीमंत असण्याचं लक्षण वाटायला … [Read more...] about गाव गप्पा
सायकल| गाव गप्पा| कॉलेज कट्टा
गाव गप्पासायकल… एप्रिल सुरु झाला होता.तेव्हा मी सहावीत असेल.नुकतीच सायकल चालवायला शिकलो होतो.त्यामुळे वार्षिक परिक्षेच्या अभ्यासापेक्षा सायकलची चाक जास्त वेगात पडत होती.ते वयच तसं एखाद्या गोष्टीचा नाद लागला की तो बरेच दिवस लागून राहतो.आमच्या गावात इरफानचं सायकल मार्ट होतं.तिथं भाड्यानं सायकल मिळायची.दिड रुपयात अर्धातास,तिन रुपये घंटा आणि पंधरा रुपये दिले तर आपण सायकल … [Read more...] about सायकल| गाव गप्पा| कॉलेज कट्टा
गाव| गाव गप्पा| कॉलेज कट्टा
गाव| गाव गप्पा| कॉलेज कट्टा मध्यंतरी काय झालं कुणास ठाऊक गाव नकोस वाटायला लागलं लोकांना. त्यांना वाटलं कि गावात राहून काही होणार नाही आपण शहराकडं गेलं पाहिजे. हे खरं होतं कि गावात करावं असं काहीच नव्हतं.नव्याला वाव नव्हता.जगण्यात नाविन्य नव्हतं.शिकायचं म्हटलं की गाव सोडावच लागतं.शिकायला बाहेर पडलं तरी घर आणि घरातली माणसं तिथच असतात. हि गोष्ट ओस पडत चाललेल्या … [Read more...] about गाव| गाव गप्पा| कॉलेज कट्टा
गाव ते गावच| गाव गप्पा| कॉलेज कट्टा
गाव ते गावच| गाव गप्पा| कॉलेज कट्टा गाव गप्पा गावकडे उन्हाळ्याची चाहूल लागली की आम्ही नदीच्या आसपास असणाऱ्या विहीरी शोधत भटकायचो.पोहता येतं हा गैरसमज.मधेच शेतात मोटर सुरु असली की पाणी पिवून ,जरासं सावलीत बसुन परत विहीर शोधायचो.एकदा का विहीर मिळाली की संपूर्ण उन्हाळा आम्ही तिथेच जमायचो.आमचं नेहमीचा कट्टा म्हणजे ती विहीर.मग शेताचा मालक...त्याच्या शिव्या...ओल्या अंगाने … [Read more...] about गाव ते गावच| गाव गप्पा| कॉलेज कट्टा