Navratri information in marathi language नवरात्री विषयी माहिती मराठी मध्ये

नवरात्र म्हणजे काय
“अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो.” नवरात्री आली की घराघरांमध्ये या आरतीचा गजर सुरु होतो. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, अखंड नंदादीप प्रज्वलित करून देवीची, शिवशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय. वर्षातून दोन वेळा नवरात्री साजरी केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत देवीची आराधना करतात. तर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्री म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंतची नवरात्री. नवरात्र हे काम्य व्रत आहे. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज गटामध्ये सोडलेले झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ वाचणे अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते. घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते.
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।। याप्रमाणे देवीची शैलपुत्री,ब्रह्मचारिणी,चन्द्रघंटा,कूष्मांडी, स्कंदमाता,कात्यायनी, कालरात्री,महागौरी,सिद्धिदात्री अशी नऊ रूपे आहेत.
Navratri information in marathi language short essay on navratri in marath
शरद ऋतूच्या प्रारंभी शारदीय नवरात्री येते. यावेळेस पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतातील पिके तयार होत असलेली असतात किंवा काही तयार असतात. नवरात्री हा कृषी लोकोत्सव होता, परंतु पुढे त्याला धार्मिक महत्व प्राप्त झाले. नवरात्री हा परिवर्तनाचा काळ असतो त्यामुळे आपल्याला नवी उमेद निर्माण होते. बृहत्संहिता नुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यवर होत असतो. सृजन हा सृष्टीचा नियमच आहे. नवरात्र हा आत्मिक आणि शारीरिक शक्तीचा व शुद्धीचा काळ मानला जातो.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते. ललिता देवी ही या व्रताची देवता असते.या व्रतात एखाद्या करंडकाचे झाकण देवीचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात. शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात. या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, घारगे, वडे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या अंती घारग्यांचे वायन देतात. रात्रौ जागरण व कथाश्रवण करतात. दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करतात.
पंचमी प्रमाणे अष्टमीला हि तेवढेच महत्त्व असते. या दिवशी महालक्ष्मी व्रत केले जाते. ज्यामध्ये व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी. तिच्या शेजारी सोळा दोरे एकत्र केलेला आणि सोळा गाठी मारलेला दोरक ठेवावा. मग महालक्ष्मीची षोडषोपचारे पूजा करावी. देवीला सोळा प्रकारच्या पत्री व फुले वहावीत. सोळा घारग्यांचा नैवेद्य दाखवावा. पिठाचे सोळा दिवे करून आरती करावी. मग दोरकाची पूजा करून तो डाव्या मनगटात बांधावा. मग सोळा दुर्वा आणि सोळा अक्षता हातात घेऊन महालक्ष्मीची कथा ऐकावी, अशी या व्रतातली पूजा आहे. दुपारी तांदुळाच्या पिठाचा मुखवटा तयार करून तो सुशोभित करून भांड्याच्या उतरणीवर घट्ट बसवला जातो. रात्री त्याच दिवशी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असतो.
विजयादशमी
अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणतात.चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे. दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वही आहे. म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात. रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे.
१८ व्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा केला जाई. दसरा सण साजरा झाल्यावर मराठे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करीत असत.
नवरात्री विषयी माहिती मराठी मध्ये नवरात्र उत्सव मराठी निबंध
Navratri pooja vidhi in Marathi :-
नऊ दिवस देवीची पूजा करण्याची पद्धत
पहिली माळ:- शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ.
दुसरी माळ:- अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.
तिसरी माळ:- निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ|कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.
चौथी माळ:- केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.
पाचवी माळ:-बेल किंवा कुंकवाची वाहतात..सहावी माळ:- कर्दळीच्या फुलांची माळ.
सातवी माळ:- झेंडू किंवा नारिंगीची फुले.
आठवी माळ:- तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.
नववी माळ:- कुंकुमार्चन करतात.
नवरात्रीमध्ये बायका नऊ विविध रंगांच्या साड्यांचा पेहराव करतात. नवरात्री मध्ये काही भक्त नऊ दिवस उपवास पकडतात.
short essay on navratri in marathi
शारदीय नवरात्र काळात नऊ दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजगतात प्रचलित आहे. देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते ते गोंधळी संबळ या वाड्याच्या साथीने देवीची स्तुती असणारी कवने देवीसमोर सादर करतात. या क्लाप्रकाराला गोंधळ घालणे असे म्हटले जाते. भगवान परशुराम यांनी बेटासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शीर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरु झाली असे मानले जाते.
पौराणिक कथा:-
महिषासुर नामक दैत्य राक्षस ब्रह्मदेवाचा मोठा भक्त होता. ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्याने वरदान प्राप्त करून घेतले होते. पृथ्वीवर निवास करणारा कोणताही मनुष्य अथवा देव किंवा अन्य दानव यांपैकी कोणाकडूनही त्याला मृत्यू येणार नाही, असे ते वरदान होते. ब्रह्मदेवांकडून वरदान घेतल्यावर महिषासुर अहंकारी झाला. तीनही लोकांवर विजय मिळवून तो क्रूरकर्मा बनला आणि सर्व ठिकाणी हाहाःकार माजवू लागला. अवघ्या काही काळातच तीनही लोकांत महिषासुराची दहशत पसरत गेली. महिषासुर दैत्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवतांनी दुर्गा देवीचे आवाहन केले. देवीच्या या शक्ती रुपाचे महिषासुरासोबत तब्बल नऊ दिवस युद्ध झाले. प्रचंड आणि भयंकर युद्धानंतर दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला. यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरे करण्याची परंपरा सुरू झाली, अशी पुराण कथा असल्याचे सांगितले जाते. याच प्रमाणे अजून एक पौराणिक कथा नवरात्री बाबत प्रचलित आहे.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी रावणावर विजय मिळावा, यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. श्रीरामांनी नऊ दिवस देवीचे पूजन, नामस्मरण, आराधना केली होती. श्रीरामांनी केलेल्या पूजनाने भगवती देवी प्रसन्न झाली आणि श्रीरामांना लंका विजयाचा शुभाशिर्वाद दिला. यानंतर दहाव्या दिवशी रावणाचा युद्धात वध करून लंका विजय साध्य केला. या दिवसाला विजयादशमी म्हणून पुढे ओळखले गेले. अशी एक पुराण कथा असल्याचे सांगितले जाते.
यंदा अधिक महिना आल्यामुळे नवरात्र पितृपक्षापासून एक महिना लांबणीवर पडले. आपल्याकडे अधिक महिना आधी येतो आणि नंतर नियमित म्हणजेच निज महिना. निज अश्विन शुद्ध प्रतिपदा शनिवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी असून, या दिवशी घटस्थापना करून नवरात्रारंभ होईल. यंदा नवरात्राचा कालावधी आठ दिवसांचा असून, २५ ऑक्टोबर २०२० रोजी नवरात्राची सांगत होईल.
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो
उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||
अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र – जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो
ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||
द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो
उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ ||
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो
अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||
चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो
उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो
भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो
अर्ध पाद्य पूजेने तुजला भवानी स्तवती हो
रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो
आनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ ||
षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो
घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||
सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो
तेथे तु नांदशी भोवती पुष्पे नानापरी हो
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडता झेलुन घेशी वरचेवरी हो || ७ ||
अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||
नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो
सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणा तृप्तता केले कृपे करुनी हो || ९ ||
दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो
सिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो
शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||
या आरतीमध्ये संपूर्ण नवरात्रीचे सार आहे. ज्यामुळे या आरतीला नवरात्रीमध्ये महत्त्व आहे.
–गौरी डांगे.
मित्रांनो नवरात्री उत्सावा बद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा.
Navratri upvas information in Marathi Navratri festival information in marathi language
Navratri information in marathi language short essay on navratri in Marathi Navratri pooja vidhi in Marathi avratri fast information in marathi
नवरात्री विषयी माहिती मराठी मध्ये नवरात्र उत्सव मराठी निबंध
Leave a Reply