
Ram Navami festival Information in Marathi Language
श्री गणेशाय नमः||
अस्य श्री रामरक्षास्तोत्रमन्त्रस्य |
बुधकौशिक ऋषि: |
श्रीसीतारामचंद्रोदेवता |
अनुष्टुप छन्दः |
सीता शक्तीः |
श्रीमद्हनुमान् कीलकम् |
श्री सीतारामचंद्रप्रित्यर्थे जपले विनीयोगः ||
बुधकौशिक ऋषींकडून रचलेले हे राम रक्षा स्तोत्र रामाच्या भक्तीचा मार्ग दाखवते. त्याचप्रमाणे भगवान रामाच्या प्रसन्न तेला आपण पात्र ठरतो. ह्या स्तोत्रांमधे धून आपण भगवान रामाचे स्मरण करू शकतो.
रामाने रावणाचा वध केल्यानंतर जेव्हा त्याचा वनवास संपवून तो अयोध्येत परतला तेव्हा अयोध्यावासी यांनी आनंदाचे प्रकटीकरण करण्यासाठी दारोदारी गुढी उभारल्या अशी अख्यायिका आहे. गुढीपाडवा ते रामनवमी घरोघरी राम लीलांचे पारायण गीतरामायणाचे वाचन केले जाते. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध नवमी हा नवरात्राचा नववा दिवस आहे. याच तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार रामाचा जन्म झाला. हा सोहळा दुपारी बारा वाजता साजरा केला जातो. भगवान रामांना केवडा चंपा चमेली अन् जाई ही फुले प्रिय आहे.
राम:- राम या शब्दाचा अर्थ स्वयंप्रकाश असा होतो. भगवान राम हे असण्याचा शाश्वत प्रकाशाचे प्रतीक आहेत. राम नवमी ही स्वतःमधील आत्म प्रकाश शोधण्याची संकल्पना म्हणून साजरी करतात.
इतिहास:- भगवान रामाचा जन्म कौशल्याच्या पोटी अयोध्या (अजय अशी) नगरीमध्ये झाला. अयोध्या नगरी चा दशरथ राजाला तीन राण्या होत्या.परंतु त्याला संतान असल्यामुळे तो राज्याच्या भविष्य बाबतीत खूप व्यथित होता.राज्यात वशिष्ठ ऋषी आल्यावर त्यांनी राजाला महर्षी ऋष्यशृंग यांना बोलावून पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचे सुचवले.जत्न केल्यावर जगन ईश्वराने दिलेली खीर तीही राण्यांनी खाल्ली व चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी राणी कौशल लेणे रामाला त्रिकेने भरत वसू मित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला. हाच तो दिवस.
रामाचा अवतार अधर्माचा नाश करून धर्म प्रस्थापन करण्यासाठी झाला होता.राम हा दयाळू बुद्धिवान शांत सत्यवाणी बोलणारा असल्यामुळे तो सर्वात प्रतिभावान ठरला.
राम नवमी की खूप उत्साहाने व आनंदाने भारतात साजरी केली जाते.या दिवशी उपवास धरल्यास आत्मा पवित्र होतो व तुमच्या मनातील दुष्ट भाग निखळून पडतो.
राम नवमी पूजेचे विधी:- पहाट प्रहरी उठून शुचिर्भूत व्हावे. पूजेची सामग्री तयार करावी. प्रसादा स्थिर हा रामाचा प्रिय नैवेद्य आहे. तुळशीपत्र व कमळ हे फुल या पूजेत महत्त्वाचे ठरतात. षोडशोपचार पद्धतीने रामाच्या मूर्तीची मनोभावे पूजा करावी. पूजा करताना मूर्तीला अनामिकेने गंध लावावे,प्रथमतः हळद अन् नंतर कुंकू उजव्या हाताच्या अंगठा-अनामिका यांच्या चिमटीत घेऊन मूर्तीच्या चरणांवर वहावे.
राम नामाचे तीन वेळा उच्चारण हे हजार देवांच्या नामांचे उच्चारण करण्याच्या बरोबरीचं आहे. अयोध्या वर रामाने 11000 वर्षे राज्य केलं त्यालाच राम राज्य म्हणून ओळखलं जातं.रामाचे राज्य सैनिक सदैव व आपल्या संसारात नाण्यासाठी त्यांच्या मूल्यांचा आदर करणे महत्त्वाचे ठरते. विवेक-संयम- प्रेम निष्ठा ही रामराज्याची सुखी मुले होती.ही मुले आचरणात आणल्यास त्या व्यक्तीला विजय प्राप्त होतोच हे आपल्याला अयोध्या राम मंदिर घटनेवरून दिसून आले आहेच.
भगवान विष्णू प्रसन्न करून घेण्यासाठी पण साप अवतारांचे मूल्य आचरणात आणणे म्हणजेच त्यांच्याकडून वर प्राप्त करून घेणे आहे. तरीही या रामनवमीला या सगळ्या विचारांचे पालन करून ही राम नवमी आनंददायी बनवावी.
२०२० राम नवमी तिथि:-
५ एप्रिल २०२०(इंग्रजी महिना)
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाचा नववा दिवस.
–गौरी डांगे.
मित्रांनो, Ram Navami festival Information in Marathi Language Ram Navami essay in marathi
राम नवमी माहिती निबंध मराठी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या वेबसाईटला सबस्क्राईब करा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply