Gudi padwa festival Information in Marathi language.
Gudi padwa festival Information in Marathi language गुढी पाडवा सणाचे महत्व. गुडी पाडवा माहिती.
गुढीपाडवा हा हिंदू सण आहे. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यात याला उगादी म्हणतात. हिंदू सणामधील गुढीपाडवा हा महत्वपूर्ण सण असून तो हिंदू सालाप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. मित्रांनो आज आपण गुढीपाडवा या आवडीचा सणाबद्दल माहिती कॉलेज कट्टा वर घेऊयात (college catta)
गुढीपाडवा या दिवशी मराठी सालाचे नवीन वर्ष सुरु होते. याबरोबरच साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी आपण कोणतेही शुभकार्य करतो. जसे मोठ्या वस्तू खरेदी करणे, व्यवसाय, उद्योगाची सुरवात करणे, नवीन संकल्प ई.
गुढीपाडवा कसा साजरा करतात. How to celebrate gudi padwa in Marathi Gudi padwa festival Information in Marathi language.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण सकाळी सूर्योदयापूर्वी मुखशुद्धी नंतर कडू निंबाचे पान तोंडात चघळतो. शुद्धी साठी. स्नान करताना कडू निंबाची पाने आंघोळीचा पाण्यात टाकली जातात. कारण उन्हाळा सुरु होतो. यात आपल्या त्वचेचे त्वचा रोगांपासून संरक्षण होण्यासाठी. याच प्रमाणे लहान मुलांना उन्हाने तापलेल्या पाण्यापासून अंघोळ घालतात.
गुढी उभा करण्याची जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढली जाते.
उंच बांबूची काठी स्वच्छ धुऊन त्यावरती साडी किंवा रेशमी वस्त्र टोकावर परिधान करतात. तांब्याचा किंवा चांदीचा कलशाने साखरेची गाठी, कडू निंबाची डहाळी, आंब्याची पाने, तसेच फुले एकत्र बांधून पाटावरती गुढी उभारली जाते. गुढीची पूजा केली जाते.
साखरेची गाठी मित्र परिवाराला वाटली जाते. सार्वजन तोंड गोड करतात.
सूर्यास्त झाल्यानंतर गुढीला नैवद्य दाखऊन गुढी खाली उतरवली जाते.
आपण गुढी पाडवा सण का साजरा करतो ? या मागे वेगवेगळी कारणे आहेत.
why we celebrate gudi padwa in marathi language
गुढी का उभारतात. प्रभू श्री रामांनी चौदा वर्षाचा वनवास पूर्ण केला. लंकापती रावणाचा पराभव केल्यानंतर ते अयोध्याला परत आले. त्यांचे स्वागत लोकांनी विजयी गुढी उभारून केले होते.
शकांचा पराभव करण्यासाठी शालिवाहन या कुंभाराच्या मुलाने सहा हजार मातीचे पुतळे तयार केले व प्राण फुंकून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला ही आख्यायिका पूर्वापार प्रचलित आहे. पुढे याच शालिवाहन नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाले. असा गुढीपाडवा इतिहास आहे. Gudi padwa festival Information in Marathi language
गुढी पाडवा या मराठी सणाबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली हे प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा. गुडी पाडवा . essay on my favourite festival gudi padwa in marathi
makar sankranti che mahatva in marathi .
Leave a Reply