मोबाईल वापरासाठी किती वेळ द्यायचा त्यावर कोणती माहिती वाचायची बघायची याबद्दल समज आणि शिस्त समाजात पसरवणे गरजेचे आहे. मोबाईल अॅडीक्शऩ केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. लहान मुले आणि तरुण यात भरकटत चालले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मोबाईल शाप की वरदान जाणून घ्या मोबाईल चे फायदे तोटे

आज एकविसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञान खूप सुखकारक झाले आहे. मानवाचा जस-जसा विकास झाला, विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर नव-नवीन तंत्रज्ञान विकसित झाले. अश्मयुगीन काळात शिकार करण्यासाठी अश्मयुगीन मानवाने बनवलेली हत्यारे असतील, सुरवातीला दगडाची, नंतर धातूची…
आज याच विकासाच्या टप्प्यातील एक तंत्रज्ञान, साधन म्हणजे मोबाईल. आजच्या स्मार्टफोन मोबाईलच्या विकासाची सुरवात शोधण्यासाठी आपल्याला टेलेफोने आणि बिनतारी संदेशवहन त्याचप्रमाणे संघणकाच्या विकास कसा झाला याचा अभ्यास करावा लागेल. संगणकाचा इतिहास वाचण्यासाठी क्लिक करा. मी हे का सांगतोय कारण तंत्रज्ञान म्हणजे काय हे समजून घेण गरजेचं आहे. तंत्रज्ञानाची निर्मिती मानव का करतोय? हे समजून घेतल्यावरच त्याचा चुकीचा किंवा बरोबर वापर कसा असू शकतो हे समजेल. पण याच बरोबर प्रत्येक तंत्रज्ञानाचा चुकीचा किंवा बरोबर वापर करणं हे आपल्या म्हणजे मानवाच्या हातात आहे.
आज मोबाईल हे दळणवळणासाठी गरजेची वस्तू आहे. मोबाईलचा वापर फोन कॉल करण्यासाठी, मेसेज पाठवण्यासाठी केला जातो. संदेशवहन करण्यसाठी मोबाईलचा वापर केला जातो. या मोबाईल क्षेत्रात उत्क्रांती केली ती इंटरनेटची सुविधा मोबाईलमध्ये उपलब्ध झाल्यानंतर. खरतर आज प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्टफोन पूर्वी स्मार्ट नव्हता. म्हणजे आज आहे तेवढा. कारण त्याच्यात फोन आणि मेसेज करण्या पुरतीच सुविधा होती.
मोबाईल साँफ्टवेअरचा जस जसा विकास झाला, नोकिया, सॅमसंग, अॅप्पल या कंपन्या मोबाईल बनवू लागल्या आणि वेगवेगळ्या सुविधा देऊ लागल्या. आज या सुविधांचा मानव चांगल्या किंवा वाईट गोष्टींसाठी वापर करतो. इंटरनेटचा वापर करून वाँटसॅप, फेसबुकचा वापर करून आपण संदेशवहन मेसेज, पाठऊ शकतो व्हिडीओ, व्हाँईस मेसेज पाठऊ शकतो. महत्वाच्या माहितीचे देवाण-घेवाण करण्यासाठी, नवीन माहिती मिळवण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, विरुंगळा म्हणून याचा वापर केला जातो.
व्हाँटसॅप, फेसबुक मध्ये असलेल्या या सुविधांचा वापर याच्या विपरीत केल्या जाण्याचे प्रमाण खरतर जास्त आहे. चुकीचे फेक मेसेज पसरवणे, यात राजकीय क्षेत्रातील व्यक्तीबद्दल, लोकप्रिय व्यक्तीबद्दल चुकीची, पूर्णपणे खोटी, किंवा त्यांचे उद्दातीकरण करण्यासाठी माहिती, लेख पसरवणे. जाती भेद करणारी, धर्मभेद करणारी, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ अशा प्रकारची समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये वाद पेटवणारी माहिती पसरवणे. अशा प्रकारची स्फोटक माहिती पसरवून काही लोक त्यांचा छुपा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा अश्या पोस्ट खालील कॉमेंट मध्ये दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्या व्यक्तींमध्ये तिढा व्देष निर्माण होऊ शकतो.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपला बहुमुल्य वेळ आपण या सगळ्यामध्ये वाया लावतो. सोशल मिडीयावर किती वेळ वाया लावायचा किंवा कोणत्या गोष्टींसाठी किती वेळ द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी आज ही खूप गंभीर बाब आहे. कारण आज भारतीय नागरिक सरासरी ३-४ तास वेळ सोशल मिडीयावर घालवतात. याच वेळेचा उपयोग त्यांनी स्वताच्या प्रगीतीसाठी केला तर म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी, उद्योग धंदा करणार्यांनी धंदा कसा वाढवा यासाठी यात नवनवीन उपयोगी माहिती मिळवणे. शेतकऱ्यांनी शेतीतील नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यसाठी ई.
युट्युब, तसेच गुगलवर सर्च करून आपण कामा संबधी उपायोगी माहिती मिळऊन आपण आपल्या ज्ञानात भर टाकू शकतो. इंटरनेटवर दोन्ही प्रकारची माहिती उपलब्ध आहे कोणती माहिती घ्यायची हे आपल्या हातात आहे. पण विकासाच्या टप्प्यातील एवढ्या मोठ्या तंत्रज्ञानाचा सुविधेचा जास्त करून चुकीच्या पद्धतीने नको असलेल्या गोष्टी पसरवण्यासाठी वापर केला जातोय हे दुर्दैव आणि वस्तुस्थिती आहे.
या सोशल मिडिया, वेबसाईट, मेल या सुविधांचा वापर करून आपण एकाच वेळी लाखो करोडो लोकांशी संवाद साधू शकतो. आपले मत मांडू शकतो. चांगल्या गोष्टींचा प्रचार करू शकतो. या नवीन माध्यमाची व्याप्ती इतकी मोठी आहे. म्हणून याचा विधायक किंवा विध्वंसक वापर करायचा हे खूप महत्वचे ठरते.
आज मोबाईलवर लहान मुले वेगवेगळ्या गेम तसेच जोक, फोटो काढण्यात टाईम पास करतात. त्यामुळे त्यांचा बहुमूल्य वेळ वाया जातोच, पण त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणते तर मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण घटले आहे. त्यांच्या मनावर ताण वाढला आहे. सतत गेम खेळण्याने आणि जिंकण्यासाठी केलेल्या प्रयत्नाने त्यांचे गमे सोडून इतर महत्वाच्या कार्यांमध्ये लक्ष लागत नाही. सतत विस्फोटक माहिती वाचल्यामुळे वाचकाच्या मनात द्वेष तयार होतो. प्रसंगी तो हाणामारीच्या स्वरूपात उफाळून येऊ शकतो. सतत चाटिंगमुळे समोरासमोरील संवाद कमी झाला आहे. आज घरातील सर्व व्यक्ती एकमेकांबरोबर गप्पा मारण्याएवजी मोबाईलवर बोट घालत बसतात असं चित्र आहे. अश्याप्रकारे मोबाइलचे फायदे आणि तोटे ज्याच्या त्याच्यासाठी वेगवेगळे असू शकतात. पण मुद्दा महत्वाचा हा कि मोबाईलचा वापर कसा आणि किती करायचा यासाठी लागणारी समज आणि शिस्त प्रत्येकाने घालून घेणे गरजेचे आहे. यावरच मोबाइलचे फायदे आणि तोटे तसेच मोबाईल शाप कि वरदान ठरू शकतो.
मोबाईल शाप की वरदान जाणून घ्या मोबाईल चे फायदे तोटे

मोबाईल वापरताना कोणती काळजी घ्याल
- मोबाईल ही देखील एक वस्तू आहे तिला आपल्या जिवापेक्षा जास्त महत्व देऊ नका.
- मोबाईल वापराच्या सवईचे व्यसनात रुपांतर होऊ देऊ नका. उदा- बऱ्याच जणांना चालता बोलता इतर काम करताना देखील मोबाईलमध्ये बघितल्याशिवाय चैन पडत नाही. लग्न किंवा इतर कार्यांमध्ये ज्यावेळेस मित्र आप्तीष्ट एकत्र येतात त्यावेळेस मोबाईलमध्ये मेसेज वाचत बसने, गेम खेळणे किंवा इतर कमी महत्वाच्या गोष्टी करणे हा प्रकार चुकीचा आहे. यामुळे समोर असलेल्या जिवंत माणसांबरोबर बोलण्याची, संवाद साधण्याची संधी आपण गमावतो. आणि बऱ्याच अंशी आभासी असा संवाद फोन वरील व्यक्तीबरोबर करतो. हे टाळावे.
- मोबाईल वापराचे तास ठरऊन घेणे आणि तेवढा वेळच मोबाईल वापरणे.
- मोबाईलमध्ये जास्त वेळ गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ- खोको, कब्बडी, बॅटबीन्टन, होलीबॉल, क्रिकेट ई खेळ खेळावेत.
- फोनवर चाटिंग करण्यापेक्षा समोरा-समोर संवाद साधावा. यातून बोलत असलेल्या व्यक्तीबरोबर जवळीक तयार होते. मोबाईल चाटिंग मधला आभासी पणा त्यामध्ये नसतो. यातून संभाषण कला वाढते.
- Read more
मित्रांनो मोबाईल शाप की वरदान जाणून घ्या मोबाईल चे फायदे तोटे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा. अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा college catta या वेबसाईट ला पुन्हा नक्की भेट द्या. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
-कॉलेज कट्टा टीम.
Leave a Reply