संगणकाचा इतिहास संगणकाचा पिढ्या माहिती जाणून घ्या. मुळात संगणक या शब्दाचा अर्थ हिशोब करणारी मशीन असा आहे. आजच्या आणि सुरवातीच्या संगणकात जमीन आसमानाचा फरक आहे. History of Computer Sanganakacha Itihas Information in Marathi Language.
मित्रहो, आज आपण वेगवेगळे काम करण्यासाठी संगणक वापरतो. सध्या संगणकामध्ये वेगवेगळे काम करण्यासाठी वेगवेगळी सॉंफ्टवेअर आहेत पण हे सगळ एका दिवसात घडलं नाही त्याला कित्येक पिढ्यांचा इतिहास साक्षी आहे. चला तर जाणून घेऊयात संगणकाचा विकास कसा झाला.
History of Computer Sanganakacha Itihas Information in Marathi Language
1st to 5th Generation of Computer information Pdf in Marathi Language
इसवी सन पूर्व,अबँकस नावाचे उपकरण बेबिलोनिया येथे हिशोब करण्यासाठी वापरले जाई. अबँकस हे लाकडी चौकटीत प्रत्येक वोळीत वेगवेगळ्या संख्येचे मनी असतात.
संगणकाचा शोध कोणी लावला ?
संगणकाचा इतिहासात डोकाऊन पाहिले तर संगणकाचा निर्मितीची सुरुवात 19 व्या शतकामध्ये चार्ल्स बॅबेज या गणित प्राध्यापकाने केली. सुरवातीला डीफेरेंस इंजिन आणि पुढे त्यांनी अँनालँटिकल इंजिन या मँकानिकल संगणकाचा डिझाईनकची आखणी केली आणि आजचा संगणकाची, कॉम्पुटरची मूलभूत संरचना याच डिझाईनवर आधारित आहे. (यात बायनरी नंबर सिस्टीम, स्टोरेज आणि प्रोसेसिंग युनिट.)
संगणकाची मुळ संकल्पना त्यांची होती. त्यांनी अँनालँटिकल इंजिन हे कॉम्पुटर सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला पण काम अपूर्णच राहिले. तरी त्यांनी केलेल्या कार्यासाठी चार्ल्स बॅबेज यांना फादर ऑफ कॉम्पुटर असे संबोधले जाते.
मुखातः संगणकाचे पाच जनेरेशन पिढ्यांमध्ये मध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते.
प्रत्येक जनरेशन मध्ये संगणकाच्या क्षमतेमध्ये सुधारणा होत गेली. कमी वेळत जास्त काम आणि त्याचा आकार कमी होत गेला हे वैशिष्टे आहेत.
1st to 5th Generation of Computer information Pdf in Marathi Language
संगणकाच्या पिढ्यांची माहिती मराठी
संगकाकाचा इतिहास हा पाच जनरेशन, पिढ्यामध्ये वर्गीकृत केला आहे. यात मुख्यतः इलेक्ट्रॉनिक कॉम्पुटर येतात. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये जनरेशनचा तारीख (डेट) वेवेगळ्या आहेत. डेट, त्या काळात त्या प्रकारचा संगणकाचा कधीपासून वापर सुरु झाला आणि त्यानंतर पुढचा पिढीचा वापर कधी सुरु झाला यावर अवलंबून आहेत.
फस्ट जनरेशन पहिली पिढी 1940-1956
1942 साली पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटर डॉ. जॉन व्ही. अॅटॅनसॉफ आणि क्लिफर्ड बेरी Dr. John V. Atanasoff and Clifford Berry. यांनी यूएस मध्ये, लोवा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये तयार केले. याला अॅटॅनसॉफ-बेरी संगणक (एबीसी) असे म्हणतात.
1943 साली कॉलोसस Colossus नावाचे इलेक्ट्रोनिक संगणक ब्रिटीश मिलिटरीसाठी तयार केले गेले.
दुसऱ्या महायुद्धात या संगणकाने जर्मन आर्मीचे कोड ब्रेक करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
सन 1944 मध्ये हॉवर्ड विद्यापीठात प्रोफेसर हॉवर्ड एच एँकेन यांनी इलेक्ट्रो मँकानिकल कॉम्पुटर हॉवर्ड मार्क-1 तयार केला.
या संगणकाला इनपुट पंच कार्डचा सहायाने केले जायचे.
1945 मध्ये इलेक्ट्रोनिक न्यूमेरिकल इंटेग्रेटर कॉम्पुटर Electronic Numerical Integrator and Computer (ENIAC) तयार करण्यात आला. या संगणकाचे डिझाईन जॉंन मौचली John Mauchly आणि जे. प्रेस्पर इकर्ट J. Presper Eckert यांनी अमेरिकेतील पेंसिलव्हेनिया विद्यापीठात काम करताना तयार केले. या संगणकाचे वजन 30 टन एवढे होते त्याचबरोबर 18,000 व्हॅक्यूम ट्युब प्रक्रियेसाठी वापरण्यात आल्या होत्या. हा पहिल्या जनरेशन मधील महत्वाचा संगणक होता.
फस्ट जनरेशन 1940-1956 संगणकाची वैशिष्ट्ये
- या संगणकात व्हॅक्यूम ट्युब वापरण्यात आल्या होत्या.
- याचा वापर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्यासाठी केला जाई.
- या संगणकाचा आकार ऐका खोली एवढा होता.
- हे कॉम्पुटर जास्त प्रमाणात वीज इलेक्ट्रिसिटी वापरत.
- हे कॉम्पुटर खूप महाग होते.
- हे कॉम्पुटर जास्त गरम व्हायचे म्हणून एसी या कॉम्पुटरला थंड ठेवण्यासाठी कम्पल्सरी वापरावा लागे.
- हे कॉम्पुटर फक्त मशिनी भाषा समजत उदा बायनरी भाषा.
History of Computer Sanganakacha Itihas Information in Marathi Language
दुसरी पिढी: 1956-1963
संगणकाच्या पिढ्यांची माहिती मराठी
1 9 47 साली बेल लॅबोरेटरी मध्ये विल्यम शॉकली, जॉन बार्डीन आणि वॉल्टर ब्रॅटेन यांनी November 17 नोव्हेंबर 1947 ते 23 डिसेंबर 1947 या काळात ट्रान्झिस्टरचा शोध लावला.
ट्रान्झिस्टरचा शोध लवकर लागला असला तरी त्याचा वापर संगणकात उशिराने सुरु झाला.
या संगणकामध्ये व्हॅक्यूम टय़ूब ऐवजी ट्रान्झिस्टर्सचा वापर सुरु झाला. ज्यामुळे संगणकाचा आकार कमी झाला. त्याचबरोबर काम करण्याची क्षमता वाढली.
सन 1951 मध्ये सार्वजनिक वापरासाठी प्रथम संगणक सुरू करण्यात आले.
यात Universal Automatic Computer (UNIVAC 1) चा समावेश आहे. 1953 मध्ये इंटरनॅशनल बिझिनेस मशीन (आयबीएम) 650 आणि 700 सिरीज़ कम्प्युटरने संगणकाने आपली छाप जगभर सोडली.
या जनरेशन मध्ये संगणकांच्या 100 संगणक प्रोग्रामिंग भाषा विकसित केल्या गेल्या. या मध्ये कोबोल (cobol) common business-oriented language आणि बेसिक BASIC Beginner’s All-purpose Symbolic Instruction Code या भाषा तयार केल्या.
बेसिकचे पहिले वरजन version 1 May 1964 या तारखेला रिलीज करण्यात आले होते.
या काळात मेमरी स्टोरेजसाठी चुंबकीय (मँग्नेटीक) कोर Magnetic cores या प्रायमरी मेमरी मँग्नेटीक टेप, डिस्कचा वापर सेकंडरी मेमरीसाठी सुरु झाला.
सेकंड जनरेशनचे पहिले संगणक हे अँटोमिक एनर्जी इंडस्ट्रीसाठी बनवण्यात आले होते.
संगणकाची उदाहरणे PDP-8, IBM 1401 आणि 7090, CDC 1604,
दुसऱ्या जनरेशनची वैशिष्ट्ये
- ट्रान्झिस्टरचा वापरामुळे आकार पहिल्या जनरेशनचा संगणकापेक्षा लहान झाला. पहिल्या जनरेशन मध्ये खोली एवढा आकार असणारा संगणक एका कपाटाला लागेल एवढ्या जागेत बसू लागला.
- पहिल्या जनरेशनपेक्षा आकाराने लहान आणि काम करण्याचा स्पीड मिलीसेकॅंदावरून मिक्रोसेकंद एवढा वाढला.
- मेमरी स्टोरेजसाठी चुंबकीय (मँग्नेटीक) कोर Magnetic cores या प्रायमरी मेमरी मँग्नेटीक टेप, डिस्कचा वापर सेकंडरी मेमरीसाठी सुरु झाला.
- पहिल्या जनरेशनपेक्षा वीज वापराचे प्रमाण कमी झाले.
- आऊपुटसाठी पंच कार्ड आणि प्रिंट आउटचा वापर केला जाई.
- प्रथमच स्टोअर्ड प्रोग्रामचा कॉन्सेप्ट वापरला गेला. यात कामासाठी दिलेल्या सूचना मेमरी मध्ये स्टोअर केल्या गेल्या.
- या सूचना कॉम्पुटरला देण्याची म्हणजे लिहाण्याची Code कोड करण्याची पद्दत असेम्बली भाषेत होती. ADD For Addition SUB For Substraction.
संगणकाचा इतिहास माहिती मराठी
तिसरी पिढी: 1964-1971

इंटीग्रेटेड सर्किटचा integrated circuit (IC) तयार करण्यात यश आले. इंटीग्रेटेड सर्किट मध्ये खुपसारे ट्रान्झिस्टर सिलिकॉन चीप वर बसवले जायचे. सिलिकॉन हे सेमिकॉडक्टर आहे.
उदाहरणे NCR 395, IMB 370, PDP-11
तिसऱ्या पिढीची वैशिष्ट्ये
- इंटीग्रेटेड सर्किटमुळे संगणकाचा वेगात भर पडली.
- इनपुट आउटपुटसाठी कीबोर्ड आणि मँनिटर हे पंच कार्ड आणि प्रिंटर एवजी वापरण्यात येऊ लागले.
- सोफ्टवेअर टेक्नोलाँजीत रिमोट शेअरिंग रिअल टाईम मल्टीप्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर सुरु झाला.
- मल्टीप्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमुळे वेगवेगळे अप्लिकेशन एकाचवेळी वापरता येऊ लागले. म्हणजे एकाचवेळी अनेक कामे करता येऊ लागली
- असेम्बली भाषाप्रणाली ऐवजी हाय लेवल भाषाप्रणाली वापरत आली.
- नँनो सेकंद मध्ये प्रोसेस होउ लागली.
- आकार एका टेबलवर संगणक बसेल इतपत लहान झाला.
फोर्थ जनरेशन 1971 ते आत्तापर्यंत
या संगणकांमध्ये LSI Large Scale Integration आणि Very Large Scale Integration VLSI हे तंत्रज्ञान वापरायला सुरवात झाली. यामुळे हजारो ट्रान्झिस्टर सिलिकॉन चीप वर बसवण्यात यश मिळाले. यालाच मिक्रोप्रोसेसार म्हणतात यामध्येच LSI आणि VLSI पद्धत वापरली गेली.
1 9 70 साली इंटेल या कंपनीने इंटेल 1103, पहिले डायनामिक ऍक्सेस मेमरी (डीआरएएम) चीप बाजारात आणले.
1 9 76 साली स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझिनीक यांनी एप्रिल फूल डे दिवशी अॅपल कॉम्प्युटरचे एकच सर्किट बोर्ड असलेला अॅपल आय बाजारात आला.
1980 साला मध्ये मायक्रोसॉफ्ट डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम (एमएस-डॉस) जन्मला आली आणि 1981 मध्ये आयबीएमने घर, कार्यालयीन वापरासाठी वैयक्तिक संगणक खुले केले.
तीन वर्षांनंतर अॅपल कंपनीने त्याचा इंटरफेससह मॅकिंटॉश संगणक तयार केला. त्याचबरोबर 90 च्या दशकात विंडोज ऑपरेटिंग बाजारात आली.
1 9 83 साली अॅपलचा लिसा हा GUI सह पहिला पर्सनल कंप्यूटर येतो. यामध्ये ड्रॉप-डाउन मेनू आणि चिन्ह देखील आहेत.
गव्हिलान एससी हे पहिले पोर्टेबल संगणक होते. जे लॅपटॉप” म्हणून प्रथम विक्री करण्यात आले.
32 Bit प्रोसिसर आले.
1993 साली पेन्टियम मायक्रोप्रोसेसरमुळे संगणकावरील ग्राफिक्स व संगीत वापरासाठी क्षमता वाढली.
1 99 6 साली सेर्गे ब्रिन आणि लॅरी पेज यांनी मिळून स्टॅनफोर्ड विद्यापीठात गुगल सर्च इंजिन विकसित केले.
1 999 साली वाय-फाय वापरात आले.
2003 साली प्रथम 64-बिट प्रोसेसर बाजारासाठी उपलब्ध झाले.
2005 साली यूट्यूब, एक व्हिडिओ शेअरिंग वेबसाईट सुरु झाली.
2010 साली अॅपल आयपॅड बाजारात आणला.
संगणकाचा विकास दिवसेंदिवस होत राहील. सध्या इंटरनेट मुळे आपण माहितीची देवाणघेवाण काही सेकंदात करू शकतो. सध्या मोझीला फायरफॉक्स, गुगलचे गुगल क्रोम, मिक्रोसोफ्टचे इंटरनेट एक्सप्लोरर तसेच इतरही वेब ब्रौंजर आपण वापरतो. एकाच वेळी अनेक कामे संगणकामध्ये आपण करू शकतो. स्वतःचा नवीन कामासाठी साँफ्टवेअर आपण बनऊन आपल्या कामाचा वेग आपण वाढऊ शकतो.
आज बाजारात हातात बसतील एवढे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ज्याची क्षमता लाखो पटीने जास्त आहे. त्यावर इंटरनेट, कॉलिंग, गेमिंग, फिल्म देखील पाहू शकतो त्याचप्रमाणे महत्वाची कामे सुद्धा करू शकतो.
फोर्थ जनरेशन संगणकाची वैशिष्ट्ये
- सेमिकडक्टर मेमरी एवजी मँग्नेटीक कोड मेमरी वापल्यामुळे काम करण्याचा वेग वाढला.
- मँग्नेटीक डिस्कची स्टोरेज क्षमता वाढली.
- संगणक एकमेकांना जोडण्याची प्रणाली विकसित झाली.
- नवनवीन ऑपरेटिंग सिस्टीम तयार झाल्या यात MS DOS आणि विंडोस वापरात आल्या.
- ग्राफिकल युसर इंटरफेस वापरात आले (GUI) GUI हे युसर फ्रेंडली इंटरफेस मुळे स्क्रीन वर मेनुस आणि आयकॉन तयार करता आले.
- आकार आणखी लहान झाला. हातात बसतील एवढे लहान संगणक तयार झाले.
संगणकाची पाचवी पिढी फिफ्थ जनरेशन चालु ते भविष्यामधील बदल
भविष्यातील हे मुख्यतः आर्टीफ़िसिअल इटेलीजंस वर आधारित असतील. आर्टीफ़िसिअल इटेलीजंस म्हणजे त्यांचामध्ये विचार करण्याची क्षमता असेल. त्यांना कुठल्याही प्रकारची सूचना देण्याची गरज नसेल.
उदा चालाकाशिवाय गाडी चालवणे, महत्वाचे निर्णय स्वतः घेणे. फक्त धोक्याची सूचना न देता त्यावर स्वतः उपाय करणे. आर्टीफ़िसिअल इटेलीजंसवर सध्या काम चालू आहे.
History of Computer Sanganakacha Itihas Information in Marathi Language 1st to 5th Generation of Computer information Pdf in Marathi Language संगणकाचा इतिहास माहिती मराठी विकिपीडिया ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. तसेच या प्रकारची महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या. Collge Catta Katta कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ!
संगणकाच्या पिढ्यांची माहिती मराठी संगणकाचा शोध कोणी लावला History of Computer in Marathi Wikipedia
Leave a Reply