ताप का येतो मुळात ताप हा आजार नाहीच. मोजक्याच लोकांना खरे कारण माहित आहे. ताप येण्याचे खरे कारण माहित झाल्यावर तुम्हाला तापेची भीती वाटणार नाही. तापेचे प्रकार कोणते ,ताप का येतो ताप आल्यावर काय करावे घरगुती उपाय. ही माहिती तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल.
ताप का येतो ताप आल्यावर काय करावे घरगुती उपाय
Taap Fever Var Gharguti Upay Upchar in Marathi
ताप का येतो ? तापेचे वेगवेगळे प्रकार कोणते ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय मुळात ताप हा कोणता आजार किंवा रोग नाहीच. प्रत्येकाला कधीना कधी ताप येतेच पण तुम्हाला ताप का येते हे माहित आहे का ? चला तर मग मित्रांनो आज आपल्या आवडत्या College Catta वर ताप का येते तापेवर घरगुती उपाय जाणून घेऊयात.
ताप का येतो ? Taap Ka Yeto
आपण तापेचे निदान न करता त्यावर मेडिकल मधून तापेची गोळी घेतो हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण मुळात ताप येणे हा आजार किंवा रोग नाहीच. हे आजाराचे लक्षण आहे. याहीपेक्षा ताप का येते ? तर आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव निसर्गतः अस्तित्वात असतात त्याला Normal Flora म्हणतात यांचापासून शरीराला कोणतीही हानी होत नाही पण याव्यतिरिक्त शरीरात एखादा सूक्ष्मजीव Microorganism (Bacteria, Virous) ने जर प्रवेश केला तर आपली प्रतिकार शक्ती Immunity power त्या सुक्ष्मजीवाला संपवण्याचा किंवा निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करते. त्याबरोबरच आपल्या शरीरात परजीवी आलेत आशी सूचना हायपोथालामस Hypothalamus ला (मेंदूमधील भाग) केली जाते मग आपल्या शरीराला तापमान वाढवण्याची सूचना केली जाते. का तर जास्तकरून सूक्ष्मजीव 37 डिग्री सेल्सियसला जगतात. जर तापमान वाढले तर ते जगू शकत नाहीत म्हणून आपले शरीर तापमान वाढवते. Immunity Cells चे आणि शरीरास घातक सूक्ष्मजीवाचे युद्ध चालू होते म्हणजे आपली Immunity power resist करते ज्याची Immunity power strong तो लवकर बारा होतो त्याचप्रमाणे अशा लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते.
आपण आजारी पडतो म्हणजे काय होत?
सरळ आहे आपल्या Immunity Cells युद्धात हरल्या नंतर त्या परजीवाचे आपल्या शरीरावर राज्य सुरु होते. म्हणून मग त्या आजाराची चिकित्सा करून डॉक्टरांचा सल्ल्याने आपल्याला बरे कण्यासाठी म्हणजे त्या परजीवाला नष्ट करण्यासाठी औषध उपचार केला जातो.
तापाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि तो ओळखण्याची वेगवेगळी लक्षणे.
तापाचे प्रकार ? ताप का येतो
विषाणूजन्य ताप
जसे बर्ड फ्लू, एच१एन१, एच२एन२. मात्र विषाणू अनेक प्रकारचे असतात. त्यामुळे साथीचे आजार पसरू शकतात. मुंबईत गर्दीचे प्रमाण अधिक असल्याने असे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे विषाणूजन्य तापाकडे दुर्लक्ष न करणेच योग्य.
किटाणूंमुळे होणारा संसर्ग
हा ताप डास चावल्याने येतो. उदा. मलेरिया, डेंग्यू. मलेरियाचे तीन प्रकार असून, डेंग्यूचे चार प्रकार आहेत. मलेरियामध्ये एका विशिष्ट वेळेला ताप येतो. डॉक्टरांकडून योग्य उपचार न घेतल्यास हा विकार बळावू शकतो.
जंतुसंसर्गामुळे येणारा ताप
जंतूचा संसर्ग झाल्याने ताप येतो. उदा. टायफाइड, न्यूमोनिया, टीबी, लेप्टोस्पायरोसिस.
निदान न होणारा ताप
ताप येण्याची कारणे सामान्य असली, तरी काही तापाचे निदानच होत नाही. विविध उपचार केले, तरी ताप बरा होत नाही. त्याची मुदत दोन आठवड्यांपेक्षा अधिक राहते.
कान दुखून ताप येतो, डोके दुखूनही ताप येण्याचे प्रमाण अधिक असते.
टॉन्सिलचा ताप, कानाचा जंतुसंसर्ग, गळू, हत्तीरोगामुळे येणारा ताप येतो.
ताप येण्याची सामान्य लक्षणे
शरीर गरम होणे, घाम न येणे, तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, काहीही करायची इच्छा न होणे, इत्यादी लक्षणे ताप आल्यावर दिसून येतात.
अंगावर ताप असल्यास खालील आहार रोजच्या जेवणात असावा
मूग, मसूर, साळीच्या लाह्या, दुधी, कारले, पालक, तांदूळ, मोसंबी, डाळिंब, पपई, तूप, धने, जिरे, गरम पाणी इत्यादीचे सेवन ताप आल्यानंतर केल्यास आराम मिळतो.
ताप असल्यास खालील पदार्थ खाणे टाळावे
गहू, चवळी, मटार, पावटा, सिमला मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, दही, अननस, आंबा, चिकू, तळलेले आणि जड पदार्थ ताप आल्यावर खाण्याचे टाळावे.
ताप का येतो ताप आल्यावर काय करावे घरगुती उपाय
- लहान मुलांना ताप आल्यास घरगुती उपाय- लहान मुलांना ताप आल्यावर शक्यतो डॉक्टरांचा सल्ल्याने उपचार करावेत. खूप जास्त ताप असेल तर त्याच्या कपाळावर कापडाची पट्टी ओली करून ठेवावी.
- ताप आल्यावर सर्वात स्वस्त घरगुती उपाय म्हणजे आपल्या कपाळावर ओल्या फडक्याचा पट्ट्या ठेवने. यामुळे मेंदूचे तापमान कमी होण्यास मदत होते.
- ताप आल्यावर जीभ पांढरी होऊन आपल्याला भूक लागत नाही. अश्या प्रसंगीमध घालून तुळशीच्या पानांचा अर्धा चमचा रस सकाळ संध्याकाळ घ्यावा. याने तोंडाला चव येऊन भूक लागेल.
- पाळीचा ताप येत असल्यास ताप येण्याचा अगोदर तीन तासप्राजक्ताची पाने ठेचून तयार केलेल्या सुपारीच्या आकाराची गोळी गुलासह खावी. याने ताप येत नाही आणि आल्यास लवकर बरा होतो.
- अपचनामुळे ताप आल्यास पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा धणेपूड कोमट पाण्यात दिवसातून चार वेळा घ्यावी. ताप लवकर बरा होईल.
- कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण 5-10 मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो. खुप ताप असल्यास कपाळावर मिठाच्या पानाच्या किंवा थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्या, हात पायाला कांद्याचा रस चोळावा. ह्या उपायाने ताप बरा होण्यास मदत होते. तरीही ताप कमी न झाल्यास थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे.
- दोन कप पाण्यामध्ये एक चमचे जिरे टाकून पाणी उकळून घ्या. पाणी उकळल्यानंतर बारीक केलेले अद्रक आणि तुळशीचे पानं टाकून पुन्हा उकळून घ्या. यामुळे या पाण्यात इन्फेक्शनशी लढण्याची ताकद निर्माण होईल. हे पाणी गाळून हळू-हळू पिउन टाका.
- तापात बेलफळाचं चूर्ण उपयुक्त ठरतं. बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून ताप उतरेपर्यंत घ्यावं. त्यामुळे घरच्या घरी टॅप बारा होण्यास मदत होते. पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो
- तापात मनुके खाणं उपयुक्त ठरतं. २० ते २५ मनुके पाण्यात भिजत घालावेत. ते कुस्करून त्यात लिंबाचा रस घालावा. हे दिवसांतून दोन वेळा घ्यावं.याने ताप कमी होण्यास मदत होते.
- आहारात सफरचंद, दूध, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश केल्यास ताप कमी होण्यास मदत होते.
याशिवाय ताप आलेला असताना जड, तळलेले, आंबवलेले पदार्थ, खाऊ नये. व्यायाम आणि रात्री जागरण टाळून पुरेपूर विश्रांती घ्यावी. ताप आल्यावर वरील घरगुती उपाय करावेत. वरील उपाय करून देखील फरक न पडल्यास लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटून त्यांचा योग्य तो सल्ला घेऊन योग्य तो उपचार घ्यावा.
मित्रांनो आपण अशाच पद्धतीची महत्वपूर्ण माहिती आपल्या आवडत्या College Catta या संकेतस्थळावर वाचत राहू. ताप आल्यावर काय करावे घरगुती उपाय Taap Fever Var Gharguti Upay Upchar in Marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा.
-प्रियंका पुंड.
शांत झोप येण्यासाठी घरगुती उपाय
लहान मुलांना ताप आल्यास घरगुती उपाय ताप न येण्यासाठी काय करावे लहान मुलांचा ताप उपचार ताप का येतो तापाचे प्रकार थंडी वाजून ताप येणे.
Nice…. very important information….