वेळेवर शांत झोप येत नाही. सावध व्हा ही समस्या आपल्या चुकीचा सवईमुळे किंवा गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. घाबरू नका. झोप न येण्याची कारणे समजून घ्या आणि हे लवकर गाढ झोप येण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय करून बघा नक्की फायदा होईल.
Lavkar Shant Zop Yenyasathi Gharguti Upay in Marathi Language
लवकर गाढ झोप येण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय निद्रानाश झोप न येण्यावर घरगुती उपाय करून बघा
धकाधकीच जीवन, घरात होणारे वाद, शारीरिक ताण, मानसिक तणाव, या एक ना अनेक कारणांमुळे रात्रीची सुखद निद्रा सध्याच्या पिढीपासून दुरावत चालली आहे. त्यामुळे आजार जडण्याचे प्रमाण आणि व्यसनाच्या आहारी तरुणाई जाण्याचं प्रमाण वाढत आहे. काही जण तर झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या खात असल्याचं चित्र देखील आपल्या आसपास पाहायला मिळते.
रात्री चांगली झोप न लागण्याचे कारण काही आरोग्य समस्या देखील असू शकतात. चांगली तब्येत हवी असेल तर तितकीच चांगली झोपही मिळणे आवश्यक आहे. चांगली आणि पुरेशी झोप न मिळाल्यास चिडचिडेपणा, डोकेदुखी, सुस्तपणा असे अनेक त्रास होऊ शकतात.
जाणून घेऊयात झोप न येण्याची शास्त्रीय कारणे कोणती
- पौगंडावस्था
तरुण वयात येण्याच्या कालावधीमध्ये ४० टक्के लहान मुलांमध्ये झोपेच्या समस्या निर्माण होतात. संशोधनात संशोधकांना वयात येणा-या मुलींमध्ये मानसिक आणि शारीरिक बदलांसोबत निद्रानाश होण्याचे लक्षणही आढळून आले आहे. पौगंडावस्थेत मुलींमध्ये झोपेच्या समस्या या त्यांच्यामध्ये होणा-या हॉर्मोनल बदलामुळे निर्माण होतात. एका संशोधनानूसार निद्रानाशाची समस्या मुलींच्या मासिक पाळी सुरु होण्याच्या काळात म्हणजेच ११ ते १४ या वयात दिसून येते. तर एका संशोधनानूसार मासिक पाळीच्या काळात मुलींमध्ये हे प्रमाण २.७५ पट वाढलेले आढळले आहे.
- मॅनोपॉज
सध्या झोप न येण्याची समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही आढळते. मात्र मॅनोपॉजच्या दरम्यान स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कारण मॅनोपॉजच्या काळात स्त्रीयांमधील अॅस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते. त्यामुळे झोपेची समस्या निर्माण होते. झोपेच्या समस्येसोबत काही महीलांचे यामुळे वजन देखील वाढते.
- कर्करोग
हल्ली कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झोपेची समस्या दिसून येतात. कर्करोगावरील उपचारांची कमतरता, पुन्हा कर्करोग होण्याची भीती, मानसिक अस्वास्थ्य, कर्करोगामुळे कार्यक्षमता कमी होणे, सुरक्षेच्या समस्या, औषधांचा गैरवापर व दुरुपयोग, नातेसंबधातील ताण, उपचारांसाठी होणारा खर्च यामुळे झोप कमी लागण्याची समस्या निर्माण होते. अनेक संशोधनात निरनिराळ्या कर्करोगाचे निदान होण्यापुर्वी ६ महिने व निदान झाल्यावर १८ महिने कमी झोप व थकवा ही लक्षणे या रुग्णांमध्ये आढळतात.
- शहरी जीवनशैली
धावत्या कॉर्पोरेट जगातील ताणामुळे देखील तुम्हाला झोप कमी येण्याची समस्या होऊ शकते. दिवसभरातील कामाच्या ठिकाणी असणारा ताण, रात्री उशीरापर्यंत काम करणे, खुप वेळ टीव्ही पहाणे, सकाळी लवकर उठावे लागणे व पुन्हा रात्री एखाद्या पार्टीला जाणे, रात्रभर व्हॉट्सअपवर गप्पा मारणे यामुळे झोप कमी मिळते आणि परिणामी निद्रानाश ही समस्या उत्पन्न होते.
- गाल ब्लेडर सर्जरी
गाल ब्लेडर सर्जरी मध्ये पित्ताचे खडे झाल्यास तुमचे गाल ब्लेडर अथवा पित्ताशय काढून टाकण्यात येते. पित्ताशय जड अन्नाच्या पचनासाठी अतिशय उपयुक्त असते. जेव्हा तुम्ही रात्री बराच वेळ उपाशी रहाता तेव्हा पित्ताशय पित्त साठवून ठेवते पण पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेमुळे हा ताण लहान आतड्यावर येतो. त्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर ब-याचदा झोपेच्या समस्या निर्माण होतात.
- विटामिन्स
आपण निरोगी रहाण्यासाठी अनेक विटामिन्स घेतो पण आश्चर्याची बाब म्हणजे या विटामिन्स मुळे तुम्हाला झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. एक किंवा अधिक विटामिन घेतल्याने तुम्हाला झोपेची समस्या, झोपमोड होणे अथवा निद्रानाश होऊ शकतो. झोप येणे अथवा जाग येणे यावर आपल्या मज्जासंस्थेचे नियंत्रण असते पण विटामिन घेतल्याने हे संतुलन बिघडते व झोपमोड होते.
तुमच्या झोपमोडीचे कारण वर दिलेल्या कारणांपैकी एखादे असेल तर तुमच्या डॉक्टरचा सल्ला जरुर घ्या.
लवकर गाढ झोप येण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय करून बघा
चांगली झोप येण्यासाठी उपाय Nidranash Upay in Marathi Language
Lavkar Shant Zop Yenyasathi Gharguti Upay in Marathi
झोपण्याआधी हे करा
- शांत झोप लागण्यासाठी काय करावे
- झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध प्या. कॅल्शिअमचा स्रोत असलेले दुधात ट्रिप्टोफन आणि सेरोटोनिन ही तत्वचांगली झोप यायला मदत करतात. दुधासोबत बदाम किंवा केळं खाणेही फायदेशीर ठरू शकते.
- हर्बल टी सुद्धा खूप उपयुक्त आहे.
थोडासा मसाज करा
- झोपण्याच्या १०-१५ मिनिटं आधी हाताला आणि पायाच्या तळव्यांना हळुवार मसाज करा. मसाज करण्यासाठी तिळाचे, बदामाचे किंवा खोबरेल तेल वापरा. यामुळे दिवसभराचा थकवा दूर होऊ शकतो.
झोपण्याच्या ठीक आधी
- जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवणात सूप, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. पण, आहार हलका ठेवा. जेवल्यावर लगेच आंघोळ करणेही टाळा. थोडा वेळ ध्यानधारणा करणे केव्हाही फायद्याचे ठरू शकते.
गॅजेट्सपासून दूर राहा
- रात्री अंथरुणात पडल्यावर दिवसभराचे मेसेज, गेम्स आणि सोशल नेटवर्क चेक करण्याची आता आपल्याला सवय लागली आहे पण खरे तर या गोष्टी टाळायला हव्या. झोपण्याच्या २० मिनीटे आधी टेलिव्हीजन, कॉम्प्युटर किंवा कोणत्याही स्क्रीनकडे पाहू नका. झोपताना डोळे ताण विरहीत ठेवा.
- झोपताना एकूणच डोळ्यांवर प्रकाश येऊ देऊ नका.
जायफळ
- शांत झोप लागण्यासाठी काय करावे
- भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणार्या मसाल्यांमध्ये आहे. जायफळ आणि वेलचीने तर गोड पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे.
शरीरातील स्नायूचा ताण घालवा
- काही योगासनामध्ये शवासन सारखे टेक्निक आहे. तुमच्या स्नायूंमधील तणाव कमी झाल्यास, तुमचे मन देखील तणाव विरहीत होते. म्हणून झोपलेल्या स्थितीत दीर्घ श्वासोश्वास करा, हळूहळू शांतपणे स्नायूमधील ताण कमी करा, अवयवांना सैल सोडा. पाय, हात, खांदा इ. अवयवातील ताठरता हळूहळू कमी करताच मेंदूला झोपण्याचा सिग्नल मिळेल. मग तुम्हाला जरूर शांत व गाढ झोप लागेल.
सवयीच्या वस्तू
- चहा, कॉफी, कोला पेये, एनर्जी ड्रिंक्स टाळावीत. घेतलीच तर दिवसभरात १०० मिलीपेक्षा जास्त घेऊ नयेत आणि दिवसातला शेवटचा चहा-कॉफी किंवा ही पेये संध्याकाळी ४ नंतर घेऊ नयेत. या सर्व पेयात असलेल्या कॅफीनमुळे जागृतावस्था जास्त काळ लांबते आणि झोप नीट लागत नाही. या पेयांचा परिणाम सहा ते आठ तास राहतो, त्यामुळे संध्याकाळी उशीरा कॅफीनयुक्त पेये टाळावीत.
दुपारची झोप
- दुपारी झोपणे टाळावे. दुपारची वामकुक्षी वीस मिनिटांपेक्षा जास्त घेऊ नये. दुपारी तासभर झोपल्यास रात्री दोन तास उशीरा झोप येणार हे नक्की. मग साहजिकच सगळे गणित बिघडून जाते.
डोळ्याला दमवण्यासाठी वाचन करा
- लहानपणी अभ्यास करताना बंद होणाऱ्या डोळ्यांना उघडे ठेवणे फार अवघड जायचे. आठवतय? त्यातूनच आयडिया घेऊन डॉ. विन्टर यांनी असे सुचवले की झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक, मॅगॅझिन वाचायला घ्या, पण हो झोप उडवणारे काही वाचू नका. बेडरूममधील लाइटस अत्यंत मंद असावेत. फक्त पुस्तकांवर पडेल असे लाइटस वापरा.
नियमित व्यायाम
- नियमित व्यायाम केल्याने देखील झोप न येण्याची समस्या टाळता येऊ शकते.
अशा प्रकारे असंख्य उपाय करून आपण सुखदायक निद्रा मिळवू शकतो.
झोप येण्यासाठी कोणता मंत्र म्हणावा
- झोप न लागण्याचा कारणांमध्ये मन विचलित होणे डोक्यातील विचार न थांबणे हे देखील कारण आहे. यावर साधा उपाय म्हणजे मन एकाग्र करणे मग यासाठी तुम्ही गायत्री मंत्र किंवा ओंकार मंत्राचा जप करू शकता याने तुमचे मन एकाग्र होईल आणि झोप लागेल.
झोप येण्यासाठी औषध गोळ्या
- शक्यतो झोपेसाठी गोळ्या घेऊ नका कारण अशी झोप नैसर्गिक नसते. आपली झोप न येण्याची करणे शोधा आणि त्यानुसार उपचार करा.
मित्रांनो मी आशा करते की तुम्हाला “लवकर गाढ झोप येण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय” तसेच निद्रानाश झोप न येण्यावर घरगुती उपाय नक्की आवडले असतील. नक्कीच तुम्ही नियमित व्यायाम कराल आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्याल. ही माहिती कशी वाटली यासाठी प्रतिक्रिया खालील कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नोंदऊ शकता आणि अशीच महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपल्या आवडत्या College Catta या संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या.
-प्रियंका पुंड.
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय
लवकर गाढ झोप येण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय Nidranash Upay in Marathi Language हे निद्रानाश झोप न येण्यावर घरगुती उपाय करून बघा झोप न येण्याची कारणे कोणती झोप येण्यासाठी कोणता मंत्र म्हणावा झोप येण्यासाठी औषध गोळ्या
Leave a Reply