इतरांचे “उदाहरण” नका देऊ … स्वतः “उदाहरण” बना ..

असच एक उत्तम उदाहरण म्हणजेच इरफान खान .
टिव्ही वर जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी सुरु होती ..
१ मिनिट मी ते बघू शकलो आणि दुसऱ्याच क्षणाला मी टिव्ही बंद केला ..
कारण मला मान्य करायचं नव्हतं आणि अजूनही मी मान्य करणार नाही ..
कि इरफान खान यांचे निधन झाले आहे ..
कारण इरफान खान ह्या अभिनेत्यामुळे ,
आपल्या भारतातील {काही} नवोदित अभिनेत्यांना हे शिकायला मिळालं,
कि आम्हाला अमिताभ बच्चन नाही बनायचं .. आम्हाला शाहरुख खान नाही बनायचं ..
कारण अमिताभ ऑलरेडी त्यांचं काम करत आहेत ..
मग पुन्हा दुसरा अमिताभ बच्चन कशासाठी ?
शाहरुख खान ऑलरेडी त्यांचं काम करत आहेत ..
मग पुन्हा दुसरा शाहरुख खान कशासाठी ?
आम्हाला स्वतः बनायचं आहे.. आमची स्वतः ची ओळख बनवायची आहे. ..
हे शिकायला मिळालं इरफान खान यांच्याकडून .
इरफान खान यांनी केलेल्या त्यांच्या कामातून हि प्रेरणा सतत मिळत राहते ,
आणि मिळत राहील .
चाणक्य, भारत एक खोज, चंद्रकांता ह्या मालिका आज सुद्दा बघा ,
भूमिका किती मोठ्या आहेत त्यापेक्षा भूमिका कशी करायची असते हे महत्वाचं असतं ,
आणि त्या काळात इरफान खान यांनी हे सिद्ध केलं आहे .
मी त्या काळात का म्हणतोय कारण त्या काळापासून आपल्या बॉलिवूड मध्ये एक ट्रेंड सेट आहे “हिरोगिरी” चा ,
{ काही अपवाद वगळले तर… } जो अजून हि काही अंशी तसाच आहे ..
आत्ता कुठे तरी “कास्टिंग” चा अर्थ आपल्या बॉलीवुड ला कळतोय ..
आणि त्याचे परिणाम बॉलीवुड ला चांगले मिळत आहेत .
पण विचार करा त्या काळात विस्तीर्ण झालेल्या,
“हिरोगिरी” च्या ट्रेंड ला टक्कर देणं सोपं असेल ?
National school of drama चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इरफान मुंबईत आले ,
आणि त्यांनी त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु केला .
हा अभिनयाचा प्रवास वाटतो तितका सोपा असेल ?
खूप वर्षांपूर्वी पासून आलेला ट्रेंड च योग्य आणि तुम्ही जे करत आहात ते अयोग्य,
असे म्हणणारे,
किती तरी बुद्दिजीवी प्राणी इरफान ह्यांना ह्या अभिनयाच्या प्रवासात भेटले असतील , बऱ्याच ठिकाणी त्यांना विरोध सुद्धा झाला असेल ,
पण ज्याला माहितीये कि आपल्याला काय करायचं आहे ,
आणि कशासाठी करायचं आहे त्याला कोणीच थांबवु शकत नाही …
त्यांनी त्यांचा Realistic {सहज} अभिनय सुरु ठेवला .
{ बऱ्याच अभिनेत्यांना अजूनही “सहज अभिनय” कशाला म्हणतात हे माहिती नाही त्यांनी कृपया जाणकारांकडून समजून घ्यावे }
आणि जस जसा काळ बदलत गेला , जस जसे नविन वास्तववादी दिग्दर्शक आले ,
तेव्हा कुठे इतक्या वर्षांची इरफान खान यांची मेहनत खऱ्या अर्थाने दिसू लागली ,
Salam Bombay ह्या चित्रपटापासून त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला ,
त्यानंतर Kamla Ki Maut , Jazeere , Ek Doctor Ki Maut , Karamati Coat
असे बरेच चित्रपट त्यांनी केले.
2002 मध्ये “The Warrior” चित्रपट त्यांना मिळाला ,
British filmmaker Asif Kapadia यांनी तो दिग्दर्शित केला होता .
पण मला असं वाटतं कि २००३ ह्या वर्षी आलेल्या “हासील” चित्रपटाने ,
त्यांना खऱ्या अर्थाने बॉलीवूड च्या इतर लोकांपर्यंत आणि चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवले ,
कारण त्यात त्यांनी केलेली ” रणविजय ” हि भूमिका कुणीच विसरू शकणार नाही .
{ अर्थात हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर }
आणि मग त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला गती दिली ती ,
विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेल्या “मकबूल” ह्या चित्रपटाने ,
बॉलीवूड चे खूप commercial चित्रपट सुद्दा केले ..
पण त्यात पुन्हा “पाम सिंग तोमर” मैलाचा दगड ठरला .
The Namesake , The Darjeeling Limited , Slumdog Millionaire ,
The Amazing Spider-Man , Life of Pi ,jurassic World ,
The Jungle Book {voice} , inferno , Puzzle असे बरेच चित्रपट केले …
हॉलिवूड चा अभिनेता टॉम हैंक्स सुद्दा इरफान खान यांना म्हणाला होता
” तुझे डोळे सुद्दा अभिनय करतात”
मुद्दा हाच आहे इरफान खान यांचे सीन बघितल्यावर आपल्याला कुठेच वाटत नाही कि ,
ते “आव” आणून अभिनय करत आहेत ,
त्यांनी कॅमेरा हे माध्यम खूप जवळून ओळखले ..
काळा प्रमाणे कॅमेरा तंत्र बदलत आले आहे ..
आणि बदलत जाणार आहे, कॅमेरा तंत्र अजून प्रगत होणार आहे ..
कॅमेरा समोर अतिशयोक्ती चालणार नाही ..
{पण तरी काही अभिनेते नव्या कॅमेरा तंत्रा समोर तोच तोच पांचट पणा करत आहेत }
जितक्या सहज पद्धतीने लेखकाने लिहिलेले संवाद { Dialogue delivery }
तुम्ही बोलणार तितका तुमचा अभिनय प्रभावी ठरणार .
आणि इरफान खान यांनी हेच केलं,
म्हणून इरफान खान यांचा अभिनय कुठल्याही प्रसांगाला जिंवत ठेवतो .
आज दुःख तर झालंच जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी ऐकली .
पण मी मान्य करणारच नाही कि, इरफान खान यांचे निधन झाले आहे ,
कारण लहानपणा पासून म्हणजे,
टिव्ही सिरीयल चंद्रकांता पासून ते चित्रपट angreji medium पर्यंत ,
तुमचा अभिनय हा जिवंत आहे आणि राहील .
आज तुम्ही सुद्दा बॉलीवूड आणि हॉलीवूड साठी आमच्या सारख्या कलाकारांसाठी,
एक “अभिनयाचं उत्तम उदाहरण” आहात …
आणि इरफान खान हे “अभिनयाचं उदाहरण” नेहमीच जिंवत असेल …..
लेखक : हेमंत गवळे
-कॉलेज कट्टा
Leave a Reply