मराठी लेख दिवाळी ऑनलाईन शॉपिंग मराठी लेख सध्या बदलत आहेत शॉपिंगच्या पद्धती वेगाने
दिवाळी हा सणांचा राजा म्हणून ओळखला जातो. दिवाळीच्या सणाला सर्व लहान थोरांना आवड असत ती,आपल्या घरी तयार केल्या जाणाऱ्या गोड-धोड पदार्थांबरोबर रोषणाईची आणि त्याचबरोबर फटाके फोडून आनंद साजरा करण्याची हे जितके खरे आहे तितकेच खरे आहे की या सणा-सुदीच्या काळात खरेदी करण्याचे प्रमाण तर वाढतेच परंतु या खरेदी आज जास्त प्रमाणात ऑनलाइन पद्धतीने केले जात असल्याचे दिसून येत आहे. काही वर्षापूर्वी दिवाळी सनाच्या दहा बारा दिवसांपासून च शहरातील कापड बाजार तसेच सुवर्णालंकाराच्या पेठ गच्च भरून जायच्या ,परंतु आजची परिस्थिती अशी दिसते की बाजारामध्ये शॉपिंग करणाऱ्यांच्या प्रमाणात खूपच घट झाल्याचे जाणवते आहे. ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांच्या प्रमाणात जर अशीच वाढ होत राहिली तर… आणि या लोकांनी जी मोठं-मोठी दुकाने थाटून ठेवली आहेत त्यांचे काय ? असा प्रश्न मनात उभा राहतो. ऑनलाइन शॉपिंग करत असताना ग्राहकांना घवघवीत डिस्काउंट सांगितलं जात आहे आणि दिवाळी स्पेसिअल ऑफर दिल्या जातात हीच तर कारणे आहेत ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होण्याची ! त्यात भरीस-भर म्हणजे ऑनलाइन शॉपिंग वाले वस्तू किंवा कपडे जर कदाचित आपल्याला आवडले नाही तर परत करण्याची संधी देखील देतात. हेच तर पाहिजे असते ग्राहकाला. Online Shoping वाल्या कंपन्या आज आपल्याला एवढा फायदा कमवत असताना दिसतात खऱ्या परंतु यांची सुरुवातीची अवस्था खूपच बिकट होती,कारण नवीन ग्राहक आपल्या बाजूला वळविण्यासाठी त्यांना काय – काय कष्ट करावे लागले त्यांचे त्यांनाच माहित. कारण ऑनलाइन शॉपिंग करणे हा आपल्याकडे कधी कुणाच्या स्वप्नातही विचार केला नसेल. पण आज खूप मोठ-मोठ्या कंपन्यांनी आज या क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत. मराठी लेख
पुढे… आज कोणत्याही सणासुदीला लागणाऱ्या हरेक वस्तू आपल्याला Online Shoping करता येते. आत्ता होऊन गेलेल्या होळीच्या सनाला सहजच पहिले तर होळीसाठी आवश्यक असणाऱ्या गोवऱ्या आणि इतर काही वस्तू हेदेखील ऑनलाइन मिळत होते. असं वाटलं की आज तर गोवऱ्या मिळताहेत तर उद्या आपण विचारही करू शकत नाही की अजून काय ऑनलाइन मिळेल? परन्तु या सर्व गोष्टींना सपोर्टही तसा भरपूर आहेच,म्हणून तर हा सगळं खटाटोप होत आहे ना!
आत्ता दिवाळीचा सन आहे म्हणून सर्वजण नवं-नवीन वस्तू नवीन कपडे आपल्या कमाईने म्हणा किंवा आई-बाबांच्या मागे सारखे बोलून बोलून खरेदी तर करणारच! पण ऑनलाइन शॉपिंग करत असो किंवा मार्केट मध्ये जाऊन करत असो पण त्या वस्तू किंवा कपड्यांचा दर्जा आपण पहिला पाहिजे. कारण पूर्वी जसे आपण समोरा समोर वस्तू खरेदी करत होतो आता आपण मोबाईल किंवा कॉम्प्यूटर च्या स्क्रीनवर पाहून खरेदी करत आहोत. Amazon, Flipkart, Myntra, Snapdeal अशा एक ना अनेक कंपनी या क्षेत्रात आहेत, त्यांनी आपला चांगलाच जम बसवल्याचं चित्र आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोतच. मराठी लेख
-सागर गोरखे
Leave a Reply