
भिकाऱ्याच्या पोटाची” भुक ” कशी भागणार..??
“कोरोना” नाव ऐकल्यानंतर आता अंगावर काटा उभा राहतो…जेव्हा ५ Postive करोना रुग्ण negative झाले, तेव्हा जरा बर वाटल…पण आता परिस्थिती खुप वेगळी होत आहे…..रुग्णाची संख्या ही झपाट्याने वाढत आहे…. महाराष्ट्रातली परिस्थिती काशी आहे हे मी वेगळं सांगायला नको…
सरकार आपल्या पद्धतीने काळजीवाहक पणे काम करतंय… अगदी बापानं घरासाठी करावं तस हे राज्यासाठी करताहेत… खास कौतुक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं केलं पाहिजे, करण एकीकडे आपली आई ICU मध्ये असताना हा माणूस मात्र कुठलीच चिंता न करता राज्यासाठी राबतोय… अशावेळी त्यांनी त्यांची कौटुंबिक जबाबदारी बाजूला ठेवत जनतेच्या सुरक्षेला जास्त महत्त्व दिलं आहे. त्यांची ही बाब निश्चितच कौतुकास्पद पद आहे….त्यामुळे या देवमाणसा बदल किती बोलाव तेवढ कमीच होईल…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला जनतेनं देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला…. सकाळपासूनच त्याची प्रचिती पाहायला मिळाली…. एरवी लोकांच्या गर्दीने गजबजलेली ठिकाणे आज शांत झोपली होती….
गॅलरीत, गच्चीत उभे राहून लोकांनी टाळा, थाळ्या वाजवत आपल्या भावना प्रकट केल्या…. पण हेच सगळं आपल्या डोळ्याने न पाहू शकणारे हजारो जीव मुंबईत आहेत… कोणी ढोलकी वाजवून पोट भरत होत तर कोणी गाण म्हणून… पण आता त्यांच्या पोटाची खळगी भरणारी लोकलच बंद झाली त्यांनी करायचं काय? हीच परिस्थिती प्लॅटफॉर्म वर भीक मागणाऱ्या, मंदिरापुढं हात पसरवणाऱ्यांची आहे कारण जिथं बसून ते हात पसरत होते ती देवळच आता बंद झालीत…
सोलापुरात भिक मागणाऱ्या भिकाऱ्यांने देखील जनता कर्फ्यूच स्वागत केलय… त्याच बोलण ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्या शिवाय राहणार नाही…. चहा, पाणी, खान काहीच मिळालं नाही पण तरी चालेल आम्ही सांभाळून घेऊ ही समजूतदार पणाची त्याची भावना बरच काही सांगून जाते… एवढी शांत मुंबई मी मुंबईत आल्यापासून मागच्या साडेतीन वर्षात पहिल्यांदा पाहीली असेल… मुंबईच झालेलं लॉक डाऊन पुन्हा लवकरच सेट डाऊन व्हावं ही आशा… या संकटावर मात करण्यासाठी सगळ्यांना बळ मिळावं एवढीच प्रार्थना….
-दुर्गेश राजमाने.
coronavirus news Marathi
Leave a Reply