
कॅन्सरला कारणीभूत चुकीचा आहार ठरू शकतो ? मेनका गांधी
दिल्ली 7 oct 2017
स्तन कर्करोगाच्या वाढत्या समस्येस पायबंध घालण्यासाठी आशियाई सोसायटी ऑफ मास्टोलॉजी (एएसओएमए)द्वारे तीन दिवसीय संमेलनाचे आयोजन केले आहे. गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या संमेलनामध्ये केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी देखील सहभागी झाल्या होत्या, त्या बोलताना म्हणाल्या की चुकीचा आहार हा कॅन्सरसाठी कारणीभूत ठरत आहे. आहारातील जन्क फूडचे वाढते प्रमाण त्याचबरोबर अन्नपदार्थातील भेसळ ही एक खूप मोठी समस्या समोर उभी राहिली आहे. डॉक्टरांनी महिलांमधील वाढत्या स्तन कर्करोगाविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यावर पायबंध घालण्यासाठी महिलांना प्रबोधनाची गरज आहे. त्याचबरोबर चिंतेचा विषय हा आहे की डॉक्टरांमध्ये प्रबोधनाची देखील गरज आहे. डॉक्टर पेशंटचा विलाज तर करत आहेत परंतु त्यांनी काय खाल्ले पाहिजे काय पथ्य पाळली पाहिजेत, याविषयी मार्गदर्शन करत नाहीत. त्यांनी MBBS च्या विध्यार्थ्यांना आहार शास्त्राचे धडे देण्याचाही आग्रह केला. डॉक्टरांच्या मते देशात दरवर्षी दीड लाख महिलांना स्तनाचा कर्करोग होतो.हे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये अधिक वाढलेले दिसून येते, याचे कारण चुकीची जीवनपद्धती आणि आहार या गोष्टी जास्त परिणाम करणाऱ्या आहेत. health tips in marathi
त्याचबरोबर उशिरा होणारे विवाह हि बाब देखील कर्करोगास कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. आयोजन समितीचे अध्यक्ष आणि एम्स च्या जनरल सर्जरी विभागाचे डॉ. अनुराग श्रीवास्तव म्हणाले कि दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता,बंगळूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्तन कर्करोगाने ग्रासलेल्या महिलांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. ग्रामीण भागात शहरांच्या तुलनेत कमी प्रमाण आहे, याचे कारण असे आहे की गावाकडील महिलांना श्रमाची कामे जास्त असतात आणि आहारही जास्त करतात, त्याच्या तुलनेत शहरी महिलांमध्ये दररोजची धावपळ यामुळे लग्न उशिरा करतात. त्याचबरोबर दररोज व्यायाम तसेच आहारात हिरव्या पालेभाज्या यांची कमतरता अधिक दिसून येते. या संमेलनात अमेरिका, इंग्लंड तसेच देशांमधील डॉक्टर देखील सहभागी झाले आहेत.
कॅन्सरला कारणीभूत चुकीचा आहार ठरू शकतो ? मेनका गांधी
Leave a Reply