Marathi lekh Marathi Kavita एका दिवसाच सोनं लुट लो
Marathi lekh Marathi Kavita
दसऱ्याच्या निमित्ताने ज्याने त्याने ज्याचे त्याचे अवजार धुतले पुजले सुट्टी तर असतेच वर शुभ मुहुर्त वह्य पुस्तकांवर
स्वस्तिक वगैरे काढून झालं. सायंकाळी गांधी टोपीची आठवण झाली कपाटात गर्दितुन तिला बाहेर काढली. डोक्यावर.
सोबतीला नऊ दिवसाचा तुरा खोसला. आरशात पाहील तर स्वत: कडे बघून राजा किंवा असच काहीतरी नवीन वाटलं मग
काय आज गावभर सोनं वाटून टाकू असं ठरवलं. आपट्याची पानं उचलली. एक एक घर सुरू केलं. सपांनाच ना राव. जोतो
सोनच वाटत होता. जेवढ घेऊन गेलो त्याच्या चार पट येताना घेऊन आलो. दिल्यान वाढते हा काय प्रकार असतो याचा
देखील प्रत्येय आलाच. अनुभवाच्या झोळीत आणखी एका अनुभवाची भर टाकली. अनुभव गोळा करण्याचा छंद.
Marathi lekh Marathi Kavita एका दिवसाच सोनं लुट लो
सध्याकाळी घरी आलो विचार करायला वेळ होताच असतोच असं म्हण्टलं तरी चालेल . विचार करू लागलो ह्या सोण्याचं
आता करायचं कायं. बॅंकेत टाकावं सोनाराला विकून टाकावं पण ते पिवळ सोनं मानतात . म्हणजे हे सगळं आपल्या
मान्य करण्यावर अवलंबून आहे तसं नसतं तर एका दिवसासाठी आपट्याला सोन्याच महत्व आलच नसतं . मानो या ना
मानो लेकिन पापी पेट का सवाल है । एक दिन का सोना है भै लूट लो।
-अभिजीत हजारे.
Leave a Reply