Marathi kavita on Nature
मला पर्वता सारखं विशाल व्हायचय
निरागस निरंकार वर्षानुवर्ष अखंड प्रचंड
उनात तळपणारा पावसात भिजणारा व्हायचय
जसं पर्वताच्या कुशीत असणारं घर
डोंगराला सावली देणारं झाड
डोंगर द-यातून वाहणारा ओढा
त्या सर्वांच विश्व व्हायचय
जसं क्षणिक जगणारं फुलपाखरू
ऋतू प्रमाणे रंग बदलणारं गवत
झाडाची गळणारी पान व्हायचय
जसं खडकांची होणारी झीज
उभं आयुष्य दुसऱ्यासाठी जगणारं झाड
फुलांचा दळवळनारा सुगंध
मला कोणाचच नसून सगळ्यांच व्हायचय
-अभिजित हजारे.
Marathi kavita on Nature. निसर्गावर आधारित मराठी कविता.
Leave a Reply