5 Ayurvedic Hair care tips Gharguti Upay for hair in Marathi language.
5 Ayurvedic Hair care tips Gharguti Upay for hair in Marathi language
नमस्कार, सध्याचा धावपळीचा युगात शिक्षण, करियर, नौकरी, व्यवसाय या सगळ्यांमध्ये तरुण इतका गुरफटला आहे की त्याला त्याचा आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही किंवा तो दुर्लक्ष करतोय. आरोग्याचा समस्यांना गांभीर्याने घेत नाही. यात केसांचे आरोग्य देखील धोक्यात आहे. तर चला मित्रांनो आज आपण केसांची काळजी कशी घ्यावी? केस गळती वर घरगुती उपाय, केसांचे आरोग्य कसे सुधारावे, टक्कल वर उपाय.याबद्दल आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा college catta वर जाणुन घेऊयात.
आज केसांची समस्या म्हणजे केस जास्त प्रमाणात गळणे, केस पातळ होणे, कोंडा होणे, टक्कल पडणे, तुटणे, केसांचा शेंड्याला दोन तोंडे फुटणे तसेच तरुण वयातच केस पांढरे होणे या समस्या तरुणांमध्ये जाणवतात.
केस गळण्याची कारणे kes galane
केस गळतीवर उपाय, केस वाढवण्यासाठी काय करावे हा प्रश्न पडण्यागोदर केस गळण्याची कारणे समजून घेणे खूप आवश्यक आहे. कारण केस गळण्याची कारणे समजून घेतल्यावरच केस वाढण्यासाठी उपाय आपण करू शकतो.
कुठलीही आरोग्याची समस्या संतुलित आहार नसेल तर उद्भऊ शकते. यात केसांना देखील पोषक तत्वांची आवशक्यता आहेच. कारण केस देखील शरीराचा एक भाग आहे. फास्ट फूड, जन्क फूडचे तेलकट पदार्थांचे सेवन, अवेळी खाणे या सगळ्यामधून खालील पोषक तत्वांची कमतरता शरीराला पडू शकते. यातूनच केसांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
विटामिन बी B-Vitamins
विटामिन बी चा कमतरतेमुळे केस गळू शकतात. केसांचा वाढीसाठी विटामिन बी म्हणजेच बियोटीन Biotin ची आवशक्यता असते.
दुध, अंडी, मासे, चीझ, मशरूम, बटाटे, पाले भाजा या मध्ये बियोटीनचे प्रमाण जास्त आहे.
विटामिन डी, ई, लोह, झिंक, आणि प्रथीनाची केस वाढीसाठी आवशक्यता असते.
बदाम, गुळ शेंगदाणे, आणि फळॆ आहारात असावीत.
व्यायामाचा आभाव, अनियमित दिनचर्या
अनियमित दिनचर्या कुठल्याही चांगल्या शरीराचे, आरोग्योचे संतुलन बिघडवण्यासाठी पुरेशी गोष्ट आहे. वेळेवर जेवणे, झोपणे, तसेच पुरेसा व्यायाम करणे गरजेचे आहे.
केस शाम्पूने जास्त वेळा धुतल्यामुळे देखील केस पातळ होतात.
धुळीचा संपर्क
सतत धूळ माती केसात जाऊन कोंडा, डोके खाजवणे या समस्या वाढू शकतात. आणि केस गळू शकतात. ज्यांना दुचाकीचा रोजचा प्रवास आहे त्यांनी हेल्मेट, रुमाल, स्कार्पने केस झाकावेत. म्हणजे धूळ माती पासून केसांचे संरक्षण होईल.
केस गळतीवर घरगुती उपाय केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय Gharguti Upay for Hair in Marathi
आयुर्वेदाने तसेच योगाने आपल्याला खूप काही दिले आहे. पण आपण पाचात्य संस्कृतीचा नावाखाली आयुर्वेदाचे महत्व विसरतो.
Ayurvedic Tips for Hair Growth in Marathi
शिर्षाषण
शिर्षाषण करणे अवघड आहे पण अशक्य नाही. मी इयत्ता पाचवीत असल्यापासून शिर्षाषण
करेत. लट्ठपणा नसेल तर शिर्षाषण करण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नाही. शिर्षाषण केल्यामुळे डोक्याला, मेंदूला जास्त रक्तपुरवठा होतो. रक्तपुरवठा जास्त झाल्याने रक्तात असलेले पोषक मुल्ये केसांना मिळतात पर्यायाने केसांची वाढ चांगली होते. केस दाट होतात.
शिर्षाषण करताना सुरवातीला आधार घेण्यासाठी भिंतीचा वापर करावा. उचित मार्गदशन घेतल्यावरच हा प्रयोग करावा.
Ayurvedic hair care tips in Marathi Gharguti Upay for hair in Marathi. Kes Vadhavnyache upay Marathi. kes vadnyache upay
कोरफड
कोरफड ही आरोग्यदायी आहे. कोरफड विविध आजारावर समस्येंवर रामबाण उपाय आहे.
कोरफडीचा गर काढून त्याचा जूस करावा. किंवा कोरफडीचा गर तसाच केसांना चोळावा आणि एका तासानंतर केस कोमट पाण्याने धुवून काढावेत किंवा अंघोळ करावी.
केस गळती थांबली आहे हे तुम्हाला एक दोन दिवसात लगेचच जाणवेल. केस मऊ होतील. केसातील कोंडा नाहीसा होईल. कोरफड तुम्ही कुंडीत लाऊ शकता, म्हणजे तुम्ही लागेल तेव्हा घरचा घरी कोरफड लाऊ शकता.
आवळा शिकेकाई kesatil konda in marathi
आवळा शिकेकाई पाट्या वरवाट्यावर वाटून केसांना लावावा. केस पाण्याने धुवून काढावेत. कोंडा व केस गळती थांबेल.
केस वाढवण्यासाठी काय करावे?
बदाम तेल किंवा खोबरेल तेलाने मसाज
केस वाढीसाठी उपाय. रात्री झोपताना तेलाने मसाज केल्यामुळे केसांचा नसाचा व्यायाम होतो. तसेच तेल केसांचा मुळा पर्यंत पोहचल्यामुळे केस मजबूत होतात. केस गळती थांबते आणि नवीन केस येण्यासाठी मदत होते.
कांदा
कांद्याचा रस केसांना लावावा 30 मिनिटानंतर केस धुवावेत. केस गळती थांबेल.
अंडी
अंड्याचा पांढरा भाग काढून केसांना लावावा. काही वेळाने सध्या पाण्याने केस धुवून काढा.
कोरफडीचे पान कापून त्यात मेथी भरावी. काही दिवसानंतर मेथीला कोंब फुटल्यानंतर मेथी वाटून घ्यावी. वाटलेली मेथी खोबरेल तेलात तळावी. मेथीचा चोथा काढून टाकावा. उरलेले तेल रोज केसांना लावावे.
टक्कल पडल्यावर उपाय
केसांचा आरोग्याची निट काळजी घेतल्यावर टक्कल पडण्याची समस्या होऊच शकत नाही. टक्कल पडण्याची जनुकीय. हार्मोनल करणे देखील आहेत.
लसणाचा पाकळ्या डोळ्याला लावणाऱ्या काजळाबरोबर वाटाव्यात. या चटणीला टक्कल पडलेल्या भागावर लावा वीस-तीस दिवस हा लेप रोज लावावा.
तसेच कोथिंबिरीचा रसाने मसाज केल्यावर फायदा होऊ शकता.
5 Ayurvedic Hair care tips Gharguti Upay for hair in Marathi language
केसांचा आरोग्यासाठी संतुलित आहार घेतला तर केस गळणे थांबेल. पण त्याच बरोबर वेळेवर झोप आणि व्यायामाची देखील आवशक्यता आहे.जेणेकरून हार्मोनल चेंजेसने केस गळती होणार नाही. केस गाळती हे केस गळतीवर घरगुती उपाय आवडले असले तर नक्कीच प्रतिक्रियेद्वारे आम्हाला कळवा.
-डॉ. मयुरी हजारे.
Leave a Reply