पूर्वी पासूनच गुळ हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग होता. गुळ हा गोड धोड पदार्थ बनवण्यात वापरला जातो. त्याचबरोबर विविध औषधामध्ये गुळ वापरला जातो. थंडी खूप वाढतेय. हिवाळा काहींना मानवतो तर काही आजारी पडतात. शेंगदाण्याची चिक्की सगळ्यांनी खाल्लीच असेल. आज जाणुन घ्या गुळ शेंगदाणे खाण्याचे फायदे तुमच्या आवडत्या कॉलेज कट्टा वर जिथे नवनवीन माहिती तुमची वात बघत असते. नुसताच गुळ किंवा फक्त शेंगदाणे खाण्याचा फायदा होतोच पण गुळशेंगदाणे एकत्र खाण्याचे फायदे अधिक आहेत. याचे मिश्रण हे आरोग्यदायी आहे. हिवाळ्यात शरीरातली उष्णता टिकवण्यासाठी गुळशेंगदाण्याचे लाडू करून खाल्ले जातात.
गरोदर महिलांना गुळशेंगदाण्याचे होणारे फायदे.
गरोदर महिलांनी गुळशेंगदाणे खाल्याने त्यांचे रक्ताभिसरण व्यवस्थित होतं.तसेच यूटरसच फंक्शन प्रॉपर होते. गुळशेंगदाणे मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायक ठरते.
गुळशेंगदाणे खाण्याचे फायदे
- गुळशेंगदाण्यात प्रथिने आणि कैल्शियम आहे. यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात.
- यात ओलेक एसिड आहे म्हणून गुळशेंगदाणे खाल्याने कोलेस्ट्रॉलची लेवल कंट्रोल मध्ये राहते. हृदयाचे विकार तुमच्यापासून लांब राहतील.
- यात सेलेनियम सारखे एंटीऑक्सीडेंट्स असतात जे फर्टिलिटी रिलेटेड प्रॉब्लेम पासून तुम्हाला वाचवतील.
- फाइबर्स पोटाचे प्रॉबलेम पासून वाचवतात उदा; एसिडिटी.
- गुळामध्ये मैग्नीशियम, पोटेशियम, मोठ्या प्रमाणात असते.
- गुळशेंगदाणे खाल्याने हिमोग्लोबिनच प्रमाण वाढते.
- गुळ पोटात गँस होणे. अपचन होणे या समस्यांना दूर ठेवतो. जेवण केल्यानंतर गुळाचा खडा खाल्याने पचनास मदत होते. Marathi Arogya Salla Diet in Marathi.
हे गुळशेंगदाणे खाण्याचे फायदे माहिती कशी वाटली हे नक्की प्रतिक्रियेद्वारे कळवा.
Leave a Reply