शेअर बाजार झुगार की बुद्धिबळाचा डाव… उत्तर मिळवायचय तर बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्याबद्दल ही माहिती तुम्हाला मार्गदर्शक नक्कीच ठरेल…
Rakesh Jhunjhunwala information Biography in Marathi Rakesh Jhunjhunwala Success Story in Marathi
राकेश झुनझुनवाला
शेअर मार्केट बद्दल सामान्य माणसाच्या मनात नेहमीच कुतुहल राहिले आहे. शेअर मार्केटच्या घोटाळ्यांचे मोठे मोठे आकडे ऐकून खरच सामान्य माणसे थक्क होतात. आणि आता अलिकडेच आलेली हर्षद मेहतावर आधारित वेब सिरीज़ मुळे तर याची उत्कंठा अधिकच वाढली म्हणूनच शेअर बाजारतील “Bigg Bull” म्हणून आणि भारताचे वॉरेन बफे संबोधले जाणारे अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला याबद्दल लिहिन्याचा हा प्रयत्न.
Rakesh Jhunjhunwala Success Story in Marathi
राकेश झुनझुनवाला म्हणजे शेअर बाजारातील एक मोठं नाव. यांच्या यशाची कहाणीदेखील मोठी रंजक आहे. घरात मित्रांबरोबर शेअर्स, स्टॉक मार्केट बद्दलच्या गप्पा लहान मुलाच्या कानावर पडतात आणि तो मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की शेअर्सच्या किमती का बदलतात, त्याच्यावर त्याचे वडील त्याला उत्तर द्यायचे न टाळता सांगतात की, “जा, वर्तमानपत्रामध्ये ग्वालियर-रेयॉन बद्दल काही बातमी आली आहे का बघ आणि असेल तर त्याच्या शेअर्सची किंमत नक्कीच बदलणार!” या एका वाक्यावरून त्या मुलामध्ये शेअर मार्केटबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि एक दिवस तो याच शेअर मार्केटचा राजा बनतो. अगदी फिल्मी वाटणारी ही खरी गोष्ट आहे, एका सर्वसामान्य भारतीय कुटुंबातील राकेश झुनझुनवाला यांची.
राकेश झुनझुनवाला माहिती मराठी
Rakesh Jhunjhunwala family in Marathi
१९६० साली मुंबईमध्ये एका सामान्य गुजराथी कुटुंबात जन्मलेल्या राकेश झुनझुनवाला यांचे वडील आयकर विभागात अधिकारी होते आणि सोबतच त्यांना शेअर मार्केट मध्येदेखील पैसे गुंतवण्याची आवड होती. मोठे झाल्यावर जेव्हा राकेश भाईंनी त्यांच्या वडिलांकडे शेअर मार्केट मध्येच करिअर करायची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना आधी नीट शिक्षण घेण्याचा सल्ला दिला म्हणजे नंतर शेअर मार्केटमध्ये नीट जम नाही बसला तरी हातात ठोस काहीतरी पैसे कमावण्याचे साधन राहील. त्यानुसार त्यांनी १९८५ साली चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुन्हा राकेश भाईंनी त्यांचा वडिलांजवळ शेअर मार्केटमध्येच करिअर करायचा मानस बोलून दाखवला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना हवे ते करिअर करण्याबद्दल सांगितले परंतु आपण कोणतीही आर्थिक मदत करणार नाही असे स्पष्ट सांगितले.
अशा प्रकारे १९८५ – ८६ मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी शेअर्सच्या व्यवसायास सुरुवात केली. जेव्हा त्यांनी शेअर्स बाजारात गुंतवणुकीस प्रारंभ केला तेव्हा सेन्सेक्स १५० पॉईंट्स इतका होता (आता सेन्सेक्सचे मूल्य ३५००० पॉईंट्स इतके आहे). राकेश भाईंकडे गुंतवण्यासाठी फक्त ५००० रुपये होते आणि एवढ्याशा पैशांमध्ये त्यांना फार काही लाभ होऊ शकणार नाही याची त्यांना खात्री होती म्हणून त्यांनी त्यांच्या भावाच्या एका मित्राकडून फिक्स डिपॉझिट मधून मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त नफा मिळवून देण्याच्या शब्दावर अडीच लाख रुपये मिळवले. १९८६ मध्ये त्यांना शेअर्स मधून चांगला नफा झाला. त्यांनी टाटा टी कंपनीचे ५००० शेअर्स प्रत्येकी ४३ रुपयांना विकत घेतले व ते १४३ रुपये प्रति शेअर्स या किमतीला विकले. त्यानंतर मग त्यांच्या शेअर्स मधील गुंतवणुकीवरील नफ्याचा आलेख वाढतच गेला.
राकेशजींना १९८६ ते १९८९ या कालावधीमध्ये साधारण २० ते २५ लाखांपर्यंतचा नफा झाला. त्याचप्रमाणे टाटा पॉवर लि. मध्ये त्यांनी केलेल्या २० लाखांच्या गुंतवणुकीत त्यांना दुपटीपेक्षाही अधिक म्हणजे जवळजवळ ५०.५ लाखांएवढा लाभ झाला आणि इथूनच त्यांच्या शेअर्स मार्केट मधील करिअरला खरी गती प्राप्त झाली. सुरुवातीला राकेशजींनी केलेल्या काही महत्वाच्या गुंतवणुकींमध्ये सेसा गोवाचे त्यांनी ४ लक्ष शेअर्स त्यांनी आधी ६५ रुपये प्रति शेअर्स आणि दुसऱ्या भागात १५० रुपये प्रति शेअर्स या किमतींना घेतले ज्यांची किंमत नंतर २२०० रुपये प्रति शेअर्स इतकी झाली आणि त्यातून त्यांना चांगला डिव्हीडेंटही मिळाला. यानंतर प्राज इंडस्ट्रीज लि. मध्ये त्यांनी जास्त काळासाठी पैसे गुंतवले. जेव्हा त्यांनी यातले शेअर्स घेतले तेव्हा त्यांची किंमत ५५०० पॉईंट्स इतकी होती आणि जेव्हा हे शेअर्स त्यांनी विकले तेव्हा याच शेअर्सची किंमत १२००० पॉईंट्स इतकी झाली होती. म्हणजेच त्यांनी जवळ जवळ २५० पट्टींनी यामध्ये नफा कमावला. यानंतर त्यांना कधीच त्यांच्या शेअर्स बाजारातील करिअर मध्ये मागे वळून पाहण्याची गरज नाही पडली.
२००२-०३ सलालमध्ये राकेशजींनी टायटन कम्पनी लिमिटेडया टाटाच्याच घड्याळाच्या ब्रँडमध्ये पैसे गुंतवले ज्यांची त्या वेळची किंमत साधारण ३ रुपये प्रति शेअर्स इतकी होती आज त्याच शेअर्सची किंमत साधारण ८१७ रुपये प्रति शेअर्स इतकी आहे.
आज राकेश झुनझुनवाला यांची स्वतःची “रारे एन्टरप्राइजेस” (Rare Enterprises) नावाची कंपनी आहे. या कंपनीचे नाव त्यांनी स्वतःच्या नावामधील आद्याक्षर ‘रा’ (Rakesh Jhunjhunwala) व त्यांची पत्नी सौ. रेखा (Rekha) यांच्या नावामधील अक्षरे आद्याक्षर ‘रे’ असे एकत्र करून ठेवले आहे.
या सर्व प्रवासात आपल्या कुटुंबाचे आपल्याला कशा प्रकारे सहकार्य लाभले हे सांगताना ते आवर्जून सांगतात की आई-वडील, भाऊ यांच्यासोबतच त्यांची पत्नी त्यांच्या या सर्व वाटचालीत कायम त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी होती. त्यांची आई त्यांना नेहमी म्हणायची की घरातील प्रत्येक पुरुषमागे एका स्त्रीचे पाठबळ असल्यास तो नक्की यशस्वी होतो. जास्त कालावधीसाठी पैसे गुंतवणे जास्त लाभ मिळवून देते की कमी कालावधीतील गुंतवणुकीत जास्त नफा होतो असे विचारले असता राकेशजी सांगतात, “कमी कालावधीतील गुंतवणूक कमी कालावधीत लाभ मिळवून देते आणि जास्त कालावधीतील गुंतवणूक ही जास्त कालावधीतील भांडवल गुंतवणुकीच्या दृष्टीने लाभदायी ठरते.
माझ्या गुंतवणुकींमधील मूल्यांमुळे मला तांत्रिक विश्लेषण करून त्यानुसार गुंतवणूक नक्की कशामध्ये करायची हे ठरवणे शक्य होते. या दोन्ही प्रकारातील गुंतवणूक एकमेकांच्या साहाय्याने तुम्हाला चांगला लाभ मिळवून देते परंतु हे दोन्ही परस्पर भिन्न प्रकार आहेत.”राकेश झुनझुनवाला यांच्या म्हणण्यानुसार ज्याला शेअर्स बाजाराबद्दल विशेष आकर्षण आणि रुची असेल त्याला शेअरबाजारात नक्की लाभच होईल कारण तुम्हाला ज्या ही क्षेत्रात विशेष रुची असेल त्या क्षेत्रात तुम्ही कधीही मागे पडत नाही, त्यात तुमची कधीही अधोगती होत नाही.
राकेश झुनझूनवाला यांची Titan Company मध्येही मोठी भागिदारी आहे.
- Titan कंपनीत 32 टक्के म्हणजेच 6850 कोटींची भागिदारी आहे. तज्ज्ञांच्या मते टायटनच्या शेअरची किंमत येत्या काही दिवसात 1650 रुपयांपर्यंत पोहचू शकते. सध्या या शेअरची किंमत 1400 रुपयांच्या जवळापास आहे. कारण सध्या सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरते. टायटन देशातील अग्रणी ज्वेलरी ब्रांड आहे.
अशी ही गुंतवणूकीचे बादशाह समजले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्याविषयी माहिती
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
Rakesh Jhunjhunwala information Biography in Marathi
Rakesh Jhunjhunwala Story in Marathi
Rakesh Jhunjhunwala family in Marathi
Big Bull Rakesh Jhunjhunwala
Share Market Hero in India
राकेश झुनझुनवाला माहिती मराठी
Leave a Reply