Diabetes food list in Marathi मधुमेह आहार मराठी Information about diabetes in marathi language
आज १४ नोव्हेंबर संपूर्ण विश्वभरात मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो ,इंटरनेशनल डायबिटीज फेडरेशन (आईडीएफ) च्या अधिपतत्याखाली हा दिवस साजरा केला जातो. या वेळेस आईडीएफच्या नुसार वर्ल्ड डायबिटीज डे ची थीम ‘महिला आणि डायबिटीज अशी आहे. आईडीएफ च्या आकड्यानुसार सध्या वर्तमान काळात दुनियाभारात १९९ मिलियन महिला डायबिटीज ने ग्रस्त आहेत. हा आकडा २०४० पर्यंत आणखी वाढू शकतो
चला तर बघुयात हा मधुमेह आजार नेमका काय आहे? Information about diabetes in marathi language
या आजाराचे खरे कारण म्हणजे माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्सूलीन तयार करू शकत नाही. दुसरे कारण म्हणजे शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. या दोन्ही प्रकारामध्ये पेशींमधल्या ग्लूकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा तयार होतो. मधुमेहाच्या रुग्णांना मूत्रविसर्जनाला वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, मूत्रमार्गाची जळजळ, वजन कमी होणे, अशी लक्षणे यामध्ये दिसून येतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे तसेच औषधोपचार किंवा काहीं रुग्णामध्ये दररोज इन्सूलीन इंजेक्शन घेणे. म्हणजे इन्सुलिन चे प्रमाण कमी किंवा अधिक झाले तर हा आजार होऊ शकतो.
इन्सुलिन काय आहे? इन्सुलिन हे हार्मोन आहे
मधुमेह या आजाराचे दोन प्रकार आहेत.
पहिला प्रकार
पहिल्या प्रकारचा मधुमेह बालवयात किंवा प्रौढावस्थेमध्ये प्रकट होतो. या प्रकारात इन्शुलिन शरीरात अत्यंत कमी तयार होते किंवा अजिबातच तयार होत नाही.
दुसरा प्रकार
हा मधुमेह पन्नाशीच्या आत शक्यतो होत नाही. नव्वद टक्के रुग्ण या दुसर्या प्रकारच्या मधुमेहानेच ग्रासलेले असतात. हा मधुमेह प्रौढावस्थेमधील किंवा वयोमानानुसार होणारा मधुमेह म्हणतात. वजन जास्त असणार्या बैठे काम करणार्या, शारीरिक हालचाल कमी व व्यायाम न करणार्या व्यक्तींना दुसर्या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.
Diabetes food list in Marathi मधुमेह आहार मराठी
मधुमेह या आजाराच्या रोगींना आहारावर खूप नियंत्रण ठेवावे लागते. आहारातला निष्काळजी पणा आजारी व्यक्तीला खूप त्रासदायक ठरतो पण शरीराच्या गरजेसाठी मधुमेहाच्या रोग्यांना देखील पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. अनियंत्रित आहार इतर आजाराणा बळी पडण्यास कारानिभूत ठरू शकतो.
मधुमेह रोग्यांनी गोड खाणे मिठाई, चॉकलेट, साखर, केळी, तळलेले पदार्थ, सुका मेवा, चिक्कू, सीताफळ इत्यादी खाऊ नये. तसेच जास्त प्रमाणात खारट आणि आंबट खाऊ नये.
मधुमेह रोग्यांनी काय खावे Diabetes food list in Marathi
- तुरट, कडू पदार्थ खावेत.
- उदा. कारले यात कैरेटिन हे रसायन आहे यामुळे रक्तातली साखर नियंत्रित होते. कारल्याचा जूस उपाशीपोटी घेणे हे मधुमेह रोग्यांना फायद्याचे ठरू शकते.
- पचन होण्यास हलका तसेच फायबरयुक्त आहार घ्यावा .
- आतड्याना साफ ठेवण्यास मदत करनारे ,लवकर पचणारे फळे उदा. टरबूज, पपई, बोर इत्यादी फळे खावीत.
- मधुमेह रोग्यांनी तरल पदार्थ घ्यावेत. उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप प्यावेत.
- मधुमेह रोग्यांनी पुरेशी झोप घ्यावी अपुरी झोप आरोग्यावर विपरीत परिणामकारक ठरू शकते.
मधुमेह रोग्यांनी डॉक्टरांच्या मदतीने स्वताची आहाराची कामाची दिनचर्या ठरवावी याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
Leave a Reply