या माहितीचा वापार करून नक्कीच तुम्हाला धुम्रपान सोडता येईल. धुम्रपान करण्याचे तोटे, व्यसन का लागते ही माहिती नक्कीच तुमचा फायद्याची ठरेल. Dhumrapan Smoking Kills Information Effects Mahiti in Marathi Language
Dhumrapan Smoking Kills Information Effects Mahiti in Marathi Language
Dhumrapan Essay Nibandh in Marathi
धूम्रपान म्हणजे काय ?
सर्वसाधारणपणे धुम्रपान करण्याचा सरळ सरळ अर्थ धूर ओढणे असा होतो. सध्या धुम्रपान करण्यासाठी तंबाकू, अफिम आणि इतर नशा देणाऱ्या पदार्थानाचा वापर केला जातो. आज धुम्रपान करण्यासाठी सिगारेट, चिलीम (गांजा), बिडी, पाईप, हुक्का या पद्धतीचा वापर केला जातो.
इतिहासात डोकावून बघितले तर धुम्रपान करण्याचा इतिहास हा इ.पू ५००० वर्षापासून आहे. त्याकाळी धार्मिक कार्य करण्यासाठी करण्यासाठी तंबाखू आणि इतर नशा देणाऱ्या पदार्थांचे धुम्रपान हे समाधी मध्ये जाण्यासाठी केले जाई.
2007 च्या रिपोर्टनुसार जगभरात दरवर्षी 49 लाख लोक धूम्रपानाने आजारी पडून मरतात. जगात 1.1 बिलिअन लोक धुम्रपान करतात.
हे कधी फॅशन, कधी मज्जा, कधी टेन्शन आहे म्हणून तर कधी मित्रांसोबत अनेक जन धुम्रपान करत असतात. धुम्रपान केल्याने त्या व्यक्तीस थोडेसे उत्तेजित किंवा आनंदी झाल्यासारखे वाटते. याचामागील शास्त्रीय कारण असे की तंबाखू मधील निकोटीन हा पदार्थ आपल्या शरीरातील डोपामिन वाढवतो यामुळे धुम्रपान करणारी व्यक्ती आनंदी आणि उत्साही होते.
डोपामिन म्हणजे काय?
डोपामिन हे आपल्या शरीरात अस्तित्वात असतेच. डोपामिन हे plessure nurotransmitor आहे जे आपल्या चेतारज्जू द्वारा मेंदूपर्यंत सिग्नल पोहचवते हा संदेश मुखातः आनंदाचा निगडीत असतो. अति धुम्रपान करणारी व्यक्ती शरीरात डोपामिन रिलीज करण्यासाठी स्वतः ला व्यसन लाऊन घेते ज्यामुळे धुम्रपान करण्याची इच्छा होते.
धुम्रपान केल्यामुळे काय होते?
जेव्हा एखादी व्यक्ती धुम्रपान करते त्यावेळेस धूर फुफ्फुसामध्ये पोहचतो. फुफ्फुसामधून तंबाखू मधील घातक घटक रक्तामध्ये शोसले जातात. रक्तामधून संपूर्ण शरीरात ते पसरतात. यात टार, निकोटीन, कार्बन मोनाँक्साईड याबरोबर 40 घातक रसायने.
धुम्रपानामुळे कित्येकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. या धूम्रपानाचा गंभीर परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होत असतो. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका प्रचंड आहे. आज जगातील एकूण फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना कॅन्सर हा धुम्रपानामुळे झालेला आहे.
धूम्रपान समस्या निषेध मराठी माहिती
धुम्रापानातील घातक घटक-
- टार– धुम्रपान करतांना तंबाखूमध्ये टार नावाचा घटक आढळतो. हा घटक धुरासोबत मिसळून आपल्या फुफ्फुसावर गंभीर परिणाम करतो.
- निकोटीन– निकोटीन याच रसायनामुळे सतत धूम्रपान करण्याच व्यसन लागतं. कारण निकोटीन हे रसायन व्यसन लावणारं रसायन म्हणून ओळखल जातं.
- बेन्झीन- बेन्झीन या घटकामुळे सिगारेट सतत पेटलेली राहण्यास मदत होते. यामुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका असतो.
- अमोनिया– टॅायलेट क्लीनर आणि ड्रायक्लिनिंग लिक्विड मध्ये वापरला जाणारा अमोनिया तंबाखूमधून निकोटीनला वेगळा करून त्याचा धूर बनवतो.
- अॅसीटोन– हे रसायन श्वासामार्फत फुफ्फुसात जाऊन टीबी, न्युमोनिया, दमा यांस कारणीभूत ठरते. त्यामुळे शक्यतो प्रत्येकाने या रसायनापासून लांबच राहायला हवे.
- कार्बन मोनाँक्साईड- रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.
Dhumrapan Smoking Kills Information Effects Mahiti in Marathi Language
धूम्रपानचे दुष्परिणाम मराठी
- अकाली वृद्धत्व- धुम्रपान करण्यामुळे आपले आयुष्य कमी होते.
- धूम्रपानाचा गंभीर परिणाम हा आपल्या फुफ्फुसांवर होत असतो त्यामुळे धुम्रपानामुळे ९० टक्के लंग्ज कॅन्सर चे रुग्ण निर्माण होतात.
- धुम्रपानामुळे फुफ्फुसांचे अनेक गंभीर आजार निर्माण होतात. त्यात श्वसनसंस्थेचे आजार होतात.
- उच्च रक्तदाब तसेच शरीरातील रक्तप्रवाह कमी जास्त हे त्रास व्हायला लागतात.
- हार्ट अॅटॅक तसेच हृदयरोग उत्पन्न होतात.
- धुम्रपानामुळे नपुंसकता निर्माण होते.
- धुम्रपानामुळे आपली त्वचा काळवंडते, रुक्ष होते, त्वचेच तेज कमी व्हायला लागते.
- त्वचेवर सुरकुत्या पडतात, म्हातारपण लवकर येते.
- तोंडाचे अनेक रोग उद्भवतात. मुखाचा कॅन्सर, अल्सर यासारखे आजार उद्भवतात.
- धुम्रपानामुळे पक्षाघाताचा धोका निर्माण होतो.
- डोळ्यांची दृष्टी कमजोर होणे, मोतीबिंदू तसेच डोळ्यांचे विकार उद्भवतात.
- धुम्रपानामुळे पचन संस्थेचे विकार उद्भवतात.
- सततच्या धुम्रपानामुळे प्रजनन संस्थेवर विपरीत परीणाम उद्भवतात.
धुम्रपान कसे सोडवाल ?
आयुष्यात कुठलीही गोष्ट परत परत केली की तिची सवय होते आणि सवयीच रुपांतर व्यसनात होतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीच व्यसनात रुपांतर होण्याआधी सावधान. या सगळ्या गोष्टी सोडवण अत्यंत कठीण असतं पण अशक्य मात्र नसते. चला पाहूया धुम्रपान हे व्यसन कस सोडवावं.
- सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेली सूचना व्यवस्थित वाचावी आणि नंतर आपल कुटुंब डोळ्यासमोर आनावे.
- इच्छा प्रबळ असावी धुम्रपान सोडण्यासाठी प्रथमता आपल्या मनाची इच्छा प्रबळ करावी. या संबंधी आपण आपल्या कुटुंब, मित्र यांना कल्पना द्यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपण धूम्रपानापासून दूर राहावे.
- धूम्रपानाची इच्छा झाल्यास लिंबूरस चाटावे. त्याने धूम्रपानाची इच्छा कमी होण्यास मदत होते.
- जेव्हा धूम्रपानाची इच्छा होईल तेव्हा त्याला पर्याय म्हणून वेलची, लवंग, ओवा, बडीशेप तोंडात टाका.
- मनावर कुठलाही ताण येणार नाही याची अत्यंत काटेकोर काळजी घ्यावी. ताणतणाव विरहित जीवन जगावे.
- जाहिरातीत दाखवलेल्या चित्रांकडे पाहावे.
- धुम्रपान सोडलेली सक्सेस स्टोरी वाचाव्यात.
- स्वताच्या मनाला सतत जाणीव करून द्यावी की आपण धुम्रपान करण सोडून दिल आहे.
- कॅन्सरग्रस्त लोकांना भेटी द्याव्यात आणि त्यांचे हाल समजून घ्यावेत.
- या जगात अशक्य अस काहीच नसत पण ते शक्य आहे हे सिध्द करून दाखवाव लागतं. त्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवेत.
- धुम्रपान सोडण्यासाठी आपल्या अवती भवती तसे वातावरण तयार करावे. यात धुम्रपान सोडण्यासाठी प्रोस्ताहन देणारे मित्र आणि जे धुम्रपान करण्यासाठी प्रोस्ताहन देतात अशा मित्रांना देखील सांगावे की मी ही सवय मोडत आहे.
माध्यमामध्ये टीव्ही, वर्तमानपत्र, इतर धुम्रपान, मद्य, नाशिले पदार्थ यांची समर्थनार्थ जाहिरात करण्यावर बंदी आहे.
मित्रांनो धुम्रपान याविषयी माहिती Dhumrapan Smoking Kills Information Effects Mahiti in Marathi Language Dhumrapan Essay Nibandh in Marathi तुम्हाला कशी वाटली हे खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या College Catta संकेतस्थळावर पुन्हा आवश्य भेट द्या. कारण ‘College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ’ जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सहज सोप्या भाषेत सादर केली जाते.
-भरत मोहळकर.
Dhumrapan Essay Nibandh in Marathi धूम्रपान म्हणजे काय धूम्रपानचे दुष्परिणाम मराठी धूम्रपान समस्या निषेध मराठी माहिती
Leave a Reply