भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आग्रगन्य नाव दानशूर अझीम प्रेमजी या डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्वा बद्दल जाणून घेऊयात… Azim Premji information Biography in Marathi अझीम प्रेमजी माहिती मराठी
अझीम प्रेमजी
माहिती तंत्रज्ञान उद्योगातील अग्रगण्य नाव. भारतातील बिल गेट्स म्हणून ज्यांना संबोधले जाते असे हे अझीम प्रेमजी.
“माझे वडील हशीम प्रेमजी यांनी Wipro ची स्थापना केली मी तर केवळ उत्पादनाची संख्या वाढवु शकलो.”
काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अझीम प्रेमजी यांनी केलेलं हे वक्तव्य त्यांच्यातील विनम्रता दाखवून जातं. १९४५ मध्ये त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या छोट्या उद्योगाचा वारसा त्यांना जरूर मिळाला; परंतु त्याचे आंतरराष्ट्रीय औद्योगिक कंपनीत रूपांतर करण्याचे श्रेय फक्त अझीम प्रेमजी यांचेच आहे. खाद्यतेल तयार करणाऱ्या वडिलोपार्जित व्यवसायाची सूत्रे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी घेतली आणि त्याला काळानुरूप नवी दिशा देत माहिती तंत्रज्ञान उद्योगातील अग्रगण्य ब्रँड म्हणून उभे केले.
दूरदृष्टी, सचोटी आणि शुद्ध व्यावसायिक नीतिमत्ता या गुणांच्या जोरावर त्यांनी ‘विप्रो’ला भारतीय औद्योगिक महत्त्वाकांक्षेचे प्रतीक बनविले.
‘इन्फोसिस’चे एन. आर. नारायणमूर्ती, ‘टीसीएस’चे एफ. सी. कोहली आणि ‘विप्रो’चे अझीम प्रेमजी या त्रिमूर्तीने भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा दबदबा जगभर निर्माण केला. ज्ञान हेच भांडवल मानून त्याच्यावर आधारित उद्योगासाठीची पोषकता देशात त्यांच्यामुळे निर्माण झाली. व्यावसायिक मूल्यांबाबत प्रेमजींनी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळेच ते कधी वादग्रस्तही ठरले नाहीत. त्यांची अर्ध्या शतकाहूनही अधिक असणारी औद्योगिक वाटचाल प्रेरणादायी तर आहेच; परंतु तुकोबांच्या ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ची प्रचीती देणारी आहे.सरंजामी मानसिकता, संपत्तीचे बटबटीत प्रदर्शन, सहकाऱ्यांकडे आश्रित म्हणून पाहण्याची दृष्टी ही भारतीय उद्योगपतींची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. त्या सर्वांना छेद देणारे वर्तन प्रेमजी करीत आले आहेत. सहकाऱ्यांच्या वाढीला पोषक असे वातावरण ते देत आले. म्हणूनच त्यांच्या अनेक सहकारी उद्योगाच्या नव्या वाटा धुंडाळून यशस्वी झाले.
देशातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेले प्रेमजी दानशूर आहेत. वॉरन बफे, बिल गेट्स यांच्याप्रमाणे त्यांनीही आपली निम्मी संपत्ती दान करण्याच्या संकल्प केला असून, तो ते प्रत्यक्षात आणत आहेत.
अझीम प्रेमजी यांचे बालपण
मुंबई येथील मुस्लिम कुटुंबात अझीम प्रेमजी यांचा जन्म झाला. अझीमजींचे वडील हशीम प्रेमजी हे प्रसिद्ध उद्योगपती! “Rice King of Burma” म्हणून त्यांना ओळखलं जायचं. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात हशीम प्रेमजींनी सुमारे 1945 साली “Western India Products Limited” या कंपनीची सुरुवात केली. सनफ्लावर वनस्पती म्हणून याठिकाणी घरगुती तेलाचं उत्पादन घेण्यात येत असे. शिवाय ७८७ नावाच्या साबणाचं देखील उत्पादन घेतल्या जाई. पाकिस्तानच्या निर्मितेचे जनक म्हणून ओळखल्या जाणारे मोहम्मद अली
अझीम जींच्या वडिलांना पाकिस्तानात जिन्नाचे आमंत्रण
जिन्ना यांनी अझीमजींच्या वडिलांना पाकिस्तानात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं, परंतु हशीम प्रेमजी यांनी ही विनंती फेटाळून भारतात राहणं पसंत केलं.
1966 साली हशीम प्रेमजींच्या निधनाची वार्ता ज्यावेळी अझीमजींना मिळाली त्यावेळी ते स्टेनफर्ड विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग या विषयात विदेशात शिक्षण घेत होते.
वडिलांच्या निधनामुळे ते भारतात परतले आणि कंपनीची जवाबदारी उचलली. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी आपल्या कुटुंबाची आणि व्यवसायाची जवाबदारी सांभाळली.
त्यावेळी ही कंपनी “Western India Products Limited” या नावाने आपली उत्पादनं निर्मिती करत होती, पुढे अझीमजींनी बेकरी फेट्स, लायटिंग प्रोडक्ट, हेयर केयर सोप्स, लहान बाळांसाठी उत्पादनं घेण्यास सुरुवात केली.
काळाची पावलं ओळखून अझीम प्रेमजींनी अमेरिकेतील सेंटीने या कंपनीच्या मदतीने मिनी कम्प्युटर निर्मितीत पाऊल ठेवलं. साधारण याच सुमारास त्यांनी आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘Wipro‘ असं ठेवलं. पुढे त्यांनी माहिती तंत्रज्ञानावर आपलं लक्ष केंद्रित केलं. अझीमप्रेमजी यांचा विवाह यास्मिन यांच्याशी झाला. त्यांना रिषद आणि तारिक ही दोन मुलं आहेत.
अझीम प्रेमजी यांनी निर्माण केलेल्या कंपनी
- विप्रो लायटिंग व विप्रो जीई मेडिकल सिस्टीम 1991
- विप्रो नेट/ Wipro Net -1999
- नेटक्रेकर/ Netcracker-2000
- विप्रो वॉटर/ Wipro water -2008
- विप्रो इकोएनर्जी / Wipro EcoEnergy -2009
अझीम प्रेमजी यांच्याविषयी विशेष गोष्ट म्हणजे इतके मोठे उदयोगपती असून देखील त्यांना विमान प्रवासा दरम्यान इकोनॉमी क्लास मधून प्रवास करायला आवडतं. याशिवाय मोठमोठ्या हॉटेल मधे थांबण्यापेक्षा कंपनीच्या गेस्ट हाउस मधे थांबणं ते जास्त पसंत करतात. अझीम प्रेमजी यांच्यातील परोपकाराचा गुण त्यांना इतर उद्योगपतींपासून वेगळं करतो. त्यांच्यातील सामाजिक जाणीव, दातृत्व यामुळे त्यांनी आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा समाजकार्या करता दिला आहे. त्यांनी केलेल्या या कार्यामुळे कित्येक गरजवंत मुलांना आज शिक्षणाच्या प्रवाहात आणणं शक्य झालं आहे…
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
मित्रांनो, Azim Premji information Biography in Marathi अझीम प्रेमजी माहिती मराठी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Azim Premji information Biography in Marathi
अझीम प्रेमजी माहिती मराठी
wipro company information in marathi
अझीम प्रेमजी माहिती मराठी
Leave a Reply