अचानक पोट दुखी सुरु झाली की सगळे काम सोडून आराम करावा लागतो. मग या सगळ्यात वेळ वाया जातो. पोट दुखत असेल तर हे घरगुती उपाय करून बघा लगेच आराम मिळेल.
पोट दुखत असेल तर हे घरगुती उपाय पोट दुखी वरील घरगुती उपाय
Potat Dukhane Gharguti Upay
रोजच्या धकाधकीच्या जीवनात छोटी मोठी दुखणे येत असतात. परंतु काम करताना आपण शक्यतो या बारीक सारीक दुखण्याकडे दुर्लक्ष करत असतो. जोपर्यंत थकवा येऊन आपल्याला ताप येत नाही किंवा हात पाय दुखून थकवा येत नाही तोपर्यंत आपण आपल्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही. सामान्यपणे हा प्रकार महिला गटात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. आपलं नेहमीच्या जीवनात वरचेवर पॊट दुखण्याचा त्रास हा आपाल्याला होत असतो. महिलांना मासिक पाळीदरम्यान देखील हा त्रास बऱ्याचदा सहन करावा लागतो. नीट निरीक्षण केले तर लहान मुलांमध्ये हा प्रकार प्रकर्षाने आढळून येतो.
जाणून घेऊयात पोटदुखीची कारणे
पोटदुखी बाहेरून दिसत नाही आणि कित्येकदा रुग्णाला पोटदुखीचे नेमके वर्णनही करता येत नाही. पोटदुखी म्हटले, की पचनसंस्थेत बिघाड झाला असावा, असे प्रथमदर्शनी वाटणे स्वाभाविक आहे. तथापि, पोटदुखीची अनेक कारणे असू शकतात.
मल-मूत्र अडवून धरणे, अधिक उपवास, खूप जास्त हसणे, बोलणे, अतिव्यायाम, जागरण, हरभरे, वाटाणे, तूर यांसारखी धान्ये किंवा रुक्ष पदार्थ खाणे, वारंवार अजीर्ण होणे, वेळी-अवेळी जेवणे, सुकलेल्या भाज्या खाणे यांसारख्या कारणांसोबतच अमांश, आम्लपित्त, वात यामुळे देखील पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
प्रजजन संस्थेचे विकार, मूत्रपिंडे आणि मूत्रवितरण संस्थेतील दोष, स्नायू आणि त्यांची आवरणे, रक्तवाहिन्यांचे आजार किंवा काही प्रकारच्या विषबाधा यांनी पोट दुखू शकते. पोटदुखी कधी कधी गंभीर आजाराची निदर्शक असू शकते. उदराच्या पोकळीत असणाऱ्या अनेक अंतःस्थ अवयवांच्या दोषाने पोटदुखी होते. या अवयवांच्या आजूबाजूला असणाऱ्या आतड्यांच्या अभ्रयातील दोष, यकृत, प्लीहा किंवा मूत्रपिंडे यांच्यावरील अभ्रे इथूनही वेदना निर्माण होते.
पोटातील व्रण किंवा जखम फुटणे, आंत्रपुच्छाचा (ॲपेडिंक्स) तीव्र दाह होणे, आतड्याला पीळ पडणे, स्वादुपिंडाला सूज येणे, पित्ताशयाला सूज येणे, यकृताला सूज येणे, मूतखडा, स्त्रियांत गर्भाशयाचे काही आजार, महारोहिणीचे आजार, या सर्वांखेरीज पोटाबाहेरच्या अवयवातील आजारांमुळेसुद्धा पोटात दुखू शकते.
न्यूमोनियासारख्या आजारांमध्ये बेंबीच्या उजव्या बाजूला दुखते. तर अंडाशयांच्या आजारामध्ये अंडाशयापासून पोटाकडे वेदना पसरतात. मधुमेहामध्येसुद्धा काही वेळा पोट दुखते आणि दुखण्याचे ठिकाण बदलत असते. नागीणसारख्या त्वचारोगात अचानक सुई टोचल्यासारखे दुखते. शारीरिक आजारांच्या जोडीने मानसिक व्यथांमुळेदेखील पोटात अनेक वेळा दुखू शकते.
लहान मुलांची पोटदुखी
लहान मुले सारखे काहीना काही गोड खातात यामुळे त्यांचा पोटदुखीचे कारण जंत देखील असू शकते. मग यासाठी डॉक्टरांचा सल्याने लहान मुलांना जंतनाशक गोळी तुम्ही देऊ शकता. इतर लहान मुलांची पोटदुखीवर खालील प्रमाणे उपाय करू शकता.
पोट दुखत असेल तर हे घरगुती उपाय
Potat Dukhane Gharguti Upay
पोट दुखी वरील घरगुती उपाय
- दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी. ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी. थोड्याच वेळेत पोटदुखीवर आराम पडेल.
- जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते.
- अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एकत्र करून थंड पाण्यासोबत घेतल्याने पोट दुखणे थांबण्यास मदत होते.
- अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडेसे पादरे मीठ टाकून प्यायल्याने पोट दुखी थांबते.
- बिना दूधाचा चहा (कोरा चहा) प्यायल्यानेदेखील पोट दुखणे थांबते. त्यात थोडा लिंबाचा रस टाकल्यास लवकर असर होतो.
- एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा एकत्र करून प्यायल्याने पोट दुखी लगेच थांबते
- चांगल्या प्रकारे शिजलेले तांदूळ एका कॉटनच्या कपड्यात बांधून शेकल्यास पोट दुखी थांबते.
- एक ग्लास पाण्यामध्ये थोडासा गोड सोडा टाकून प्यायल्याने पोट दुखणे थांबते.
- सुंठ, जीरा आणि काळी मिरी सम प्रमाणात घेवून त्याचे चूर्ण बनवून घ्यावे. गरम पाण्यासोबत एक चमचा हे चुर्ण घेतल्याने पोट दुखणे थांबते.
- जेवणानंतर ओवा आणि मीठ चावून खावे पचन चांगले होते.
हे घरगुती उपाय करून तुम्ही पोटदुखीवर तात्काळ आराम मिळऊ शकता. पण कधी कधी पोटदुखीचे कारणे गंभीर असू शकतात. पोट सारखेच दुखत असेल ठराविक काळानंतर पोट पुन्हा दुखत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ल्याने योग्य उपचार करा.
अशाच प्रकारची महत्वपूर्ण माहिती मराठी भाषेमधून वाचण्यासाठी आपल्या आवडत्या College Catta या संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या कारण College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ. जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सहज साध्या भाषेत सादर केली जाते. तुम्हाला पोट दुखत असेल तर हे घरगुती उपाय Potat Dukhane Gharguti Upay ही माहिती कशी वाटली हे खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन अवश्य कळवा.
-प्रियंका पुंड.
Leave a Reply