गुडघे दुखीवर घरगुती उपाय करून बघा आणि गुडघेदुखी पळवा
गुडघे दुखत आहेत, कर्र कर्र आवाज येतोय वेळीच सावध व्हा ही गुडघेदुखी तुमची डोकेदुखी ठरू शकते. काळजी करू नका हे गुडघे दुखीवर घरगुती उपाय करून तुम्हाला नक्की फायदा होईल.
Gudge Dukhi Upay in Marathi Gudghe Dukhi Var Gharguti Upay
वाढतं वय, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव यांमुळे उतारवयात गुडघेदुखी मान वर काढू लागते. त्यात आपण आपल्या कामाच्या दगदगीमुळे जर त्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचे वाईट परिणाम होतात. गुडघेदुखीचे रुपांतर अॅथ्रोटीस या गंभीर आजारामध्ये व्हायला लागतं. गुडघेदुखी हा आजार फक्त वृद्धांमध्येच नाही तर अगदी तरुणपणात सुद्धा गुडघ्यांची कुरकुर वाढायला लागते. आणि या आजाराने आपण हैराण होतो.
गुडघेदुखी कारणे गुडघे का दुखतात ?
सतत ची दगदग, धावपळ, कामातील व्यस्तपणा , आहाराकडे दुर्लक्ष, यात कँल्शियाम, प्रथिने या पोषण घटकांची कमतरता. शरीराकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव यासारख्या कारणांमुळे गुडघेदुखीचा त्रास वाढायला लागतो. तसेच गुदाघेदुखीचे अनेक करणे आहेत.
- जास्त वेळ गुडघ्यावर वाकून उभ राहिल्यास अथवा गुडघ्यावर ताण पडल्यास.
- गुडघ्याची वाटी सरकल्याने गुडघेदुखीचा त्रास वाढतो.
- पायऱ्यांवरून सतत होणारी चढ उतार यामुळे गुड्घ्यात वेदना होतात.
- गुडघ्याला जखम होणे किंवा गुडघ्यावर आघात झाल्याने हा त्रास सुरु होतो.
- सांध्यामध्ये दाह होणे.
- अतिलठ्ठपणामुळे शरीराचा ताण गुडघ्यावर पडतो आणि गुडघेदुखी वाढते.
- कमी सामान्य परिस्थितीत हाडात गाठी होणे हे सुद्धा गुडघेदुखीचे कारण असते.
- सांध्यातील कुर्च्यांची झीज झाल्याने हा त्रास होतो.
- गुडघ्यात प्रचंड वेदना होतात.
अर्थ्रोयटीस रोगाची लक्षणे-
- गुडघ्यात प्रचंड वेदना होतात.
- चालल्यावर गुडघेदुखी वाढते तर आराम केल्यास गुडघेदुखी बरे वाटायला लागते.
- उठतांना आणि बसतांना त्याचा त्रास होणे.
- रुग्णाला आपली रोजची कामे करतांना त्रास होतो.
- सांधे दुखायला लागतात व त्यांची हालचाल मंदावते त्यासोबत सांध्यावर सूज येते.
- अर्थ्रोयटीसच्या शेवटच्या टप्प्यात गुडघे वाकडे व्हायला लागतात.
गुडघे दुखीवर घरगुती उपाय
- आपणच आपल्या शरीराची काळजी घेणे.
- आपला गुडघा दुखत असेल तर त्याला बर्फाने शेक द्यावा.
- गुडघेदुखीवर अत्यंत साधा उपाय म्हणजे विश्रांती घेणे. वेदना तीव्र करणारी काम टाळणं. जास्तीच वजन उचलू नये.
- आपला गुडघा शक्य तितक उंचावर ठेवा म्हणजे सूज कमी होईल.
- दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये किंवा खाली उशी ठेवावी.
- आर्थ्रोयटीस झाला असल्यास शस्राक्रिया करावी.
- गुडघ्यावर निलगिरी तेल लावा.
गुडघेदुखीचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल.
सकस आहार असावा
हाडांचा मजबुतीसाठी आहारात खालील घटकांचा समावेश अत्यंत आवश्यक आहेत.
- आहारात मासे, अंडी, दुध यांचे सेवन असल्यास शरीराचा वाढीसाठी आवश्यक प्रथिने आणि कँल्शियामची योग्य मात्रा शरीराला मिळते.
- रोजचा आहारात फळे, पालेभाजा यांचा समावेश असावा.
- फस्ट फूड जंक फूडचे सेवन टाळावे.
नियमित व्यायाम करावा
गुडघेदुखीवर व्यायाम कोणता कराल ?
- आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
- रोज कमीत कमी कवायती प्रकार व्यायाम म्हणजे हाताचा पायाचा हालचाली कराव्यात.
- योग व योगासने केलीत तर उत्तमच.
टीप- व्यायाम करताना सुरवातीला थोडा थोडा आणि नंतर शरीराला झेपेल त्याप्रमाणे व्यायाम वाढवावा.
नियमित व्यायाम आणि सकस आहार असनारी व्यक्ती निरोगी जीवन जगते. मी आशा करतो की हे गुडघे दुखीवर घरगुती उपाय ‘Gudge Dukhi Upay in Marathi Gudghe Dukhi Var Gharguti Upay’ तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तुमची प्रतिक्रिया खालील कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. आपल्या आवडत्या College Catta या मराठी भाषेतील संकेतस्थळावर वेगवेगळी आरोग्यविषयी माहिती वाचण्यासाठी पुन्हा भेट द्या.
-भारत मोहळकर.
Gudge Dukhi Upay in Marathi Knee Pain Home Remedies in Marathi Gudghe Dukhi Var Gharguti Upay गुडघेदुखी कारणे गुडघे का दुखतात गुडघेदुखीवर व्यायाम.
Leave a Reply