
डी एन ए आणि डी एन ए टेस्ट काय आहे जाणून घ्या
मित्रांनो डी एन ए हा शब्द आपण बऱ्याचदा वृत्तपत्रामध्ये, माध्यमांमध्ये ऐकला आहे, त्याचबरोबर काहींनी वापरला देखील असेल. पण बऱ्याच लोकांना डी एन ए म्हणजे नेमकं काय आणि याचा वापर कुठे व कशासाठी केला जातो हे माहित नाही. चला तर डी एन ए बद्दल महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात.
डी एन ए चा (DNA) फुल फॉर्म आहे डीऑक्सिरायबोनुक्लिक अॅसिड. DNA हा आपल्या शरीराची अनुवांशिक आणि जनुकीय माहिती साठवण्याचे काम करतो.
अनुवांशिक माहिती म्हणजे आपल्या आई वडिलांपासून मुलांना मिळालेला रंग, नाक, उंची, केस, शरीराचा आकार तसेच काही अनुवांशिक आजार, प्रतिकार क्षमता या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वजांपासून त्यांच्या मुलांमध्ये डी एन ए च्या स्वरूपातून पुढे पाठवल्या जातात.
थोडक्यात त्या प्राण्याची शरीर बांधणी, विकास करण्यासाठी लागणारी माहिती ही डी एन ए मध्ये साठवलेली असते. आपले शरीर हे अनेक पेशी पासून. अनेक पेशींची ऊती आणि उतिंपासून वेगवेगळे अवयव अशी रचना आहे.
आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीत न्युक्लीअस असतो. या न्युक्लीअसमध्ये न्युक्लीक अॅसिड असते. न्युक्लीक अॅसिडमध्ये क्रोमोझोम असतात. यात क्रोमोझोमच्या २३ जोड्या. या क्रोमोझोममध्ये डी एन ए असतो. अशा पद्धतीने DNA प्रत्येक पेशीमध्ये असतो.
डी एन ए चा शोध कोणी लावला
DNA ची ओळख जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रीक यांनी १९५३ साली करून दिली. रोझालिंड फ्रँकलिन यांनी x ray crystallography चा वापर करून DNA वर जे काम केले त्या कामाचा उपयोग जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रीक यांनी त्यांच्या पुढील संशोधनात केला.
DNA टेस्टचा वापर कुठे आणि कशासाठी होतो
- DNA चा वापर फोरेन्सिक लॅबमध्ये गुन्हेगाराची ओळख पटण्यासाठी होतो. यात त्याचे रक्ताचे नमुने, घटनास्थळी पडलेले रक्ताचे डाग, केस, शरीराची त्वचा या सगळ्या पुराव्यातून आरोपीची ओळख पटण्यासाठी मदत होत.
- नवीन जन्मलेल्या बाळाचे पालक शोधण्यासाठी DNA टेस्टचा वापर केला जातो. यात पिता किंवा माता त्या बाळाची जबाबदारी नाकारत असतील तर त्या बाळाची आणि पालकांची DNA टेस्ट करून या बाळाचे पालक नेमके कोण आहेत हे शोधले जाते.
- मृत शरीराची ओळख पटण्यासाठी. मृत शरीर सडलेले, किंवा ओळख न पाटण्याच्या स्थितीत असेल तर त्याची DNA टेस्ट करून त्याची ओळख, तो मृतदेह नेमकं कोणाचा आहे हे पटू शकते.
- DNA टेस्ट करून त्या व्यक्तीमध्ये अनुवांशिक आजार कोणते आहेत हे समजू शकते.
DNA टेस्ट करण्याची पद्धत
- DNA टेस्ट करण्यासाठी सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या शरीरातील पेशीचे उतीचे नमुने घ्यावे लागतात.
- केस, त्वचा, रक्त, स्पर्म, किंवा इतर पेशीचे नमुने वापरून DNA टेस्ट केली जाऊ शकते.
- हे काम जैवतंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण केले जाते.
DNA २०१९ चे बिल-
DNA तंत्रज्ञान नियमन विधेयक २०१९ ज्याला DNA प्रोफाइलिंग बिल देखील म्हटले जाते. ते एखाद्याची ओळख स्थापित करण्यासाठी DNA तंत्रज्ञानाच्या वापरासाठी नियमन आणि Deoxyrcbonuclic Acid तंत्रज्ञानाच्या वापराची आवश्यकता ओळखुन तयार केले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार हे गुन्हेगारी प्रकरणामध्ये किंवा खटल्यांशी संबंधित किंवा खटल्याच्या विशिष्ट चाचणीच्या वैज्ञानिक पुराव्यावर अवलंबून असलेल्या प्रकरणामध्ये गेम चेंजर ठरेल.
DNA तंत्रज्ञान विधेयकामध्ये गहाळ व्यक्ती, गुन्हेगार, पीडीत, चाचणी घेणाऱ्या आणि अज्ञात मृत व्यक्तीची ओळख स्थापित करणे हे आहे. या विशिष्ट DNA तंत्रज्ञान करणे हे आहे. या विशिष्ट DNA तंत्रज्ञान विधेयकाचा मुख्य हेतु म्हणजे देशातील न्याय वितरण प्रणालीला समर्थन व बळकटी देण्यासाठी DNA आधारीत फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या वापराचे विस्तार करणे. विधेयकातही DNA पुरावा निर्णायक सिध्द होऊ शकतील अशा गुन्हेगारी खटल्याचा वेगवान मागोवा आढावा घेण्याची अपेक्षा आहे. फौजदारी खटल्याखेरीज विधेयक तंत्रज्ञानाचा वापर करुन पालकांचे वाद, कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातुन येणे आणि मानवी अवयव प्रत्यारोपणाच्या बाबतीत व्यक्तींची ओळख स्थापित करण्यास परवानगी देतो.
DNA तंत्रज्ञान नियमन विधेयक हे भारताच्या कायदेशीर यंत्रणेत एक विकासात्मक कायदा असु शकतो कारण सरकारने म्हटल्या प्रमाणे, DNA पुरावा निर्णायक सिध्द होऊ शकतो / शकतील. अशा गुन्हेगारी घटनांना जलद गती या विधेयका द्वारे प्राप्त होऊ शकते. बलात्कार आणि ईतर फौजदारी गुन्हयांच्या प्रकरणामध्ये जिथे फक्त DNA पुरावे आहेत तेथे न्याय मिळण्यास प्रथम प्राधान्याने मदत होइल. जगात असे अनेक देश आहेत जे गुन्हेगारी खटल्यांचा मागोवा घेण्यासाठी DNA तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर करतात. गुन्हेगारी ज्या युरोप देश अग्रगण्य आहे तर युरोपमध्ये सर्वात यशस्वी मार्गाने DNA तंत्रज्ञानाचा वापर करण्यास अग्रणी आहे.
जरी हे विधेयक काही प्रमाणात स्पष्ट झाले आहे पण गोपनीयता आणि संमती या मुद्द्यावर एक स्पष्टता नाही जे एखाद्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि जे संपुष्टात येऊ शकत नाही. तसेच खोलवर विचार केला तर DNA चाचणी, शोध, त्यावरील प्रगती याला आपण विज्ञान युगात लाभलेले वरदान अस म्हणायला हरकत नाही.
मित्रांनो, डी एन ए टेस्ट बद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. तुमच्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी माहित सोप्या भाषेत सादर केली जाते.
ॲड.एम.डी.भागवत
BSL. L..L.B.
शब्दांकन- रितेश साळुंके. कॉलेज कट्टा
Leave a Reply