सिक्सर किंग युवराज सिंग.२००७ टी ट्वेंटी वर्ल्डकप , २०११ च्या भारताच्या विश्वचषक विजयाचा हीरो युवराज सिंग यांचा संघर्ष जाणून घ्या Yuvraj Singh information Biography in Marathi युवराज सिंग मराठी माहिती
सिक्सर किंग युवराज सिंग. २००७ चा ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्डकप आणि २०११ च्या भारताच्या विश्वचषक विजयाचा हीरो म्हणून आपण युवराज सिंग याला ओळखतो. गूडघ्यावर बसून सहज सिक्स मारने हे फक्त युवी नेच करावे आजही त्याच्या सारखे सहज सिक्स कोणी मारत नाही फक्त फ्लिक करून सिक्स मारण्याची कला त्याच्यात होती. धोनी सोबत त्याची पार्टनरशिप बघण्यासारखी होती. कैन्सरशी लढताना देशासाठी वर्ल्डकप जिंकन्यासाठी प्राणांची बाजी लावणारा हा खेळाडू. चला तर मग आपल्या लाडक्या युवी विषयी आज माहिती घेऊया.
युवीचे बालपण
युवराजचा जन्म पंजाब मधे झाला आहे. युवराज माजी क्रिकेटर योगराज सिंह आणि शबनम सिंह यांचा मुलगा आहे. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर युवराज आपल्या आईसोबत राहात होता. लहानपणी टेनिस आणि रोलर स्केटिंग युवराजचे आवडते खेळ होते आणि या दोनही खेळांमधे त्याची प्रगती चांगली होती. युवराज सिंग ने आंतरराष्ट्रीय १४ वयोगटातील रोलर स्केटिंग स्पर्धा देखील जिंकलीये. त्यांच्या वडिलांनी मात्र त्याचे सगळे पुरस्कार फेकुन दिले आणि सांगितले होते की फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित कर. युवराजला त्याचे वडिल रोज सरावाकरीता नेत असत. त्याने आपले शिक्षण DAV पब्लिक स्कुल चंदिगड येथुन पुर्ण केले बाल कलाकार म्हणुन त्याने अभिनय देखील केला आहे. मेहंदी सांगा दी आणि पुट सरदार मध्ये त्याने छोटी भुमिका केली आहे.
युवराज सिंग प्रथमच कूच-बिहार ट्राफी स्पर्धेत चर्चेत आला होता, जेव्हा त्याने पंजाब क्रिकेट संघाकडून खेळताना ३५८ धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याला सन २००० मध्ये अंडर १९ विश्वचषकात भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्या वर्षी भारतानेही ती स्पर्धा जिंकली. सन २००० मध्ये युवराजची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. आयसीसी नॉक-आउट ट्रॉफी दरम्यान त्याने केनियाविरुद्ध पहिला सामना खेळला होता. या मालिकेच्या दुसर्या सामन्यात युवीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॅटचा स्फोटकपणा दाखवला.
- त्याने ऑक्टोबर २००३ साली पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता.
- २००७ ते २००८ पर्यंत युवराज भारतिय क्रिकेट संघाचा उपकर्णधार होता.
- युवराज सिंग २०११ च्या ICC क्रिकेट विश्वचषकात मॅन ऑफ दी टुर्नामेंट देखील राहिला आहे आणि ICC विश्व टी २० चा उत्कृष्ट प्रदर्शन करणारा देखील ठरला आहे.
- त्याच्या योगदानामुळे भारताने दोनही (विश्व टी २० आणि क्रिकेट विश्वचषक) जिंकला आहे.
- युवराज ने २००७ साली ICC विश्व टी.२० मधे इंग्लंड विरूध्द स्टुअर्ट ब्रॉड ला ६ चेंडुत ६ षट्कार मारले होते. असे पुर्वी ३ वेळा झाले होते परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये २ कसोटी क्रिकेट संघांमधे असे नव्हते झाले आणि त्याच सामन्यात त्याने सर्वात जलद अर्धशतक देखील ठोकले होते.
- युवराज ने केवळ १२ चेंडुत अर्धशतक बनविले होते.
- २०११ मधे युवराजला डाव्या फुफ्फुसात कर्करोगाचा टयुमर झाल्याचे निदान झाले होते त्यावेळी युवराज किमोथेरेपी करीता बोस्टन आणि इंडिआनापलिस येथे गेला होता.
- २०१२ च्या मार्च मधे युवराजच्या ३ किमोथेरेपी पुर्ण झाल्या आणि त्याला रूग्णालयातुन सुट्टी झाली. तो एप्रीलमध्ये भारतात परतला. सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात टी.20 सामन्यांकरता न्युझिलंड विरूध्द खेळण्यासाठी त्याचे पुनरागमन झाले.
- युवराजला २०१२ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते “अर्जृन” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- २०१४ ला युवराजला “पद्मश्री” पुरस्काराने देखील गौरवान्वित केले आहे (हा भारताचा चैथा सर्वात मोठा पुरस्कार आहे).
- २०१४ साली रॉयल चॅलेंजर बंगलोरने युवराज ला IPL च्या लिलावात सर्वात महागडया खेळाडुच्या रूपात १४ करोड रूपयांना खरेदी केले. २०१५ च्या IPL लिलावात दिल्ली डेयरडेविल्सने युवराजला १५ करोड रूपयांत खरेदी केले. २०१६ ला IPL लिलावात सनरायजर हैदराबादने युवराज सिंग ला ७ करोड रूपयांमधे खरेदी केले.\
यश आणि पुरस्कार:-
अंडर १९ टिम मधे युवराज ने ३५८ या सर्वात जास्त धावा बिहार विरूध्द कोच बहार चषकात काढल्या होत्या. नंतर युवराज ने १९९९ ते २००० मध्ये हरियाणा विरूध्द रणजी ट्राफीत १४९ धावा बनविल्या.
नेटवेस्ट येथील सामना युवराजच्या कारकिर्दीतील ऐतिहासीक सामना होता. त्यावेळी कुणाला देखील विश्वास नव्हता की इंग्लंड विरूध्द लॉर्ड्स मैदानावर भारतिय संघ ३२६ धावांचे लक्ष्य पुर्ण करू शकेल. भारताची स्थिती नाजुक होती, अवघ्या २४ षट्कात १४६ धावांवर ५ बाद झाले होते. त्यावेळी युवराजला साथ देण्याकरीता मो. कैफ मैदानावर आला आणि दोघांनी मिळुन १२१ धावा बनविल्या. युवराजने एक बाजु भक्कमपणे सांभाळत ६० चेंडुत ६९ धावा बनविल्या होत्या आणि त्याच्यामुळेच भारतिय संघाने हा सामना २ गडी राखुन जिंकला होता.
चेन्नईत २००८ साली पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला हरविण्याकरता युवराजने नाबाद ८५ धावा काढल्या व सचिन सोबत १६३ धावांची भागिदारी खेळली. आजही युवराज च्या आवडत्या सामन्यांमधे या सामन्याचा समावेश आहे.
ICC अंडर १९ विश्वचषक २०००, टी 20 विश्वचषक २००७, आणि विश्वचषक २०११ अश्या तीन चषकांमधे भाग घेणारा युवराज पहिला खेळाडु ठरला. भारताने हे तीनही चषक जिंकले होते आणि हे चषक जिंकण्यात युवराजचे योगदान महत्वाचे होते. २०११ च्या विश्वचषकात युवराज मालिकावीर ठरलाय आणि २०११ च्याच विश्वचषकात तो ४ वेळा मॅन ऑफ दी मॅच देखील ठरला.
युवराज सिंग असा पहिला खेळाडू आहे ज्याने एकाच विश्वचषकात ३०० पेक्षा जास्त धावा काढल्या आणि १५ विकेट देखील घेतल्या. टी२० मधे १०० पेक्षा जास्त षट्कार मारणारा तो पहिला भारतिय ठरला आहे.
कॅंसर या आजाराशी दोन हात केल्यानंतर युवराज सिंग ने एक NGO स्थापन केली ’’ You We Can’’ हे त्याच्या NGO चे नाव असुन येथे आजतागायत 100 पेक्षा जास्त कॅंसर रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
अक्षय जाधव.
Yuvraj Singh information Biography in Marathi युवराज सिंग मराठी माहिती
Cricket information in Marathi Essay cricket player information in marathi
Leave a Reply