World Environment Day Information in Marathi
जागतिक पर्यावरण दिन का साजरा करतात जागतिक पर्यावरण दिन माहिती
जागतिक पर्यावरण दिन साजरा का करतात? करणे समजून घ्या. पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून रोजी साजारा केलं जातो. मानव प्राण्याने औद्योगिक प्रगतीचा नावाखाली कळत नकळत निसर्गाचा ऱ्हास सुरु केला याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. ही “World Environment Day Information in Marathi” माहिती नक्कीच तुम्हाला आवडेल.
Jagtik Paryavaran Din Essay in Marathi Paryavaran Diwas Essay in Marathi Jagtik Paryavaran Diwas भारतीय पर्यावरण दिवस जागतिक पर्यावरण दिन माहिती Paryavaran Essay in Marathi language Paryavaran Sanrakshan Essay in Marathi language Paryavaran Samvardhan Information in Marathi पर्यावरण संवर्धन काळाची गरज निबंध
World Environment Day Information in Marathi जागतिक पर्यावरण दिन का साजरा करतात पर्यावरण दिन माहिती
पर्यावरण म्हणजे काय मराठी
पर्यावरण म्हणजे आपल्या सभोह्तालचा परिसराला पर्यावरण म्हणतात यात निसर्ग झाडे, प्राणी, पक्षी, मानव या सर्वांचा सामावेश होतो.
मानवनिर्मित पर्यावरण, कृत्रिम
यामध्ये मानवनिर्मित वस्तूंचा समावेश होतो. उदा घरे, गाडी, ई.
World Environment Day Information in Marathi- Jagtik Paryavaran Diwas
जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. १९७२ साली युनोच्या सर्वसाधारण सभेने, मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत, पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यानुसार शाश्वत विकासावर सर्वाधिक भर देण्यात येत आहे. मात्र पर्यावरण दिन साजरा करण्याची या जगत्वासियांना का गरज पडली? का पर्यावरण संरक्षणास एवढे महत्व वाढले? चला तर आज आपण जाणून घेवूया.
पृथ्वीवर अनेक जीव जंतू, पक्षी, प्राणी, वनस्पती, कीटक वास्तव्य करत आहेत, त्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मानव प्राणी! की, ज्यामुळे सर्वाधिक प्रमाणात पर्यावरणाचा र्हास होतो, जो या सर्व गोष्टींना सर्वाधिक जबाबदार आहे. सुरूवातीपासूनच मानवाने आपल्या गरजा भागविण्यासाठी सर्वस्वी निसर्गावरच ताण दिलेला आहे, त्यातच आपल्या गरजा भागवत असताना त्याचा पर्यावरण इतर सजीव सृष्टीवर काय परिणाम होईल याकडे कधी जाणीवपुर्वक पाहिलेच नाही, स्वतःला अन्न भाजून-शिजवून खाण्यासाठी अग्नीचा शोध लावला, खर्या अर्थाने तेथपासूनच पर्यावरणामध्ये प्रदुषणास सुरूवात केली होती मानवाने, मात्र त्यावेळी त्याचे प्रमाण अत्यल्प होते. जसजसा मानवाच्या मेंदूचा विकास होत गेला, तसा त्याने औद्योगिकीकरणाचा शोध लावला, उद्योगधंदे सुरू झाले, कारखानदारी वाढली, तसेच प्रदुषण वाढण्यास चांगलाच हातभार लागत गेला, आणि आज भरमसाठ कारखानदारी वाढलेली आपणास पहावयास मिळत आहे, आपण बोलतो की, चांगला विकास झाला आहे, मात्र या कारखान्यांमधून बाहेर पडणारा काळा कुट्ट धूर ज्यामध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड संपूर्ण सजीव जातीच्या आरोग्यासाठी अतिहाणीकारक आहे, याचा आपण कधी जाणीवपूर्वक विचार करण्यासच तयार नसू तर आपले जीवन धोक्यात आहे, हे आपण जाणले पाहिजे.
Paryavaran Samvardhan Information in Marathi Paryavaran Sanrakshan Essay in Marathi language
मात्र आज दिवसेंदिवस मानवाला या गोष्टीची जाणीव होण्यास सुरूवात झाली आहे. जागतिक पर्यावरण दिन आज जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या मनात पर्यावरणाविषयी जनजागृती करणे, तसेच यामध्ये संपुर्ण राष्ट्राचे प्रबोधन करणे होय.
पृथ्वीतलावरील प्रत्येक नागरिकाने जर यामध्ये आपले योगदान देवून सहकार्य केले, आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास मदत केल्यास हे काही अशक्य वाटणारी गोष्ट नाही, कारण यामध्ये सर्वाधिक महत्वाचा उपाय म्हणजे वृक्षलागवड करणे त्याचबरोबर वृक्ष संवर्धन करणे हा एकमेव उपाय आजतरी आपणा समोर आहे. कारण अधिकाधिक ऑक्सिजनची निर्मिती केवळ आणि वृक्षांमार्फतच होते. आज कारखानदारी औद्योगिकीकरण तर वाढले मात्र जंगलांची कत्तल करूनच त्या ठिकाणी या गगनचुंबी इमारती उभ्या केल्या आहेत.
पर्यावरण संवर्धन काळाची गरज निबंध
आज पर्यावरणाविषयक जनजागृती करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यामध्ये सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करून देखील आपण पर्यावरणाविषयी जनजागृती करू शकतो.
कारखानदारी तसेच इतर उद्योगधंद्यांमधून बाहेर पडला जाणारा टाकाऊ माल हा काही प्रमाणात घनकचर्याच्या स्वरूपात असतो, तर काही प्रमाणात रासायनिक द्रव्याच्या स्वरूपात असणारा मैला पाईपद्वारे नदी, ओढे, तलाव अशा ठिकाणी बिनधास्तपणे सोडून दिले जाते.तेच पाणी पुढे जावून शेतीसाठी वन्यजीव पिण्यासाठी पाण्याचा निचरा होवून मानवाच्या पाणी पिण्याच्या स्त्रोतामध्ये उतरून ते, आपल्या तसेच सजीव सृष्टीच्या आरोग्यासाठी हाणीकारक असते, मात्र त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असते,
विविध ठिकाणी सजीवांच्या आरोग्यासाठी घातक असणार्या कारखान्यांतील सप्लाय करणार्या वायूची गळती होत असते, मात्र याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही. मग हा वायू वातावरणामध्ये मिसळून त्याचा सजीवसृष्टीवर हाणीकारक परिणाम होतो, त्यास आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे.
शहरी भागातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी बंदिस्त गटारांची सुविधा केलेली आहे. मात्र त्या संपुर्ण शहराच्या गटारी एकत्र करून शहराबाहेर असणार्या नदीमध्ये बिनधास्तपणे सोडून दिल्या जातात, मात्र त्यामुळे संपुर्ण नदीचे पाणी दुषित होवून ते विषारी होत जाते, मात्र त्या पाण्यावर शुद्धिकरण प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेे ते पाणी दुषित होणार नाही, त्यातून येणारी दुर्गंधी टळेल.
सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाच्या समृद्धीच्या दिशेने वाटचाल करता येवू शकते.
या पर्यावरण दिनाच्या औचित्याने आपण आपल्याला हाताने ज्या हातांनी जे काम करणे शक्य आहे अशी कामे इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करण्याचा संकल्प करूयात. गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया या. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी बर्याचदा वापरता येणार्या कागदी पिशव्या वापरण्यास सुरूवात करावी, अन्न आणि भाजीपाला प्लॅस्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यामध्ये ठेवता येवू शकते. पाण्याचा अतिवापर टाळून थांबवूया. घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळता येवू शकते, गरज नसल्यास घरातील टी.व्ही, बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवता येवू शकतो. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करता येवू शकतो. याशिवाय एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध योजना राबवून या माध्यमातूनच जनजागृती करता येवू शकतो.
आपला देश प्रगतशील देश म्हणून जागतिक बाजारपेठेत वावरत असला तरी, उद्योगधंद्यांची भरभराट होत असताना आपण पर्यावरणाच्या सुरक्षितेतेकडेही डोळेझाक करून चालणार नाही. या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने दुष्काळ, महापूर, रोगराई, त्सुनामी, सागरी वादळे, भूकंप, ढगफुटी, पाण्याची पातळी खालावणे अशा नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
जगामध्ये सर्वाधिक प्रदुषित शहर असण्याचा मान भारताच्या उत्तर प्रदेशातील कानपुर शहरास मिळतो, त्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये भारताच्या 14 शहरांचा सामावेश होतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. आज जगातील जवळजवळ दहापैकी नऊ माणसं प्रदूषित हवेत श्वसन करत असल्याची माहितीही जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
भारतातील प्रदूषित शहरे
प्रथम क्रमांकावर असणार्या कानपूरबरोबरच पीएम 2.5 प्रदूषणच्या यादीत असलेली इतर भारतीय शहरे अशी आहेत-
- फरीदाबाद
- वाराणसी
- गया
- पाटणा
- आग्रा
- लखनौ
- दिल्ली
- मुजफ्फरपूर
- श्रीनगर
- गुडगांव
- जयपूर
- पतियाळा
- जोधपूर
- व्या क्रमांकावर कुवेतमधील अली सुबह अल-सालेम हे शहर असुन उर्वरित शहरे चीन आणि मंगोलियातील आहेत.
सन 2016 मध्ये पीएम 10 पातळीतील सर्वाधिक प्रदूषित शहरांत भारतातील 13 शहरे होती. पीएम 2.5 प्रदूषण पातळीत नायट्रेटस, सल्फेट आणि काळा कार्बन यांचा समावेश असतो. काळा कार्बन हा आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक असतो. जगातील 3 अब्ज म्हणजे सुमारे 40 टक्के लोकसंख्येला स्वच्छ स्वयंपाक घरासाठी स्वयंपाकासाठी ़कुकिंग गॅस आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.
मात्र यामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. भारताने पंतप्रधान उज्ज्वला योजनेद्वारे दोन वर्षांमध्ये दारिद्रय रेषेखालील 3 कोटी 70 लाख महिलांना एलपीजी कनेक्शन दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच 2020 पर्यंत 8 कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. वायू प्रदूषण हे सीमा नसते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्व देशांना विनंती करण्यात आली आहे.
-सागर गोरखे.
ही World Environment Day Information in Marathi- Jagtik Paryavaran Diwas माहिती तुम्हाला कशी वाटली हे आह्माला नक्की प्रतिक्रियेद्वारे कळवा.
Wow