कोणताच व्यवासाय न करता बऱ्याच व्यावासायंचे मालक असलेले वॉरेन बफेट हे आपल्या कमाईचा ९९ टक्के वाटा दान करतात या गूढ व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घ्या Warren Buffett Information in Marathi Warren Buffett Biography in Marathi

वॉरेन बफेट
Warren Buffett Quotes in Marathi
“Someone’s sitting in the shade today because someone planted a tree a long time ago.”
आज कोणीतरी झाडाच्या थंड सावलीत बसले आहे कारण ते झाड खूप पूर्वी कोणीतरी लावले होते.
जसे परीस कोणत्याही वस्तूला लागले की त्या वस्तूचे सोने होते तसेच Warren Buffett वॉरेन बफेट यांनी ज्या कंपनीत गुंतवणूक केली, ती कंपनी हमखास मार्केटमध्ये यशस्वी होणारच, असे अमेरिकेत गणित ठरले आहे.
कोणताही बिझनेस न उभारता वॉरेन यांनी आपले नाव जगातील श्रीमंताच्या यादीत कोरलेवॉरेन बफेट यांना खूप लोक ओळखतात, पण त्यांच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या लोकांना अजूनही माहीत नाहीत. त्यांना “Oracle of Omaha” असेही संबोधले जाते. त्यांनी ९९% संपत्ती दान करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.
Warren Buffett Information in Marathi
Warren Buffett Biography in Marathi
वॉरेन बफेट यांचे बालपण
१९३० साली अमेरिकेत वॉरेन बफेट यांचा जन्म झाला. वॉरेन बफेट यांचे वडील हे स्टॉक ब्रोकर होते. वॉरेन बफेट यांचे म्हणणे आहे की त्यांना जनुकीय लॉटरी लागली आणि ते अमेरिकेत योग्य काळात पुरुष म्हणून जन्माला आले. जर ते त्या काळात स्त्री म्हणून जन्माला आले असते किंवा दुसऱ्या एखाद्या काळात जन्माला आले असते तर ते कदाचित एवढे श्रीमंत नसते. त्यांच्या यशात वॉरेन बफेट नशिबाचा हात मानतात.
लहानपणापासून ते आपल्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जात होते. वडिलांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर ते तेथील सर्व पुस्तक वाचून काढत. तिथेच त्यांना बेन ग्राहमचे “इंटेलिजंट इन्वेस्टर” हे पुस्तक भेटले.
त्यांनी पहिली गुंतवणूक वयाच्या अकराव्या वर्षी केली. पहिल्या शेयर वर त्यांनी थोडासा नफा कमवला. परंतु नंतर त्यांना पश्चाताप झाला कारण तो शेअर पुढे जाऊन खूप जास्त वाढला होता. तेव्हा त्यांनी गुंतवणुकीचा पहिला धडा संयम हा शिकला. वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता, बातमीपत्र वाटणे व घोड्याच्या शर्यतीचे टीप पत्रक विकणे. त्याच वर्षी त्यांनी पहिल्यांदा टॅक्स रिटर्न भरला व सायकलवर टॅक्स सूट मिळवली. न्यू यॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स येथून अर्थशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वॉरेन यांनी त्यांचे पहिले शेअर्स वयाच्या 11व्या वर्षी खरेदी केले. ते किशोरवयीन वयात होते पण पैसे कुठे आणि किती गुंतवायचे हे त्यांनी चांगलेच हेरले होते. त्यांनी वर्तमानपत्र घरोघरी टाकण्याचे काम केले. 16 व्या वर्षी त्यांच्याकडे ५३ हजार अमेरिकन डॉलर्स होते.
वॉरेन बफेट यांचे शेअर शेअर बजाराविषयीचे विचार पुढील प्रमाणे आहेत.
Warren Buffett Thoughts in Marathi वॉरेन बफेट यांचे विचार
शेअरच्या फक्त किमती पाहू नका. त्यांच्या मागचे व्यवसाय पहा. शेअर घेताना आपण त्या
कंपनीचे / व्यवसायाचे भागीदार होत आहोत, हा विचार करून शेयर विकत घ्या. अति वैविध्यपूर्णता आणि कमी वैविध्यपूर्णता दोन्ही धोकादायक आहेत. त्या दोन्हींमुळे आपला परतावा कमी होऊ शकतो. शक्यतांमध्ये विचार करा. बफेटला ब्रिज हा खेळ खेळायला आवडतो त्यातून ते ‘शक्यता’ शिकतात. गुंतवणूकदाराने आपल्या भावनांवर ताबा ठेवायला शिकले पाहिजे. आम्ही बदलाला गुंतवणुकीचा शत्रू म्हणून पाहतो… म्हणून आम्ही बदलाचा अभाव शोधतो. आम्हाला पैसे गमवायला आवडत नाही. भांडवलशाही खूप क्रूर आहे. सर्वांना आवश्यक असणारी सांसारिक उत्पादने आम्ही शोधतो.
१९९३ साली वॉरेन बफेट यांनी त्यांच्या जीवनातील वाईट डील साईन केली. वॉरेन यांनी डेक्सटर शू कंपनीमध्ये ४४३ मिलीयन अमेरिकन डॉलर गुंतवले होते आणि त्यांना या डीलमधून मोठे नुकसान झाले होते. या नुकसानानंतर ते त्यांनी मार्ग बदलला नाही किंवा गुंतवणूक करणे सोडले नाही. वॉरेन पुन्हा उमेदीने कामाला लागले. आपल्या मिळकतीतील २५ बिलीयन रक्कम त्यांनी सामजिक संस्थांना दान केली आहे.
अब्जाधीश वॉरेन बफेटची संपत्ती जवळजवळ संपूर्णपणे त्यांच्या बर्कशायर हॅथवे गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये आहे. बर्कशायर हॅथवे ही GEICO Insurance, Duracell Batteries आणि See’s Candies यासह अनेक कंपन्या आणि सहाय्यक कंपन्यांचा समावेश असलेली एक होल्डिंग कंपनी आहे. बर्कशायर हॅथवेच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये Apple, बँक ऑफ अमेरिका आणि कोका-कोला कंपनीसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
त्यांच्या मते सोन्यातील गुंतवणुकीत सर्वाधिक परतावा नाही. म्हणून ते सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला कोणालाही देत नाहीत. त्यापेक्षा शेअर्स आणि घर वा प्लॉटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला वॉरेन देतात. आफ्रिका किंवा कुठेतरी मैदानातून सोनं बाहेर काढलं जातं. मग आपण ते वितळवून, दुसरा खड्डा खणतो, आणि ते सोनं पुन्हा गाडतो. त्याच रक्षण करण्यासाठी लोकंही उभे करतो, त्याची काही उपयोगिता नाही. मंगळावरुन जो कोणी हे पहात असेल तो आपले डोकं खाजवत असेल.
वॉरन बफेट चांगल्या वाढणाऱ्या व नफा जास्त कमावणाऱ्या कंपनींवर लक्ष देतात. ते अशा कंपन्यांवर भर देतात ज्यांचे उत्पादन किंवा सुविधा अद्वितीय आहेत आणि त्यांना स्पर्धेत फायदा होतो. कंपनीची कामगिरी, कंपनीचे कर्ज आणि नफा मार्जिन, इत्यादी गोष्टी बफेट विचारात घेतात. त्याच उद्योगातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत एखाद्या कंपनीने सातत्याने चांगले कामगिरी केली आहे का हे पाहण्यासाठी बफे नेहमीच ROE कडे पाहतात. यावरून कंपनीची वाढ कर्ज घेऊन झाली आहे की प्रगती मधून हे त्यांना कळते.
Warren Buffett Thoughts in Marathi
“जेव्हा आम्ही लोकांना कामावर घेतो, तेव्हा आम्ही तीन गोष्टी शोधतो. आम्ही बुद्धिमत्तेची अपेक्षा करतो, आम्ही ऊर्जा शोधतो आणि आम्ही प्रामाणिकपणाचा शोध घेतो. आणि जर त्यांच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तर बुद्धीमत्ता आणि ऊर्जा तुम्हाला ठार मारतील, कारण जर तुम्हाला कोणी प्रामाणिकपणाशिवाय हवा असेल तर तो तुम्हाला मूर्ख व आळशी हवा असेल. ”– वॉरेन बफेट
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
Warren Buffett Information in Marathi
Warren Buffett Biography in Marathi
Warren Buffett Quotes in Marathi
Warren Buffett Thoughts in Marathi
वॉरेन बफेट माहिती
Leave a Reply