बुद्धिबळ विश्वविजेता विश्वनाथ आनंद यांनी आपल्या प्रतीस्पर्ध्याला दबावात आणण्यासाठी स्वतःच्या खेळात कोणते बदल केले जाणून घ्या… Viswanathan Anand information Biography in Marathi विश्वनाथन आनंद मराठी माहिती
बुद्धिबळ म्हणजे ६४ घरांचा ‘माइंड गेम’ आहे. यामध्ये प्यादी, हत्ती, घोडा, ऊंट, वजीर यांच्यात आपल्या राजाला वाचविण्यासाठी घमासान युद्ध चालते. या खेळाविषयी सर्वांना इतकी माहिती तरी आहेच. आणि या ६४ घरांवर राज्य करणाऱ्या जगजेत्या विश्वनाथन आनंद याच नाव सर्वांना महितच आहे तर आज याच ६४ घरांच्या राजाविषयी माहिती घेऊया.
बुद्धिबळ हा खेळ कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो?
बुद्धिबळ हा रशियाचा राष्ट्रीय खेळ आहे. पण भारताला बुद्धूबळाचा इतिहास आहे. पूर्वी हा भारतात चतुरंग या नावाने ओळखला जायचा.
बुद्धिबळातील सर्व प्रकारात जिंकलेला आनंद हा एकमेव खेळाडू आहे. चार वेळा जगज्जेता, पाच वेळा बुद्धिबळातील ऑस्कर विजेता, सर्वात कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याचा विक्रम करणारा आनंद गेल्या तीन दशकांपासून बुद्धिबळाचा राजा आहे. आपण सर्वकालिन महान खेळाडू असल्याचे त्याने आपल्या कामगिरीने सिद्ध केले आहे. आनंद विश्वनाथन एक अद्भुत प्रतिभेचा बुद्धिबळपटू असून चाणाक्ष खेळाडू म्हणून जगद्विख्यात आहे.
आपल्या एका खेळीने तो बुद्धिबळाची बाजी पलटवून प्रतिस्पर्ध्यावर दबाव वाढवून त्याला चुक करण्यास भाग पाडतो. म्हणूनच त्याला बुद्धिबळाचा शहंशहा आणि बुद्धिबळाचा जादुगार म्हंटलं जातं. क्रीडा क्षेत्रात मिळणारा सर्वोत्तम असा राजीव गांधी पुरस्कार मिळवणारा तो पहिला खेळाडू आहे. तब्बल ५ वेळा वर्ल्ड चेस चैम्पियनशिप आपल्या नावावर करून त्याने आपल्यातील प्रतिभा सिद्ध केलीये.
११ डिसेंबर १९६९ ला तामिळनाडू येथील मयिलाडूथराई या लहानश्या शहरात आनंद चा जन्म झाला पण त्याचं बालपण मात्र चेन्नई इथं झालं. त्याचे वडील विश्वनाथन अय्यर दक्षिण रेल्वेतील निवृत्त मैनेजर तर आई सुशीला देवी बुद्धिबळ प्रशिक्षक आणि प्रभावी समाज सुधारक होत्या. आईमुळेच आनंद बुद्धीबळाकडे आकर्षिला गेला. विश्वनाथन आनंद ला त्याच्या आईने वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षापासून बुद्धिबळाचे धडे देण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्याने बुद्धिबळाच्या पटाशी गट्टी जमविली. बघता बघता त्याने या खेळात नैपुण्य प्राप्त केले. फिलिपाईन्समध्ये टीव्हीवर येणारे पझल्स गेम सोडवून तो पुस्तके जिंकायचा. जिंकलेल्या पुस्तकांचे ढीगच्या त्याच्याकडे लागले होते.
विश्वनाथन आनंद ला मोठा भाऊ शिवकुमार आणि बहिण अनुराधा देखील आहेत. विश्वनाथन आनंद ने आपले सुरुवातीचे शिक्षण चेन्नईच्या एग्मोरे येथील डॉन बॉस्को मैट्रीक्यूलेशन हायर सेकंडरी स्कूल मधून पूर्ण केलं व कॉमर्स विषयाची पदवी चेन्नई येथीलच लोयोला कॉलेज मधून पूर्ण केली.
विश्वनाथन आनंदने २००० ते २००२ पर्यंत फिडे बुद्धिबळ चैम्पियनशिप ( Fide World Chess Championship ) चा किताब आपल्या नावावर करत आपल्यातील अद्वितीय प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. २००७ साली विश्वनाथन आनंद ने World Chess Championship जिंकून अखिल विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं, यानंतर बुद्धीच्या या खेळाचा तो निर्विवाद शहंशाह बनला होता. २००८ साली आयोजित World Chess Championship मध्ये विश्वनाथन आनंद ने ब्लादिमीर क्रैमनिक ला हरवून आपल्या यशाची घौडदौड कायम ठेवली. या विजयामुळे तो Chess Championship चा नॉकआउट, टूर्नामेंट आणि मैच जिंकणारा जागतिक बुद्धिबळ इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. २०१० साली विश्वनाथन आनंद चा सामना बुल्गारिया च्या दिग्गज वेसेलिन टोपालोव समवेत झाला, आणि या स्पर्धेत World Chess Championship चा किताब विश्वनाथन आनंद ने आपल्या नावावर केला. लागोपाठ आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने यश संपादन करणाऱ्या विश्वनाथन आनंद ने २०१२ साली देखील आपले दमदार प्रदर्शन कायम ठेवले आणि बोरिस गेलफैंड ला पराभूत करून पुन्हा एकदा World Chess Championship आपल्या खिशात घातली.
- २०१३-१४ ही वर्षं विश्वनाथन आनंद करता निराशाजनक राहीलीत. या दरम्यान त्याला मैग्नस कार्ललन विरुद्ध दोनदा पराजय पत्करावा लागला.
- २०१८ साली विश्वनाथन आनंद ने कोलकाता येथे पहिला टाटा स्टील बुद्धिबळ भारत ब्लिट्ज टूर्नामेंट किताब जिंकला. या टूर्नामेंट मध्ये आनंद पहिल्या फेरीनंतर चौथ्या स्थानावर होते, पण अखेरच्या दिवशी त्याने ६ फेऱ्या जिंकत तीनदा बरोबरी राखली. परिणामी तो विश्वातील तिसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिकी नाकामुरा च्या बरोबरीत पोहोचला. यानंतर विजेता ठरवण्यासाठी दोन फेऱ्यांचा प्लेऑफ खेळला गेला. या फेऱ्या ब्लिट्ज पेक्षा देखील वेगवान असतात. आनंद ने पांढऱ्या सोंगट्यांनी यश मिळविले, त्यानंतर काळ्या सोंगट्यांनी बरोबरी राखत १.५-०.५ ने विजय प्राप्त केला. हा सामना अत्यंत उत्कंठावर्धक ठरला होता.
आनंदमुळे भारतात लहान मुले आणि युवकांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. त्याला आदर्श मानूनच नवीन खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आता चमकत आहे. क्रिकेटवेड्या देशात आनंदने बुद्धिबळाला एक वेगळी प्रतिष्ठा आणि नवसंजीवनी मिळवून दिली आहे. - भारत सरकार ने आनंदला १९८५ मध्ये अर्जुन अवॉर्ड, १९८७ मध्ये पद्मश्री २००० साली पद्मभूषण व २००७ साली पद्मविभूषण हे पुरस्कार दिले आहेत. भारत सरकारचा सर्वोच्च खेळ पुरस्कार – राजीव गांधी खेळ रत्न (१९९१-१९९२) मिळणारा आनंद हा पहिलाच खेळाडू आहे.
- २५ एप्रिल २००१ साली स्पेन सरकार ने स्पेनचा सर्वोच्च पुरस्कार – Jameo de Oro देऊन आनंदचा गौरव केला. आनंदला आता परियनंत सहा वेळा (१९९७, १९९८, २००३, २००४, २००७, २००८ आणि २००९) चेस ऑस्कर मिळाले आहे.
आनंद च यश हे खूप प्रेरणा दाई आहे. आनंदला मद्रास टायगर पण म्हंटले जाते. आनंदनेच बुद्धिबळ या खेळा कडे फक्त खेळ म्हणून न बघता चांगला करिअर म्हणून बघायला लोकांना भाग पाडले.
-अक्षय जाधव.
कडूस राजगुरुनगर.
Viswanathan Anand information Biography in Marathi
विश्वनाथन आनंद मराठी माहिती
Leave a Reply