महाराष्ट्रातील आख्खी एक पीढी ज्यांची प्रेरणा घेऊन प्रशासकीय सेवेकडे वळली ते म्हणजे विश्वास नांगरे पाटील. त्यांच्या भाषणांनी असंख्य तरुणांना प्रशासकीय सेवेचे वेड लावले. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करायचं म्हटलं तर सर्वात आधी डोळ्यासमोर नाव येत ते म्हणजे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं.
Vishwas Nangare patil information Biography in Marathi
विश्वास नांगरे पाटील यांची माहिती

महाराष्ट्रातील अनेक तरुणांसाठी विश्वास नांगरे पाटील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. एका छोट्याशा गावातून आलेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी फक्त कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवलेलं आहे. त्यांच्या या खडतर प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयात.
५ ऑक्टोबर १९७३ रोजी बत्तीस शिराळा तालुक्यात वारणेच्या काठावर, सह्यादीच्या कुशीत कोकरुड नावाच्या गावी विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म झाला. विश्वास नांगरे पाटील यांचे वडील नावाजलेले पैलवान आणि गावचे सरपंच होतं. आपला मुलगादेखील पैलवान व्हावा अशी त्यांची सुरुवातीला इच्छा होती. मुलाने शाळेपेक्षा तालमीत जावं अशी त्यांची इच्छा होती. तालुक्यातील शाळेत त्यांचे सुरूवातीचे शिक्षण झाले, त्यांचे वडिल त्या गावाचे सरपंच होते. पुढे कोल्हापुर येथे शिवाजी विद्यापीठातुन त्यांनी बी.ए.ची पदवी इतिहास या विषयातुन यशस्वीपणे पुर्ण केली. बी.ए. ची पदवी मिळवताना त्यांना सुवर्ण पदक मिळाले आहे. पुढच्या शिक्षणाकरीता त्यांनी उस्मानिया विद्यापिठात प्रवेश घेतला व एम.बी.ए पुर्ण केले व प्रशासकिय अभ्यासक्रमाचा सराव सुरू केला.
Vishwas Nangare patil information Biography in Marathi
विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
विश्वास नांगरे पाटील यांचे वडील पैलवान आणि सरपंच असल्याने वर्गात त्यांचा धाक असायचा. इतर कोणीही शिक्षक भीतीने त्यांना काही बोलायचं नाही. पण एकदा एका शिक्षिकेने वर्गात आल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांना दोन कानशिलात लगावून आपलं अस्तित्व निर्माण कर असं सुनावलं. विद्या विनयेन शोभते. नम्रता अंगी नसेल तर तुझ्या हुशारीची कवडीमोल किंमत. चालता हो माझ्या वर्गातून.’ अस कदमबाई खडसावतात. विश्वास नांगरे पाटील यांना त्यादिवशी ती गोष्ट प्रचंड मनाला लागली. घरी गेले आणि वडिलांना आपल्याला ओळख निर्माण करायची आहे, शाळेत जाणार नाही असं सांगितलं. विश्वास नांगरे पाटील यांनी आपण गावातील शाळेत जाणार नाही सांगितलं. वडिलांनी समजावल्यावर शिराळ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जाण्यासाठी ते तयार झाले. सकाळी आठ वाजता बस पकडून ते दीड तासांचा प्रवास करत होते. आपली ओळख निर्माण करायची असल्याने तुम्ही अजिबात शाळेत यायचं नाही असं विश्वास नांगरे पाटील यांनी वडिलांना बजावलं होतं. विश्वास नांगरे पाटील यांचा प्रवासात बराच वेळ जात असे. गायकवाड नावाच्या एका सरांच्या हे लक्षात आलं. त्यावेळी विश्वास नांगरे पाटील दहावीत होते. त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांना आपल्याकडे राहण्याचा सल्ला दिला. गायकवाड सरांना पहाटे तीन वाजता उठून व्यायाम करायची सवय होती. त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांनाही सकाळी तीन वाजता उठवण्यास सुरुवात केली.
पहाटे तीन वाजता गार पाण्याने आंघोळ करुन विश्वास नांगरे पाटील ३.३० ते ८.३० असा पाच तास रोज ते अभ्यास करत होते. अभ्यासासाठी विश्वास नांगरे पाटील यांना टाइमटेबल आखलं होतं. सकाळी चार तास, दुपारी चार तास आणि संध्याकाळी चार तास असा अभ्यास ते करायचे. यामुळे अभ्यासात हुशार नसलेले विश्वास नांगरे पाटील १० वीच्या परीक्षेत ८८ टक्के मिळवून तालुक्यात पहिले आले. त्यामुळे आपण हात मारु तिथे पाणी काढू शकतो हा विश्वास त्या तरुण वयात निर्माण झाला. या सवयीचा फायदा त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना झाला. सर्वांचं ऐकून विश्वास नांगरे पाटील यांनी ११ वीला सायन्सला प्रवेश घेतला. पण बारावीला असताना भूषण गगराणी यांचं व्याख्यान ऐकलं आणि त्यातून विश्वास नांगरे पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचं ध्येय बांधलं. गगराणी यांचं भाषण ऐकल्यानंतर पहिल्यांदा विश्वास नांगरे पाटील यांना स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली. यामधून जिल्हाधिकारी, सचिव, आयुक्त बनता येतं, तसंच ही परीक्षा मराठीत देता येते याची त्यांना पहिल्यांदाच माहिती मिळाली.
विश्वास नांगरे पाटील दिल्ली किंवा मुंबईत अभ्यासासाठी असायचे तेव्हा त्यांचे वडील नेहमी पोस्टकार्ड पाठवत असत. त्यामध्ये ते गावाकडील परिस्थिती काय आहे, पैसे काही कमी पडत आहेत का ? काही अडचण येतीये का ? अभ्यास कर अशी विचारपूस करायचे. या पत्राच्या शेवटी ते नेहमी भावड्या, माझे डोळे मिटण्याआधी तुला आयएएस अधिकारी होऊन लाल दिव्याच्या गाडीतून आल्याचं पहायचं आहे असं लिहिलेलं असायचं. मी अनेक प्रेरणा देणारी पुस्तकं वाचली, पण मनात आग पेटवणारी ओळ मला त्या पत्रात सापडली असं विश्वास नांगरे पाटील सांगतात. आपल्या त्या शेतकरी बापासाठी अभ्यास करायचा, स्वप्न पूर्ण करायचं हे लहानपणीच विश्वास नांगरे पाटील यांनी ठरवलं होतं. अभ्यासासाठी महागडी पुस्तकं नसल्याने विश्वास नांगरे पाटील यांनी मित्रांच्या मदतीने गावात स्टडी सेंटर उभं केलं होतं. १९९५ रोजी विश्वास नांगरे पाटील एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाले. पण मुलाखतीत त्यांना २१ वय असल्याने खूप तरुण असल्याचं सांगत लगेचच बाहेर पाठवून देण्यात आलं. लेखी परीक्षेत विश्वास नांगरे पाटील यांना ५३० मार्क होते. पण मुलाखतीत फक्त ७० मार्क दिले होते. विश्वास नांगरे पाटील यांना एकही पोस्ट मिळाली नव्हती.
१९९६ वर्ष त्यांच्या आयुष्यातील खडतर वर्ष होतं. त्यांनी हारदेखील मानली होती. पण वडिलांनी त्यांना पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहण्यास सांगितलं. परीक्षा देणं म्हणजे सात आठ लाख मुलांमधून अगदी पहिल्या १०० -२०० मुलांमध्ये येण्याची आपली तयारी असली पाहिजे. यामुळे विश्वास नांगरे पाटील यांनी प्लॅन बीदेखील आखला होता. स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं तर एमए करुन शिक्षक होण्याचं विश्वास नांगरे पाटील यांनी ठरवलं होतं. हा त्यांचा प्लान बी होता. यासाठीच १२ वीनंतर विश्वास नांगरे पाटील आणि त्यांचा चुलत भाऊ आनंद यांनी इंजिनिअर आणि मेडिकल सोडून आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. जर तुमचा प्लान बी तयार असेल तर अपयश आल्यानंतर त्रागा होत नाही असं विश्वास नांगरे पाटील सांगतात. मुंबईत आमदार निवासमध्ये राहत असताना विश्वास नांगरे पाटील यांना कधीतरी उदास वाटायचं, निराशा यायची. त्यानंतर ते मरीन ड्राइव्हला जाऊन बसत असत. सुर्यास्त पाहताना अनेकदा त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचे. १९९७ ला पुन्हा एकदा विश्वास नांगरे पाटील यांनी अभ्यास सुरुवात केली.
त्यानंतर विश्वास नांगरे पाटील अंबिवली येथे आपल्या आत्त्याकडे राहण्यास आले. रोज सकाळी ३.३० वाजता पहिली ट्रेन पकडून ते सीएसटीला पोहोचत. ग्रंथालयात पोहोचणारे ते पहिले असायचे. दिवसभर तिथे ते अभ्यास करायचे.
१९९७ रोजी विश्वास नांगरे पाटील यांनी सलग १३ परीक्षांमध्ये यश मिळवल.
१९९७ मध्ये विश्वास नांगरे पाटील फक्त आयपीएस झाले नव्हते तर एमपीएससीमधून उप-जिल्हाधिकारी म्हणूनही निवडले गेले होते. सेल्स टॅक्समध्येही इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली होती. पीएसआयच्या फिजिकलपर्यंत गेले होते. मुलाखतीची वेळ आली तेव्हा विश्वास नांगरे पाटील फार घाबरले होते. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांचं पॅनेल त्यांची मुलाखत घेणार होतं. इंग्रजी चांगली नसल्याने ते घाबरले होते. पण ते आत्मविश्वासाने सामोरे गेले. यावेळी एक प्रश्न विश्वास नांगरे पाटील यांना विचारण्यात आला तो म्हणजे, या जगात तू का आला आहेस ? यावर त्यांनी सांगितलं की, “मी संघर्ष करण्यासाठी आलो आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन इथपर्यंत पोहोचलो आहे, जर सिस्टीममध्ये आलो तर वाईट गोष्टींविरोधात संघर्ष करेन”.विश्वास नांगरे पाटील १९९७ रोजी ३०० पैकी २१० गुण मिळवत महाराष्ट्रात पहिले आले होते. अपयशाला कधी घाबरायचं नाही, आयुष्यात चढ-उतार येत असतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना तर निराशा पाचवीला पुजलेली आहे. त्यामुळे प्रयत्न आणि कष्ट करत राहणं गरजेचं आहे असं विश्वास पाटील सांगतात.
ज्या सुमारास विश्वास नांगरे पाटील पुणे जिल्हयातील ग्रामीण पोलिसदलात अधिक्षक म्हणुन कर्तव्यावर होते तेव्हां पुण्यात ४ मार्च २००७ ला घडलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात त्यांनी केलेल्या कारवाई ने त्यांना फार प्रसिध्दी मिळाली होती. सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे गावात एका शेतात रेव्ह पार्टी सुरू असल्याची बातमी पुणे ग्रामिण पोलिसांना मिळाली. त्यांनी छापा मारून तब्बल २८७ तरूण तरूणींना ताब्यात घेतले. प्रयोग शाळेत त्यां मुलामुलींच्या तपासणी नंतर त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले होते. पुणे ग्रामिण पोलिसांनी केलेल्या या कारवाई मुळे विश्वास नांगरे पाटील त्यावेळी प्रसिध्दीच्या झोतात आले होते.
मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला.
मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया समोर असलेल्या प्रसिध्द अश्या ताज हॉटेल वर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी तेथे पोहोचुन परिस्थीतीचा अंदाज घेणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी विश्वास नांगरे पाटील हे एक होते. त्या सुमारास त्यांच्यासह केवळ दोन कॉन्स्टेबल आणि फक्त एक अंगरक्षक सोबत होते त्यांच्या सुरक्षेकरता सुरक्षाकवच देखील त्यावेळी नसतांना त्यांनी गोळीबार सुरू असलेल्या हॉटेल मधे प्रवेश केला. ९ एमएम च्या बंदुकीतुन ते दहशतवाद्यांचा प्रतिकार करीत होते.
मागोवा घेत घेत ते सहाव्या मजल्यापर्यंत गेले. विश्वास नांगरे पाटलांच्या प्रतिकारामुळे दहशतवादी ताज च्या नव्या ईमारतीत जाऊ शकले नाहीत. नांगरे पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूम मधे गेले आणि तिथे असलेल्या सीसीटिव्ही च्या सहाय्याने ते दहशतवाद्यांच्या कारवायांची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकार्यांना पोहोचवित राहीले. एनएसजीचे कमांडो सकाळी पोहोचेपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांनी आपली जवाबदारी अतिशय निष्ठेने पार पाडली.
वेळेचं महत्व सांगताना विश्वास पाटील सांगतात, एका वर्षाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा, एका महिन्याचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर आठव्या महिन्यात बाळाला जन्म देणाऱ्या आईला विचारा, एका आठवड्याचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा. एका दिवसाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर जाणाऱ्या कामगाराला विचारा. एका तासाचं महत्त्व प्रेयसीची वाट पाहणाऱ्या प्रियकराला विचारा. एका मिनिटाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन सुटली आहे त्याला विचारा आणि एका सेकंदाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर जो नुकताच अपघातातून वाचला आहे त्याला विचारा. आणि मिलीसेकंदचं (सेकंदाच्या दहाव्या भागाचं) महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या धावपटूला विचारा.
अक्षय जाधव.
मित्रांनो, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा संघर्ष तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Vishwas Nangare patil information Biography in Marathi
विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
Leave a Reply