सतत आक्रमक पवित्रा घेऊन मैदानावर वावरणारा, उत्तम फलंदाज कर्णधार विराट कोहलीने स्वतच्या फिटनेस कडे का लक्ष दिले जाणून घ्या Virat Kohli Information Biography in Marathi
क्रिकेटर विराट कोहली माहिती मराठी
सध्याच्या काळातील क्रिकेटचा बादशाह. “CHASE MASTER” म्हणून ओळख असणारा हा खेळाडू. जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा नवीन विक्रमाला गवसनी घालतो. भारतीय क्रिकेट मध्ये फिटनेसचे महत्व रुजू करणारा हा खेळाडू आणि उत्तम कर्णधार. कोहली बद्दल कोणाला काही माहीत नाही अस शोधून सापडनार नाही. कोहलीचे टीकाकार ते आहेत ज्यांना एकतर क्रिकेट कळत नाही किंवा कोहली त्यांच्या आवडत्या खेळाडू पेक्षा उत्तम खेळतो. बाकी दूसरे कारण मला तरी सापडत नाही.
फिटनेस स्टाईल आणि आक्रमकपणा = विराट
विराट ज्यावेळेस टीम मध्ये आला त्यावेळेस किरकोळ शरीर बांध्याचा, अस त्याचं फिजिक्स होत. त्याने स्वतःची एक छबी तयार करण्यास सुरवात केली… यात त्याचा लूक आहे, स्टाईल आहे… असे बदल तो करत गेला. विराट ने फक्त मैदानावर सराव केला नाही तर जिम मध्ये वर्कआउट केला… यामुळे त्याची फिटनेस चांगली झाली. उत्तम फिटनेस राहण्यासाठी त्याने स्वतःचा आहार ही बदलला… हे सगळे बदल तो स्वतामध्ये करत गेला. यात बी सीसी आय चा वाटा आहेच… पण सध्याच्या विराटच्या टीम मध्ये अनेक खेळाडू सरावाबरोबर जिम मध्ये देखील वर्कआउट करतात… यातून सकारात्मक आणि आक्रमक अशी विराटची टीम बनली जी विरोधकांच्या मनावर दबदबा ठेवण्याचा प्रयत्न करते.
सौरव गांगुली नंतर ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन त्यांच्याच टीमची स्लेजिंग करणारा हा कर्णधार ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भाषेत उत्तर देणारा हा कर्णधार. काही बोलतात कोहलीला माज आहे मी म्हणतो तो माज नाही त्याला स्वतः वर आणि त्याच्या टीम वर तितका विश्वास आहे की ते कोणाला कधी पण आणि कुठे पण हरवू शकतात आणि तो माज नाही त्यांच अॅग्रेशन आहे. ते जे सौरव गांगुली मध्ये पण होते. त्यांनातर कोहली मध्ये ते दिसून येते आणि खेळाडू मध्ये ते हवेच प्रत्येकात असते काही दाखवतात काही दाखवत नाही पण त्याचे अग्रेशन ही त्याची ताकद आहे कधी बघितलय का अग्रेशन मधे चुकीचा फटका मारताना बाद झाला आहे तो. पण त्याच्या हा क्रिकेटचा महान खेळाडू होण्याचा प्रवास काय सोप्पा नव्हता. इथ पर्यंत पोहचन्यासाठी स्वतःचे वडील वारल्या नंतरही मैदानात हातात BAT घेऊन धावा काढाव्या लागतात. इतक्या सहजासहजी क्रिकेट जगतावर राज्य करता येत नाही. याच “Modern day Great” असणाऱ्या विराटचा प्रवास आज मंडतोय.
Indian Cricketer Virat Kohli information in Marathi
विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये दिल्ली येथील एका पंजाबी कुटुंबामध्ये झाला. व्यवसायाने वकील असणाऱ्या त्याच्या वडिलांचे नाव प्रेम कोहली आहे आणि आईचे नाव सरोज कोहली असे आहे. त्याला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. त्यांची नावे विकास आणि भावना आहेत.
कोहलीचे टोपण नाव “चिकू” आहे त्याचे हे नाव प्रशिक्षक राजीव शर्मा यांनी ठेवले आहे. लहानपणापासून चिकू हातात बॅट घेऊन वडिलांना गोलंदाजी करायला लावायचा. त्याची ही आवड ओळखून शेजाऱ्यांनी प्रेम कोहलींना, त्याला अकॅडमीत भरती करा असे सांगितले. त्याचे प्राथमिक शिक्षण विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये चालू होते शिवाय त्याला पश्चिम दिल्ली क्रिकेट अकॅडमीमध्ये देखील भरती करण्यात आले. अकॅडमीत त्याला प्रशिक्षक राजकुमार शर्मा उर्फ राजीव शर्मा यांचे प्रशिक्षण लाभले. ह्या व्यवसायिक क्लब मधून तो क्रिकेटचे धडे गिरवत गेला. क्रिकेटमधील जास्त सरावासाठी दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहतीमधील सेवियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. कोहली लहानपणापासूनच हुशार आणि चपळ असल्याने तो क्रिकेटमध्ये खूपच प्रगती करत गेला. कोहलीच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी मेंदूच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे निधन झाले असताना कोहलीची कसोटी क्रिकेट मॅच चालू होती. वडिलांच्या दुःखद मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी तो क्रिकेट मॅच खेळायला जाणे हे अनेक जणांना आश्चर्यचकित करणारे होते. परंतु आजचा किंग कोहली पाहता त्यावेळीही असणारे त्याचे क्रिकेटबद्दलचे वेड दिसून येते. वडिलांचा अभाव त्याला खूप जाणवतो, असे त्याने खूप वेळा नमूद केले आहे. त्याचे वडील त्याला सतत सरावासाठी घेऊन जायचे. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी क्रिकेट खेळू शकलो अशी टिप्पणी देखील तो वारंवार करत असतो.
- २००३-०४साली “पॉली उम्रीगर ट्रॉफी” साठी त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. त्या स्पर्धेत त्याने दोन शतके झळकावली.
- २००४-०५मध्ये विजय मर्चंट ट्रॉफीसाठी १७ वर्षांखालील दिल्ली संघात निवडला गेला. त्या स्पर्धेत त्याने दोन शतकांसह ४७० धावा केल्या.
- जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा श्रीलंकेचा दौरा होता. श्रीलंका, बांगलादेश आणि भारत या तिन्ही देशांच्या त्रिकोणी मालिकेत त्याची फलंदाजी खूपच सुधारली होती. त्याच्याकडे या मालिकेत खेळपट्टीवर तग धरून धावा जमवत राहण्याचे कौशल्य आले होते.
- फेब्रुवारी-मार्च २००८ मध्ये भारतीय 19 वर्षाखालील संघाने मलेशिया येथे पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत त्याने ६ सामन्यांत ४७च्या सरासरीने त्याने २३५ धावा केल्या. या विजेतेपदानं तर कोहली भारताचे भविष्य म्हणून उदयास येऊ लागला.
तेंडुलकर आणि सेहवाग उपलब्ध नसल्याने सलामीवीर म्हणून विराट कोहलीने ऑगस्ट २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. सलामीच्या सामन्यात कोहली १२ धावांवर बाद झाला. उर्वरित सामन्यांत त्याने ३७, २५, ५४ आणि ३१ धावा काढल्या. जुलै–ऑगस्ट २००८ मध्ये उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली. या स्पर्धेत त्याने ६६.३३ च्या सरासरीने सर्वाधिक ३९८ धावा केल्या. अंतिम सामन्यात त्याने १०४ धावांची खेळी साकारली. तो सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने १७ धावांनी जिंकत विजेतेपद पटकावले. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची निवड झाली. जखमी युवराज सिंहच्या जागी तो चौथ्या क्रमांकावर खेळला. वेस्ट इंडिज विरूध्द १३० धावांचा पाठलाग करताना त्याने ७९ धावांची खेळी साकारली. या सामन्यात प्रथमच त्याने क्रिकेटमध्ये “सामनावीर” हा पुरस्कार पटकावला.
क्रिकेटर विराट कोहली माहिती मराठी
कोहलीची लक्षात राहनारी एकदिवसीय खेळी म्हणजे २०१२ मध्ये एशिया कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना चोपलेल्या १३८ चेंडूमध्ये १८३ धावा मला अजूनही आठवतात तेव्हा आमच्या शाळेच्या फळ्यावर माझे लिहिलेले वाक्य “कोहलीची विराट खेळी भारतीय क्रिकेट मध्ये अत्युच्य शिखरावर जाण्याची क्षमता असलेल्या खेलाडूची विराट कामगिरी”. आणि ही खेळी अर्थातच पाकिस्तान विरुद्ध असल्याने आनंद गगनात मावत नव्हता. अजुन एक खेळी मला आठवतीये ती म्हणजे जयपुर मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेली ५२ चेंडू मध्ये १०० धावा त्यांच सामन्यात रोहित नेही शतक केले होते भारतात विजयासाठी ३६० धावा काढायच्या होत्या त्यात शिखर आणि रोहित ची तूफानी सलामी आणि त्यावर विराट चा तडका जवळ जवळ ७ षटके राखुन आपण तो सामना जिंकला.
Virat Kohali Essay Speech in Marathi
कोहलीला सर्वात मोठे आव्हान होत ते इंग्लैंड मध्ये जाऊन कसोटी मध्ये एंडरसन- ब्रॉड या जोडगोळी विरुद्ध धावा काढन्याचे मग भारत २०१४ च्या दौऱ्यासाठी इंग्लैंड ला गेला इंग्लैंड च्या पीचेस वर रन काढण मुश्किल आणि त्यात एंडरसन आणि ब्रॉड सर्वांचे लक्ष कोहलिकडे होते. हा दौरा कोहलीच्या आयुष्यातील कसोटीचा काळ ठरला ज्यांना क्रिकेट मधले काही कळत नाही त्यांनी सुद्धा त्याच्या तंत्रा वर प्रश्न उपस्थित केले कारण होते १० डावा मध्ये १३.५० च्या सरासरीने काढलेल्या धावा. पण एका अपयशाने खचून जातोय तो कोहली कसा त्याने मेहनत घेतली आणि त्यानंतरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊन कर्णधार पद मिळाल्यावर अक्षरशः खोर्याने धावा काढल्या त्याने. त्यांनातर मात्र कधी त्याने मागे वळून बघितलेच नाही. कसोटी असो एकदिवसीय असो नाहीतर T20 असो कोहलीची बैट आग ओकतच राहिली. आईपीएल मध्ये तर एकाच सीजन मध्ये तब्बल ४ शतके ठोकली त्याने.
कोणतेही आडवे-तिडवे फटके न मारता सुद्धा धावा काढता येतात हेच त्याने दाखवून दिले. सचिनने म्हटले आहे विराट आणि रोहित माझे रिकार्ड्स मोडू शकतात. विराट त्याच दिशेने अग्रेसर आहे आणि एक दिवस त्याने तस केल तर आश्चर्य नको. अजुन कोहली मध्ये खुप क्रिकेट शिल्लक आहे आणि रणांची भूक सुद्धा. आता अलिकडेच संगकाराला रिपोर्टर्स ने विचारल की सध्याच्या काळात ‘संगा ड्राइव’ कोण चांगल खेळत तर त्यांच उत्तर आल विराट कोहली. संगा ड्राइव म्हणजे कवर ड्राइव जसा सचिनचा स्ट्रैट ड्राइव बघितल्यावर हृदयाला आनंद व्हायचा ना अगदी तसाच आनंद माझ्या सारख्या क्रिकेट प्रेमिंना कोहलीचा कवर ड्राइव बघितल्यावर होतो.
कोहलीला त्याच्या भावी कारकिर्दी साठी शुभेच्छा आणि त्याने भारतासाठी अजुन विक्रम करावे अशीच इच्छा.
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
Virat Kohli Information Biography in Marathi
क्रिकेटर विराट कोहली माहिती मराठी
virat kohli information in Marathi for project
virat kohli information in Marathi in short
Virat Kohali Essay Speech in Marathi
Indian Cricketer Virat Kohli information in Marathi
क्रिकेटर विराट कोहली माहिती मराठी
विराट कोहली निबंध मराठी
Leave a Reply