माझी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती

Vilasrao Deshmukh information biography in Marathi language
विलासराव दगडोजिराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी बाभळगाव, लातूर येथे झाला. ते फार मोठे मराठी भारतीय राजकारणी होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात 29 व्या वर्षी बाभळगाव ग्रामपंचायत सरपंच पदापासून झाली. फक्त एकोणतिसाव्या वर्षी त्यांनी सरपंचपदी निवडून येऊन गावासाठी बऱ्याच चांगल्या गोष्टी अमलात आणल्या. विलासराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य.19 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 व 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 असे दोन वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले. त्याच प्रमाणे मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे ते केंद्रीय मंत्री होते. त्यांचे शिक्षण पुण्यामध्ये पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेऊन पूर्ण झाले.
Vilasrao Deshmukh Speech essay in Marathi माझी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती
बाभळगाव सरपंच पदानंतर युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक व पंचायत समितीचे उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्य अशी पदे भूषवली. इसवी सन 1980 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली, तेव्हा ते 1995 पर्यंत आमदार म्हणून कार्य करत होते. 1995 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण पुन्हा त्यांनी आमदार म्हणून पुनरागमन केलं ते 1999 ते 2003 पर्यंत. इसवी सन 1982 ते 1985 दरम्यान विलासराव देशमुखांकडे राज्यमंत्री, ग्राम विकास, गृह सामान्य प्रशासन, कृषी, परिवहन, शिक्षण, तंत्रशिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, माहिती व जनसंपर्क ही खाते होती.
त्यानंतर सर्वात मोठा सुवर्ण टप्पा त्यांच्या आयुष्यात आला. तो म्हणजे 19 ऑक्टोबर इसवीसन 1999 ते 16 जानेवारी इसवीसन 2003 मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रासाठी बरेच कार्य केले. त्यामुळेच 11 नोव्हेंबर इसवी सन 2004 ते 7 डिसेंबर इसवी सन 2008 मध्ये त्यांची मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म पूर्ण झाली. परंतु 2008 सालीच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले. त्यांच्यावर मुंबईमध्ये घडलेल्या घटनांबाबत मुख्यमंत्री गंभीर नाहीत असा आरोप लावला गेला. तरीही त्यानंतर विलासरावांनी इसवी सन 2009 ते 2011 दरम्यान केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून काम केले. त्याच प्रमाणे 12 जुलै 2011 ला ते विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री म्हणून कार्यरत होते
Vilasrao Deshmukh information biography in Marathi language
मुंबई घटनेच्या आरोपाप्रमाणे,दिलीप सानंदा प्रकरणामुळे उच्च न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला. ज्यामध्ये विलासराव देशमुख यांना दिलीप सानंदा यांचे घनिष्ठ व केस मध्ये त्यांचेही नाव गोवल्यामुळे सरकारी चौकशीला तोंड द्यावे लागले होते.तसेच सुभाष घई यांना जमीन देण्यावरून न्यायालयाने ओढलेले कडक ताशेरे. असे आरोप झेलावे लागले.
केंद्र शासनातील भूषवलेली पदे:-
1.भारी उद्योग आणि सार्वजनिक उद्योग मंत्री २८ मे २००९ – १९ जानेवारी २०११
2.ग्रामीण विकास मंत्री १९ जानेवारी २०११ – १२ जुलै २०११
3. पंचायती राज मंत्री १९ जानेवारी २०११-१२ जुलै २०११
4. विज्ञान और प्रौद्योगिकी मंत्री १२ जुलै २०११ – १४ ऑगस्ट २०१२
5. पृथ्वी विज्ञान मंत्री १२ जुलै २०११ – १४ ऑगस्ट २०१२.
मृत्यू:-
१४ ऑगस्ट इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती आणि यकृताचा कर्करोग (हेप्टोसेल्युलर कार्सिनोमा) झाल्याने यकृताला सूज आली होती.
विलासराव देशमुख यांच्यावर लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ह्या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या १७ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी अनेक राजकारणी, चित्रपट सृष्टीतील नामवंत आणि लाखो चाहत्यांचा समावेश होता. त्यांत पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, शरद पवार राज ठाकरे आणि अनेक मंत्री होते.
ग्रंथ:- विलासराव देशमुखांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात शरद पवारयांच्या हस्ते ’आठवणीतील विलासराव’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
–गौरी डांगे.
मित्रांनो, Vilasrao Deshmukh information biography in Marathi language Vilasrao Deshmukh Speech essay in Marathi माझी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Comments