प्रत्येकाचा अंगणात तुळस असतेच तिची पूजाही केली जाते पण तुळसेचे औषधी गुणधर्म आपण विसरत चाललोय जाणून घ्या तुळसेचे पाने चाघळल्याने आपल्या आरोग्यास होणारे फायदे. या ‘Tulas Ayurvedic Vanaspati Tulsi Plant Information in Marathi Language’ लेखामध्ये.
तुळस या औषधी वनस्पती विषयी माहिती मराठी
Tulas Ayurvedic Vanaspati Tulsi Plant Information in Marathi Language
Medicinal Uses of Tulsi in Marathi Language
तुळस म्हटली की, डोळ्यासमोर भलं मोठ्ठ अंगण आणि त्या अंगणात हिरवी गच्च पानांनी भरलेली तुळशीचं रूप हुबेहुब दिसतं. जेवढी ती हिरवी गच्च पानांनी भरलेली तुळस लसलशीत दिसून येते तेवढच त्या पानांमध्ये तिचं महत्त्व, गुणकारी औषधी उपयोग दडलेलं आहे.
Importance of Tulsi Plant in Hindu Culture Marathi Language
तुळस सांस्कृतिक महत्व
हिंदू धर्मात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे. तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा अंगणात तुळशीचे रोप लावले जाते. अनेकजण विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करतात आणि प्रदक्षिणा घालतात. अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो. बर्याच वेळेला आपण बघतो की लग्न-समारंभाच्या कार्याला तुळशीची पूजा केली जाते. तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे घरात सुखशांती वास करते.
शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पुजा करावी. संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावावा. वड-पिंपळचं झाड जास्त प्रमाणात प्राणवायू देते तसंच तुळस सुद्धा ही एक जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्वाचे स्थान आहे. तसेच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.
भारतात साधारणतः तुळशीचे रोप जास्त प्रमाणात आढळून येतात; त्याचबरोबर आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडामध्ये बहुतेक भूप्रदेशात ही रोप आढळून दिसतात. तुळशीचे रोप साधारणतः ३० ते १२० सेमी उंचीपर्यंत वाढतात. तुळसीचे पाने लंबगोलाकार, किंचीत टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळस ही लेबियाटी म्हणजे पुदीनाच्या कुळातील एक सुगंध वनस्पती आहे. तुळशीच्या तुर्रयासारख फुलांना मंजिरी म्हणतात. अन त्याच मंजिरीना सर्व देवांची प्रतिनिधी मानले जाते. त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात.
Tulsi Che Prakar तुळस चे प्रकार
शास्त्रानुसार आपल्याला तुळशीचे प्रकार आणि काही जाती अनुभवायला मिळाल्या. त्याचे दोन प्रकार म्हणजे
एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस . तसेच तिच्या काही जाती औषधी तुळस तुळस, कापूर तुळस, काळी तुळस , कृष्ण तुळस , रान तुळस , राम तुळस. दुर्वा या तुरट-गोड तर तुळस ही कडू-तिखट. दुर्वा शीत तर तुळस ही ह्रदयोषण. दुर्वा पित्ततृषारोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी, तर तुळस
Tulsi Che Upyog in Marathi
पित्त आणि भूक वाढवणारी. तसेच रात्रीच्या अवेळी कधीही तुळशीची पाने तोडू नये. तुळशीचे झाड लावल्यानंतर सुकून गेल्यास असे झाड घरात ठेवू नका. ते लगेच नदी अथवा तलावात प्रवाहित करा आणि दुसरे झाड आणून लावा. कारण जिथे तुळशीचा वसा तिथे साक्षात ईश्वराचा वसा असतो. त्यामुळे आपण शक्य होईल तेवढ्या प्रमाणात तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी.
तुळस औषधी उपयोग गुणधर्म तुळस तुळशीची पाने खाण्याचे फायदे
Benefits of Tulsi Leaves in Marathi
Medicinal Uses of Tulsi in Marathi Language
Uses of Tulsi Leaves in Marathi Language
येणाऱ्या पिढीला किंवा जाणाऱ्या पिढीला जे आजार उद्भवतात ते या तुळशीमुळे टळू शकतात. तुळस ही गुणकारी औषधी वनस्पती मानली जाते. म्हणजेच की, आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे.
- लहान मुलांच्या खोकल्यावर किंवा टाँनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात.
- पाचनामध्ये काळ्या तुळसीच्या रसपाचक म्हणून उपयोग होतो.
- कानाच्या दुखण्यावर उपाय म्हणून पानाचा रस उपयुक्त ठरतो.
- उष्णतेच्या त्रासापासून आराम देते. आपल्याला मधमाशीने कुठेही दंश मारला तर आपण चटकन तुळशीच्या मातीचा लेप लावू शकतो. कारण तुळशीची माती थंड असते त्यामुळे त्या जखमेची आग कमी होते आणि आरामही पडतो.
- तिचे पान, खोड, बी सर्वच औषधी आहे. तुळस पूजनीय वनस्पती असून तुळशीमुळे सभोवतालचे वातावरण स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. तसेच मानवी जीवनात तुळशीचे महत्त्व मोठे आहे कारण ती एकाचवेळी रोगांचे निर्मुलन करते.
- एकाग्रता वाढवण्याचा गुण ही तुळशीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या पानांच्या सेवनाने विशेष उपयोग होतो.
- काही संशोधनामुळे अस सिद्ध झाले आहे की, तुळशीच्या पानात कर्करोग, ह्रदयरोग, किडनीचे आजार आणि त्वचा रोग बरे करण्याची अपूर्व शक्ती आहे.
- तुळशीचीपाने दही किंवा गोड ताकाबरोबर खाल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर प्रमाण बद्ध राहते आणि वजन कमी होऊन शरीर प्रमाण बद्ध राहते; तसेच चालतांना दम लागत नाही.
- आपण चहात तुळशीचे पाने घालतो जेणेकरून आपला बारीक ताप, सर्दी असे छोटे आजार बरे होतात आणि त्या चहाचा सुगंध ही खूप मनमोहक असतो.
आयुर्वेदिक औषधी वनस्पती विषयी माहिती पुस्तक
त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात ‘ तुळशीचे लग्न ‘ हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यातही तिचे बरेच महत्व कळते. तुळशीचा विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळेते आणि मोक्ष प्राप्ती होते. आपल्याला एखादी वस्तू देवाजवळ अर्पण करायची असेल तर तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात; म्हणजे की ती वस्तू इष्ट देवताकडे पोहचते अशी समजूत आहे. तसेच केरळमध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे. तिथल्या लग्न सोहळ्यात वर-वधू फुलांचा हार न घालता तुळशीचा हार घालून सोहळा पार पाडला जातो.
मित्रांनो मी आशा करते की तुम्हाला आयुर्वेदिक आणि पूजनीय असलेल्या “तुळस” Tulas Ayurvedic Vanaspati Tulsi Plant Information in Marathi Language बद्दल ही महत्वपूर्ण महीती तुम्हाला नक्की आवडेल. तुळस तुळशीची पाने खाण्याचे फायदे तुळस या औषधी वनस्पती विषयी माहिती मराठी तुळसीचा वापर तुम्ही निरोगी राहण्यासाठी नक्की कराल. अशीच महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी College Catta कॉलेज कट्टा या संतेस्थाळाला भेट द्या. ही माहिती कशी वाटली हे खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा.
-तेजल महाजन
धुळे.
Tulas Ayurvedic Vanaspati Tulsi Information in Marathi Language Medicinal Uses of Tulsi in Marathi Language Tulsi Uses in Marathi Language Tulsi Tree Information in Marathi Language Tulsi Plant Uses in Marathi Language Uses of Tulsi Leaves in Marathi Language Tulsi Che Upyog in Marathi Importance of Tulsi Plant in Marathi Language Tulsi Che Prakar तुळस चे प्रकार तुळस औषधी उपयोग गुणधर्म Benefits of Tulsi Leaves in Marathi
Leave a Reply