Top 10 headphones in Marathi language
हेडफोन हे प्रत्येकाच्या जीवनातील महत्वपूर्ण वस्तू आहे. फावल्या वेळात किंवा प्रवास करत असताना आपण आनंदाने हेडफोनचा लाभ घेतो. आपल्याला सांगू इच्छितो की मार्केटमध्ये असे खूप हेडफोन आहेत जे अधिक महाग मॉडेलच्या आवाज आणि वैशिष्ट्यांना प्रतिस्पर्धा करतात. खरं तर, अगदी कमी किमतीच्या हेडफोन देखील आहेत जे बर्याच महाग असलेल्यांना टक्कर देतात.
दुर्दैवाने, स्वस्त हेडफोन शोधणे नेहमीच सोपे नसते ज्यात ध्वनीची गुणवत्ता असते किंवा ग्राहकांना आवश्यक असणारी वैशिष्ट्ये. आजकाल बघितलं तर बाजारात इयरफोनचे बर्याच भिन्न ब्रँड असतात. म्हणूनच आम्ही सध्या उपलब्ध असलेल्या दहा सर्वोत्तम स्वस्त हेडफोन्सवर जाण्याचे ठरविले आहे. हे असे ब्रँड आहेत जे त्यांच्या किंमती श्रेणीसाठी सर्वोत्तम आवाज गुणवत्ता आणि वैशिष्ट्ये प्रदान करतात.

१०. Sony WI-C200 Wireless Neck-Band Headphones (₹1790/-)
सोनी कंपनीचा हा हेडफोन ब्रँड या सूची मध्ये दहाव्या स्थानावर स्थित आहे. या हेडफोन मध्ये विशेष म्हणजे ब्लूटूथ टेक्नॉलॉजी असून तो वायरलेस आहे. सहजपणे आपण हे हेडफोन आपल्या मोबाईल फोन सोबत ब्लूटूथ द्वारे कनेक्ट करून गाण्यांचा लाभ घेऊ शकतो. हे हेडफोन एकदा चार्ज केल्यानंतर ते आपण १५ तासांपर्यंत अखंड वापरू शकतो. त्यासोबतच या हेडफोन मध्ये 9mm चे ड्राइवर युनिट आहे जे स्पष्ट आवाज देण्यासाठी मदत करतात. या व्यतिरिक्त त्यात इन बिल्ट माईक देखील आहे.

९. Mi Earphone Basic with Ultra deep bass and mic (₹399/-)
MI कंपनीचे हे हेडफोन बास साठी प्रसिद्ध आहे. या हेडफोनमध्ये आपण जबरदस्त बास समवेत गाण्यांचा आनंद घेऊ शकतो. विशेष गोष्ट म्हणजे या हेडफोन मध्ये Aluminum Sound Chamber आहे जे स्पष्ट आवाजाचे प्रतीक आहेत. याव्यतिरिक्त या हेडफोन मध्ये High-Quality Silicone Earbuds असल्यामुळे कानाला त्याचा त्रास देखील नाही होत. MI चे हे हेडफोन बजेट सोबतच आवाजसाठी देखील चांगले आहेत.

८. BoAt BassHeads 100 Hawk Inspired Earphones (₹399/-)
boAt ही हेडफोनची प्रसिद्ध कंपनी आहे. boAt कंपनीचे या हेडफोनला स्टायलिश लुक देण्यात आली आहे. या हेडफोनमध्ये विशेष गोष्ट अशी आहे की त्यात एचडी मायक्रोफोन आहेत जे कॉलिंगसाठी महत्वपूर्ण असतात. त्या सोबतच या हेडफोनमध्ये अनेक असे फोन हँडलिंग बटण आहेत. या हेअडफोनची फ्रिक्वेन्सी 20Hz – 20KHz इतकी आहे. खरोखरच हे हेडफोन भरपूर उपयुक्त आहेत.

७. BoAt BassHeads 225 in-Ear Super Extra Bass Headphones (₹599/-)
boAt कंपनीचे हे नवीन हेडफोन बाससाठी ओळखले जातात. या हेडफोन मध्ये noise cancellation सिस्टिम आहे जी बाहेरील आवाजाला काही प्रमाणात कमी करते त्यामुळे आपल्याला गाणे ऐकतांना बाहेरचं काहीही ऐकू येत नाही. या हेडफोनचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे स्टायलिश लुक जे ग्राहकांना आकर्षित करतात. सोबतच या हेडफोन ला पॉज/प्ले बटण देखील आहे ज्याच्या मदतीने आपण मोबाईल नियंत्रित करू शकतो.

६. PTron Bassbuds True Wireless Earbuds (₹1090/-)
PTron कंपनीचा हा ब्रँड एक Earbud हेडफोन आहे ज्याला कोणत्याही प्रकारची वायर लागत नव्हे. या हेडफोन मध्ये ब्लूटूथचे उपग्रडेड आवृत्ती म्हणजेच ब्लूटूथ 5.0 वापरण्यात आली आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे आपण मोबाईल पासून 10 मीटर दुर पर्यंत हे हेडफोन वापरू शकतो. सोबतच 50mAh च्या 2 बॅटरीचा या मध्ये समावेश केला आहे. यासोबतच हे हेडफोन 10 मिनिट चार्जे केल्यानंतर 1 तासापर्यंत आपण त्याचा लाभ घेऊ शकतो.

५. HONOR AM115 (₹399/-)
हॉनर कंपनीचे हे हेडफोन सर्वात स्वस्त आणि मस्त क्वालिटीचे आहे. हे हेडफोन कानासाठी आरामदायक आणि मनोरंजक आहे. या हेडफोनच्या माईकवर तीन बटणचा समावेश आहे ज्याने आपण मोबाईल नियंत्रित करू शकतो. या सोबतच आपण या हेडफोन मध्ये फिरत्या आवाजच अनुभव देखील घेऊ शकतो.

४. Realme Buds 2 (₹599/-)
रिअलमी कंपनीचे हे हेडफोन प्रॉडक्ट बास साठी महत्वपूर्ण आहे. या हेडफोनची डिझाईन ग्राहकांना आकर्षित करते. 11.2mm चे बास ड्राइवर असल्यामुळे हे हेडफोन जबरदस्त बास अनुभव देतात. माईकवरील 3 बटण हे मोबाईल नियंत्रित करण्यासाठी दिलेले आहेत. Realme चे हे प्रॉडक्ट भरपूर लाभकारक आहे तसेच हे रिअल व्हॉइसचा देखील अनुभव देतात.

३. boAt Rockerz 255 Sports Bluetooth (₹1499/-)
boAt कंपनीचे हे हेडफोन ब्लूटूथ टेक्नॉलॉजीशी संलग्न आहे ज्यामुळे आपल्याला मोबाईलशी हेडफोन कनेक्ट करायला कोणत्याही प्रकारची वायर लागग नाही. हे हेडफोन Stereo Sound साठी उपयुक्त आहेत. तसेच आपण खेळता-खेळता ही गाण्यांचा अनुभव करू शकतो. विशेष म्हणजे 10 मिनिट चार्जिंग करून आपण जवळपास 45 मिनिटे याचा लाभ घेऊ शकतो.

२. Realme Buds Wireless
Realme चे हे हेडफोन वायरलेस, साधे आणि सोपे प्रकारचे आहेत ज्यामध्ये आपण पॉवरफुल बास चा आनंद घेऊ शकतो. या हेडफोनची बॅटरी लाईफ ही 12 तासांपर्यंत आहे म्हणजे एक वेळा चार्जे केल्यावर आपण 12 याचा लाभ घेऊ शकतो. माईकवरील 3 बटण हे मोबाईल नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात. एक वेळा फोन ब्लूटूथने कनेक्ट केल्यानंतर आपण कुठे ही (10 मीटर अंतरावर) बिना मोबाईलचे वापरू शकतो.

१. Boat BassHeads 900 Wired Headphone with Mic (₹799/-)
Boat कंपनीचे हे हेडफोन भरपूर प्रसिद्ध आणि अधिकांश वापरले जाणारे प्रॉडक्ट आहे. या हेडफोन मध्ये सुपर पॉवरफुल बास आहे जो रिअल आवाजसाठी महत्वपूर्ण आहे. कानासाठी आरामदायक असलेले हे हेडफोन ग्राहकांना आकर्षित करतात. इतकंच नव्हे तर यामध्ये noise cancelling सिस्टिम आहे जी बाहेरील आवाज कमी करण्यात उपयुक्त आहे. कमी किमतीत हे खूपच छान प्रॉडक्ट आहे.
हेडफोन घातल्यानंतर घ्यावयाची काळजी
हेडफोन मधील गाणे हे नियंत्रितपणे ऐकले पाहिजे म्हणजेच आपले कान हे 85db डेसिबल पर्यंतचा आवाज सहन करू शकतात. त्याव्यतिरिक्त 85db वरील ध्वनी आपल्या कानांसाठी हानिकारक आहे. त्यासाठी 70-80 db असलेले गाणे आपल्याला हेडफोनच्या मदतीने ऐकले पाहिजे.
मित्रांनो, Top 10 headphones in Marathi language तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. तुमच्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी माहित सोप्या भाषेत सादर केली जाते.
-नीरज भावसार. कॉलेज कट्टा.
Leave a Reply