• Skip to main content
  • Skip to secondary menu
  • Skip to primary sidebar
  • Skip to footer

College Catta

Marathi blog Marathi Kavita

  • POLITICS
  • CULTURE
  • MARATHI KAVITA
  • कोणता मोबाईल घेऊ
  • SAKAR-सकार
  • गाव गप्पा
  • Happy Life
  • HEALTH TIPS IN MARATHI
  • BIOGRAPHY
  • ENTERTAINMENT
  • TREND
  • ABOUT US
You are here: Home / Archives for चंद्रशेखर आझाद मराठी निबंध

चंद्रशेखर आझाद मराठी निबंध

Chandra Shekhar Azad Information Biography in Marathi Language

July 9, 2018 By CollegeCatta Leave a Comment

Chandra Shekhar Azad Information Biography in Marathi Language Chandra Shekhar Azad History in Marathi Language Chandrashekhar Azad Yanchi Mahiti Marathi Madhe एखाद्या व्यायामशाळेत आपण एक फोटो नेहमी बघतो हातात घड्याळ, भारदस्त छाती, पिळदार दंड असलेला तो क्रांतिकारक म्हणजे चंद्रशेखर आझाद. क्रांतिकारक म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रशेखर आझाद यांचे आयुष्य एक संघर्षमय जीवनपट आहे. त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकताना प्रत्येक तरुणाचं रक्त सळसळून उठते. मुळात त्यांचे नाव चंद्रशेखर आझाद नसून चंद्रशेखर सीताराम तिवारी असे आहे. त्यांच्या आईचे नाव जगरानी देवी असे होते. Chandra Shekhar Azad Short Essay in Marathi Chandra Shekhar Azad Nibandh in Marathi चंद्रशेखर आझाद मराठी निबंध चंद्रशेखर आझाद यांचे बालपण चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्यप्रदेशातील भावरा गावात 23 जुलै 1906 रोजी झाला. हे गाव आदिवासीबहुल भागात मोडते. इथे जंगलात त्यांनी आदिवासी मुलांबरोबर खेळ खेळले. धनुष्यबाण चालवणे, छोटी मोठी हत्यारे वापराने यात ते तरबेज झाले. याबरोबर त्यांनी आपले शरीर चांगले कमावले. आझाद यांना पुढे काशी येथे संस्कृत पाठशाळेत पाठवण्यात आलं. त्या वेळी काशी मात्र क्रांतिकाऱ्यांचे केंद्र होते. इथे त्यांची ओळख अनेक क्रांतिकाऱ्यांशी झाली आणि देशासाठी काहीतरी करण्याची त्यांची उर्मी जागी झाली . आझाद या नावामागचे रहस्य त्यांच्या आझाद या नावाविषयी अनेक कहाण्या सांगितल्या जातात लहानपणापासूनच अत्यंत वैचारिक असलेल्या चंद्रशेखरला वयाच्या पंधराव्या वर्षी अटक झाली. कारण होते महात्मा गांधींनी पुकारलेल्या असहकार आंदोलनात सहभाग घेतल्याचे. यातूनच त्यांच्या आयुष्याच्या संघर्षाला सुरुवात झाली. 1919 साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे इंग्रज सरकारविरोधात जनसामान्यांमध्ये रोष होता. तरुण कार्यकर्त्यांमध्ये क्रांतीची ज्वाला उसळली होती. अशातच गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केले होते. यामध्ये अनेक क्रांतिकाऱ्यांना अटक झाली अटकेत 15 वर्षे वयाचा चंद्रशेखर देखील होता. यावेळी अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांचे नाव विचारले या वेळेस त्यांनी स्वतःचं नाव 'आझाद' सांगितलं, वडिलांचं नाव 'स्वतंत्र' सांगितलं तर घराचा पत्ता 'जेल' असा सांगितला आणि हे नाव अखंड भारताच्या दैदिप्यमान इतिहासात अमर झाले. क्षुद्र मने व्यक्तींचा विचार करतात, छोटी मने घटनांचा विचार करतात तर मोठी मने तत्वांचा विचार करतात. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या आयुष्याची तात्विक बांधणी लहानपणापासूनच मजबूत केली होती. यामध्ये त्यांच्या आईचा आणि वडिलांचा वाटा होता त्यांचे वडील संस्कृत पंडित होते त्यामुळेच घरातूनच त्यांना विचारांचं बाळकडू मिळाले. त्यांचे क्रांतीचे विचार आजही लाखो-करोडो तरुण मुलांना पेटवत आहेत. सशस्त्र क्रांतीचा मार्ग त्यांनी का उचलला यामागे एक घटना आहे. आझाद यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग का उचलला? गांधीजींच्या असहकार आंदोलनात चंद्रशेखर आझाद यांनी सक्रिय सहभाग घेतला परंतु त्यांचे सशस्त्र क्रांतीचा विचार लपून राहत नव्हते. चोरीचौरा येथील घटनेमुळे गांधीजींनी असहकार आंदोलन थांबवले. ब्रिटिश सरकारच्या जुलमाला प्रजा कंटाळली असताना गांधीजींनी हा निर्णय का घेतला याचे उत्तर त्यांना मिळाले नाही. त्यामुळे चंद्रशेखर आझाद क्रोधीत झाले त्यांचं स्वतःशीच वैचारिक द्वंद्व सुरू झालं. यातूनच सशस्त्र क्रांतीकारक म्हणून चंद्रशेखर आझाद यांचा पुनर्जन्म झाला. भारताच्या स्वातंत्र्याचे स्वप्न त्यांनी बघितले होते. स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांना गप्प बसू देत नव्हती. यातूनच त्यांची ओळख रामप्रसाद बिस्मिल यांच्याशी झाली. राम प्रसाद बिस्मिल हे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे अध्यक्ष होते. चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या क्रांतिकारकांची या संघटनेला गरज होती. या संघटनेत काम करत असताना त्यांनी त्यांच्या नेतृत्वगुणाची चुणूक दाखवली आणि इंग्रजांना अक्षरशहा सळो की पळो करून सोडलं. त्यांच्या या कामगिरीमुळे एक सच्चा निस्सीम राष्ट्रभक्त आणि सशस्त्र क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. इंग्रजी अधिकाऱ्यांना रात्री झोपायची देखील भीती वाटावी अशी या क्रांतिकारकाची ख्याती होती. त्यांनी इंग्रजी अधिकाऱ्यांना त्यांनी अशी जरब बसवली, अधिकारी काम करेनासे झाले. Chandrashekhar Azad Yanchi Mahiti Marathi Madhe चंद्रशेखर आझाद यांचे क्रांतिकार्य • हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नावाने त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची पुनर्बांधणी केली. यामधून क्रांतिकाऱ्यांचे मोठे जाळे निर्माण केले. गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही अशी या क्रांतिकारकांची धारणा होती त्यामुळे सशस्त्र क्रांतीचा मार्ग यावेळच्या तरुणांनी उचलला. • प्रजासत्ताक भारत साकारण्यासाठी त्यांनी पैसे एकत्र करायला सुरुवात केली सरकारी तिजोरी लुटणे आणि त्यातून संस्थेच्या कामासाठी पैसा उभा करण्याचं काम क्रांतिकारकांच्या सहकार्याने त्यांनी सुरू केले. • 1925 साली काकोरी रेल्वे स्टेशन लुटीच्या प्रकरणात त्यांचा सहभाग होता या लुटलेल्या खजिन्यांमधून मोठे क्रांतिकार्य उभे राहिले. • लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अधिकारी स्कॉट च्या हत्येचा कट रचला पण नजरचुकीमुळे भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉंडर्स वर गोळ्या झाडल्या या हत्येच्या कटामध्ये चंद्रशेखर आझाद यांचा सहभाग होता. • काही काळ आझाद यांनी झाशी मधून क्रांतिकार्य केले. जाते गावापासून 15 किलोमीटर असलेल्या जंगलात त्यांच्या संस्थेचे केंद्र होते इथे ते नेमबाजीचे प्रशिक्षण आपल्या सदस्यांना देत. नेमबाजीचा सराव करत. त्यांनी एका हनुमानाच्या मंदिराची देखील स्थापना केली होती. • आझाद यांना भगतसिंग यांचे गुरू मानले जाते. 8 एप्रिल 1929 मध्ये आझाद यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय असेंम्बली मध्ये बॉम्ब फोडला आणि भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. पंडित हरिशंकर ब्रह्मचारी म्हणजेच आझाद... आझाद यांच्या सर्व क्रांतिकारी कारवाया या गुपित असत. ते गावात वावरताना पंडित हरिशंकर ब्रह्मचारी या नावाने वावरत. एक संन्यासी साधू म्हणून ते शहरी भागात प्रसिद्ध होते. पोलिसांना देखील त्यांना पकडणे शक्य नव्हतं. मरेपर्यंत आझाद राहील असं चंद्रशेखर आझाद छाती ठोकून सांगायचे आणि ते त्यांनी पाळले देखील. चंद्रशेखर आझाद मृत्यू.... 27 फेब्रुवारी 1931 मध्ये अलाहाबाद येथील आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांची चकमकीत आझाद यांचा मृत्यू झाला पोलिसांची लढता-लढता आझाद यांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या त्यांनी जवळजवळ तीन पोलीस शिपायांना ठार केले. पिस्तूलमध्ये शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या डोक्यात झाडून घेतली आणि एका महान क्रांतिकाऱ्याचा अंत झाला . मरेपर्यंत 'आझाद' राहील हे त्यांचे ब्रीद त्यांनी पाळले. देश त्यांच्या योगदानाचे नेहमीच स्मरण ठेवेल. या क्रांतिकाऱ्यांमुळे देश स्वतंत्र झाला आणि प्रगतीपथावर आला. इंग्रजांच्या दडपशाहीला चंद्रशेखर आझाद यांच्या सारख्या क्रांतिकाऱ्यांनी दिलेले सशस्त्र क्रांतीचे उत्तर आणि बालीदान हे आदर्श देशभक्तीचे उदाहरण आणि अन्यायावर होणारा वार होता. चंद्रशेखर आझाद यांना विनम्र अभिवादन... -अजिंक्य दंडवते. Chandra Shekhar Azad History in Marathi Language Chandrashekhar Azad Yanchi Mahiti Marathi Madhe Chandra Shekhar Azad Short Essay in Marathi Chandra Shekhar Azad Nibandh in Marathi चंद्रशेखर आझाद यांची माहिती मराठी चंद्रशेखर आझाद मराठी निबंध Chandra Shekhar Azad Information Biography in Marathi Language

चंद्रशेखर आझाद म्हणजे क्रांतिकारी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व, तरुणांनी यशस्वी होण्यासाठी चंद्रशेखर आझाद नक्की वाचावेत चंद्रशेखर आझाद यांची माहिती मराठी मध्ये  Chandra Shekhar Azad Information Biography in Marathi Language आपल्या आवडत्या College Catta कॉलेज कट्टा वर. Chandra Shekhar Azad Information Biography in Marathi Language Chandra Shekhar Azad History in Marathi … [Read more...] about Chandra Shekhar Azad Information Biography in Marathi Language

Primary Sidebar

Online Nibandh Spardha July 2022 College Catta

Online Nibandh Spardha

Shistit Rahaych New Marathi web series Episode 1

Shistit Rahaych New Marathi web series Episode 1

🎯नियम हे पाळण्यासाठी असतात… पण ज्या नियमांचा आपल्याला त्रास होतो असे नियम वेळोवेळी बदलायला हवेत….🎯
🎭आशयपूर्ण  कथा असलेली मराठी वेबसिरिज…
शिस्तीत रहायचं नक्की पहा…
🙏🏻 शिस्तीत रहायचं भाग १ 🙏🏻
 वेब सिरीस पाहण्यासाठी  खालील लिंक वर क्लिक  करा.शेतकरी उद्योजक या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.🙏🏻😊
लाईक व शेअर करायला विसरु नका !
Subscribe Channel click here

Shistit Rahaych Marathi Web Series part 3

Shistit Rahaych Marathi Web Series part 3

🙏🏻शिस्तीत रहायचं मराठी वेब सीरिज  

 ज्या नियमांचा आपल्याला त्रास होतो असे नियम बदलायला हवेत… यूट्यूब चॅनेल shetkari Udyojak ला खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा.. 

To Subscribe Channel click here

BVM pe

mobile recharge cashback offer

search

सबस्क्राईब करा

आपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ!

Join 65 other subscribers

Categories

  • BIOGRAPHY
  • CULTURE
  • HEALTH TIPS IN MARATHI

कादंबरीकार वि. स. खांडेकर यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या

Navratri information in marathi language

डी एन ए आणि डी एन ए टेस्ट काय आहे जाणून घ्या

  • Facebook
  • Phone
  • Twitter

Footer

Categories

सबस्क्राईब करा

आपला इमेल आयडी भरा आणि लेटेस्ट पोस्ट मिळावा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ!

Join 65 other subscribers

Copyright © 2023 collegecatta.com