सकार-१३

**’सुयश’ची गुरुकिल्ली* ‘सुयश’ अर्थात सु-सुख, य-यश, श- शांती(मनशांती, मनाची शांतता). प्रत्येकालाच हवं असतं सुख, यश आणि शांती. त्यासाठी प्रत्येकजणंच प्रयत्न करत असतो आणि करायलाही पाहिजेच. ‘सुयश’ची गुरुकिल्ली कोणती असेल? विचार करुन तर पहा, उत्तर नक्कीच मिळेल. दररोज सकाळी मी, दोन्ही डोळे मिटवुन घेतो. मनातले विचार हळूहळू कमी होत जातात. मग मी माझ्यातल्या बलस्थानांविषयी(प्लस पॉईंट्स) विचार करतो. बलस्थानं मनातल्या मनात आठवतो. मग लक्षात येतं ते म्हणजे आपण नेमकं काय काय करु शकतो. सर्वसाधारणपणे अनेकजण दूस-यांचा विचार करण्यात बराच वेळ, श्रम खर्ची घालतात. तोच वेळ स्वतःला ओळखण्यात, स्वतःचा विचार करण्यात अर्थात स्वतःची बलस्थानं ओळखण्यासाठी घालवला तर स्वसह कुटुंबासाठीही आणि इतरांसाठीही नक्कीच चांगलं असेल असं मला वाटतं. आपली दुर्बलस्थानं लक्षात आली तर त्यावर मी कशी मात करु शकतो. आज, आत्ता ह्याक्षणी माझ्याजवळ काय काय आहे? काय काय कमी आहे? मी ते कसं मिळवु शकतो? माझा स्वभाव नेमका कसा आहे? मी, शारीरिक, मानसिकद्रुष्ट्या कसा आहे? अमुक एक माझं ध्येय मी कसं साध्य करु शकतो? ह्यासाठी मला कोण मदत करु शकेल? ह्यांसह अनेक प्रश्नांची उत्तरं स्वतःला ओळखल्याशिवाय मिळणारच नाहीत आणि मग अशी उत्तरं मिळाली नाहीत तर सुख, यश, शांती मिळणार नाही. स्पर्धा परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मुलाचा, मी, वैयक्तिक सन्मान केला. बुकेऐवजी बुक आणि एक पेनसेट सन्मानार्थ दिला. त्याच्या यशाचं रहस्य विचारलं तेव्हा तो म्हणाला की मला दोनदा अपयश आलं मग मी, स्वतःला ओळखलं आणि पुढचं सगळं सोपं झालं. सर्वात महत्वाचं म्हणजे मी, सोशल मीडियावर पडुन रहायचं बंद केलं तेव्हा मी स्वतःला अधिकाधिक ओळखु शकलो. ‘सुयश’ची गुरुकिल्ली तुम्हाला दिलीय स्वानुभवातून. वाचा आणि फक्त विचार करु नका कारण वक्त किसीके लिये रुकता नहीं….युवर टाईम स्टार्ट नाऊ.
लेखक-सुनील वनाजी राऊत,मो.९८२२७५८३८३
Leave a Reply