सुंदर पिचाई कोण आहे का गुगल त्यांना एवढा मोठा पगार देत आहे जाणून घ्या Sundar Pichai Information in Marathi Sundar Pichai biography in Marathi
सुंदर पिचाई
माइक्रोसॉफ्ट, गूगल यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी लागावी व अमेरिकेत सेटल व्हावे असेच आजच्या किती तरी भारतीय तरुण तरुनींचे स्वप्न आहे. पण आपल्या मेहनीतिने आणि कर्तबगारिने गूगल सारख्या कंपनीच्या CEO पदाची जबाबदारी सांभाळने ही काही साधी गोष्ट नाही. आता कळालेच असेल सुंदर पिचाई यांच्या बद्दल बोलतोय त्यांचीच माहिती आज घेऊ. भारतात जन्मलेला सामान्य कुटुंबातील मुलगा गूगलचा सीईओ होने ही काही साधी गोष्ट नाही. यातून त्यांचे परिश्रम, चिकाटी यांची प्रचिती येते.
सुंदर पिचाई यांचा जन्म १२ जुलै १९७२ रोजी चेन्नईतील एका सामान्य कुटुंबात झाला. आपल्या आई वडील आणि भावा सोबत चेन्नई मध्ये राहायचे. सुंदर पिचाई यांचे वडील इलेक्ट्रिकल उत्पादनांमधील नामवंत अश्या GEC कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून कार्यरत होते तर आई स्टेनोग्राफर होती. परंतु दोघांनाही पुरेसा पगार मिळत नसल्याकारणाने घरची परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नव्हती. त्यांच्या घरी ना टीव्ही होता ना मौजमजेची इतर साधनं.
सुंदर पिचाई १२ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी एक रोटरी टेलिफोन खरेदी केला होता. सुंदर पिचाई यांचं गणितात इतकं भन्नाट डोक चालायचं की त्यांना एका दिवसात डायल केलेले सर्व नंबर लक्षात राहायचे. आजही गुगलचे सर्वोच्च अधिकारी त्यांच्या गणिती प्रतिभेला आवर्जुन दाद देतात. क्षणाकडे वेगळ्या दृष्टीने बघणाऱ्या सुंदर पिचाई यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत इंजिनियर बनण्याच्या इच्छेने आयआयटी खरगपूर मध्ये प्रवेश घेतला. तेथे सर्व स्पर्धा परीक्षा जिंकत त्यांनी स्वत:साठी स्टेन्डफोर्ड युनिव्हर्सिटीची शिष्यवृत्ती मिळवली. इथेच आईआईटी मध्येच त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळालेली अंजली. त्यांची दोघांची मैत्री झाली मैत्रीचे नाते प्रेमात फुलायला असा कितीसा वेळ लागतो आईआईटीच्या शेवटच्या वर्षात सुंदर यांनी अंजली यांना आपल्या प्रेमाची कबूली दिली. सुंदर यांचा स्वभाव आणि त्यांची काबिलियत यामुळे अंजली आधिपासुनच सुंदर यांच्या प्रेमात होत्या त्यांनीही सुंदर यांना होकार दर्शविला.
स्टेन्डफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पुढील शिक्षणासाठी त्यांनी मटेरियल सायन्स आणि सेमीकन्डक्टर फिजिक्स हा विषय घेतला. यासाठी सुंदर यांना अमेरीकेला जावे लागले. शिष्यवृत्ती मिळाली असली तरी अमेरिकेला जाण्याचा विमानप्रवास खर्च मात्र सुंदर पिचाई यांना स्वत:च्या खिशातून करावा लागणार होता. यासाठी त्यांच्या वडिलांनी कर्ज काढण्याचे प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले. अखेर नाईलाजाने त्यांनी कुटुंबासाठी साठवलेल्या पैश्यांमधून ५०,००० रुपये बाहेर काढले आणि सुंदर पिचाई यांनी नव्या भविष्याची स्वप्ने पाहत स्टेन्डफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पाऊल टाकले. घरची परिस्थिति हालाकिची असल्यामुळे सुंदर यांना अमेरिकेतुन अंजली यांना फोन करायला पैसे नसायचे त्यामुळे ६ महीने ते एकमेकांशी न बोलता राहयचे. आजचे प्रेमी युगल ४-५ दिवस नाही बोलले तरी विश्वास ठेवत नाहीत एकमेकांवर याही परिस्थितित एकमेकांवर असणारा विश्वास आणि दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. अजुन काय लागत प्रेमात याशिवाय. आपल्या माणसाची साथच प्रत्येक संकटातून बाहेर पडन्याची हिम्मत देते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्टेन्डफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडीचा विचार त्यांनी झटकला आणि Applied Materials कंपनीमध्ये इंजिनियर आणि प्रोडक्ट मॅनेजर म्हणून नोकरी स्वीकारली. यातून थोडे पैसे मिळू लागले तेव्हा सुंदर यांनी अंजलिच्या घरच्यांशी बोलून त्यांच्याशी लग्न केले. पुढे त्यांनी एमबीएची पदवी मिळवली. याच पदवीच्या जोरावर त्यांनी १ एप्रिल २००४ रोजी गुगलच्या भल्या मोठ्या विश्वात प्रवेश केला. गूगल मध्ये असतानाच त्यांना माइक्रोसॉफ्ट आणि ट्विटर यांसारख्या कंपन्यांमधुन कामाच्या ऑफर्स येतच होत्या पण अंजली यांनी सांगितले काही झाले तरी गूगल सोडू नको. त्यांचा हाच सल्ला सुंदर यांच्यासाठी किती मोलाचा ठरला हे आज आपण बघतोच आहे.
आपण गुगलच्या सीईओ पदावर विराजमान होऊ असा स्वप्नात देखील ज्यांनी विचार केला नसेल, ते सुंदर पिचाई, अवघ्या १० वर्षांत जगातील एका श्रीमंत उद्योगांपैकी एक असलेल्या Googleचे नेतृत्व करत आहेत. Search, Ads, maps, the Google Play Store, YouTube, आणि Android यांसारख्या गुगलच्या महत्वपूर्ण फोर फ्रंट प्रोडक्टची जबाबदारी सुंदर पिचाई यांच्याकडे आहे. भारतीय मूळ असलेल्या ह्या Google CEO ला वर्षाला ५० मिलियन डॉलर म्हणजेच ३१० करोड रुपये पगार मिळतो.
सुंदर पिचाई ह्यांच्याकडून “नथिंग इज इम्पॉसिबल” ची प्रेरणा मिळाल्याशिवाय राहत नाही!
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
Sundar Pichai Information in Marathi Sundar Pichai biography in Marathi सुंदर पिचाई माहिती मराठी
Leave a Reply