Steve jobs information Biography in Marathi language
अँपल फाऊडर स्टीव्ह जॉब्स माहिती मराठी
भारतातील आध्यात्मिक प्रवासानंतर स्टीव जॉब्स यांनी किमया करून दाखवली. जाणून घ्या एकवेळचा जगण्याचा संघर्ष ते आयफोनची निर्मिती अश्या थिंक डीफरंट व्याक्तीमत्वा बद्दल…
स्वतः कष्टाने निर्माण केलेल्या अॅपल कंपनीतून स्टीव्ह जॉब यांना सहकार्यांनी बाहेर काढले… त्यांच्यावर ही वाईट परिस्थिती वोढवली. मग स्टीव्ह जॉब यांनी काय केले जाणून घ्या काय किस्सा आहे…
Steve jobs Quotes in Marathi
- Think Different
- Stay hungry Stay Fulish
- “कदाचित मृत्यूच या जीवनाचा सर्वात मोठा आविष्कार आहे”- स्टीव जॉब्स
“तुमच्याजवळ ठराविक वेळ आहे, त्यामुळे हा वेळ दुसऱ्या कुणाचे आयुष्य जगून अजिबात व्यर्थ गमावू नका.”
स्टीव जॉब्स हे नाव ऐकल्यावर मला एकच वाक्य आठवतं ते म्हणजे ‘Connectimg The Dots’. आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात किंवा घडलेल्या असतात तेव्हा आपल्याला वाटत असते की त्या गोष्टी नाही घडायला पाहीजे पण मागे वळून बघितल्यावर कळते की त्या गोष्टी घडल्याच नसत्या तर आपण आज जिथे आहोत तिथे पोहचलोच नसतो.
आपल्या भाषेत सांगायचे झाले तर जे होते ते चांगल्यासाठीच होते. प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक दृष्टिकोण ठेवायला शिकविते मला ह्या माणसाचे चरित्र.
आज या जगात मोबाईल, आयफोन आणि टॅबलेट वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला स्टिव्ह जॉब्स माहित नसेल हे अशक्यच आहे. जशा पद्धतीने त्यांनी आपल्या जीवनातील तमाम संघर्षांना आणि अडथळयांना पार करत जीवनात यशाचे नवे कीर्तिमान रचलेत ते अत्यंत प्रशंसनीय आहे.
स्टीव्ह जॉब आणि जगण्याचा संघर्ष
स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनातील एक काळ असा देखील होता ज्यावेळी त्यांना मंदिरात मिळणाऱ्या अन्नावर भूक भागवावी लागली आणि मित्राच्या घरी रात्र जमिनीवर काढावी लागली. ही संकटं कमी होती की काय तर एक वेळ अशी देखील आली कि त्यांना त्यांच्याच अॅप्पल कंपनीतून बाहेर पडावे लागले, पण या तमाम संघर्षांचा सामना करतांना त्यांनी कधी हार मानली नाही आणि पुढे जात राहीले.
स्टीव्ह जॉब यांचे बालपण
स्टीव जॉब्स यांचा जन्म आणि लहानपणीचा काळ इतरांपेक्षा अगदी भिन्न आहे. त्याचा जन्म 24 फेब्रुवारी 1955 ला कैलिफोर्निया मधील सेंट फ्रांसिस्को येथे सिरीया येथील मुस्लिम अब्दुलफत्त: जन्दाली यांच्या घरी झाला. जोअत्री सिम्पसन च्या पोटी त्यांनी जन्म घेतला पण त्या दरम्यान तिचा विवाह झाला नसल्याने तिने स्टीवला दत्तक देण्याचा निर्णय घेतला. पॉल आणि क्लारा नावाच्या दाम्पत्याला या अटीवर तिने स्टीवला दत्तक दिले की ते स्टीवला शिक्षणाकरता महाविद्यालयात पाठवतील.
पॉल…ज्यांनी स्टीवला दत्तक घेतलं होतं ते स्वतः एक मैकेनिक होते तर त्यांची पत्नी क्लारा अकौंटंट होती. या दाम्पत्याने पुढे गैरेज सुरु केले. स्टीव्ह ला देखील सुरुवातीपासून इलेक्ट्रॉनिक्स मध्येच रुची होती. त्यामुळे तो कायम इलेक्ट्रॉनिक वस्तूंशी खेळत नवनवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असे. बालपणातच त्याने वडिलांकडून इलेक्ट्रॉनिक्स संबंधित बऱ्याच गोष्टी शिकल्या.
स्टीव्ह जॉब्स लहानपणापासून विलक्षण प्रतिभेचे धनी होते. पण त्यांना शाळेत जाऊन शिकण्यापेक्षा घरी बसून पुस्तकं वाचायला जास्त आवडत असे.
स्टीव्ह चांगला विद्यार्थी होता, पण शाळेत जायला त्याला आवडत नव्हते. स्टीव्हला त्याच्या वयाच्या मुलांशी मैत्री करण्यात त्रास होत होता , तो नेहमी वर्गात एकटाच बसून राहायचा. वयाच्या 13 व्या वर्षी, तो वोझ्नियाकला भेटला, वोझ्नियाकसुद्धा स्टीव्हसारखे स्मार्ट होते, त्यांना पण इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत खेळायला आवडायचे. लवकरच दोघे जिवलग मित्र झाले. हायस्कूल पूर्ण झाल्यानंतर स्टीव्हची ओरेगॉनमधील रीड कॉलेजमध्ये प्रवेश झाला. हे खूप महागडे महाविद्यालय होते, ज्यांची फी पॉल आणि क्लारा यांनी खूप कष्टाने जमा केली होती. आपल्या मुलाच्या चांगल्या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या जीवनाची संपूर्ण गुंतवणूक केली. येथेच जॉब्सला क्रिस्टन ब्रेनन भेटली पुढे जाऊन तो तिच्यासोबत लग्न करतो. काही दिवसातच स्टीव्हला समजले की तो या महाविद्यालयात येऊन आपल्या पालकांचा पैसा वाया घालवित आहे. येथे राहिल्यास भविष्यात त्याचा कोणताही फायदा होणार नाही. यामुळे त्याने कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला, क्रिस्टन ब्रेननही त्यांच्या या निर्णयामध्ये त्यांच्या पाठीशी उभी होती. स्टीव्ह आता दररोज कॉलेजला जात नसत, तो त्याच वर्गात जायचा ज्या वर्गात त्याला आवड होती. त्यांना कॅलिग्राफी विषयामध्ये आवड होती त्यामुळे त्यांनी कॅलिग्राफी वर्गात शिक्षण घेतले. त्यावेळी स्टीव्हकडे पैसे नव्हते, तो आपल्या मित्राच्या खोलीत खालीच झोपायचा. अन्नासाठी कोकची बाटली विकून तो पैसे मिळवत असे. यासह ते दर रविवारी हरे कृष्ण मंदिरात जात असत, तेथे त्यांना विनामूल्य भोजन मिळायचे.
स्टीव्ह जॉब यांचे भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक ज्ञान बद्दल आकर्षण
वास्तविक स्टीव जॉब्स मधे दृढ इच्छाशक्ती आणि प्रतिभा ठासून भरली होती, यामुळे त्याला 1972 मध्ये व्हिडीओ गेम बनविणाऱ्या एक डेवलिंग कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. परंतु स्टीव जॉब्स या कामाने समाधानी नव्हते आणि मग त्यांनी हा जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. या नौकरीत त्याने जेवढे पैसे साचवले होते त्या पैश्यातून ते भारत फिरायला आले. वास्तविक स्टीवला भारतीय संस्कृती कायम प्रभावित करत आलीये आणि त्यांना येथे येऊन आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचे होते. म्हणून त्यांनी 1974 साली जवळ-जवळ 7-8 महिने भारतातील उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत व्यतीत केले आणि येथे बौद्ध धर्माची शिक्षा घेतली. पुढे ते अमेरिकेला परतले, आता ते पूर्वीचे जॉब्स राहीले नव्हते, ते पूर्णतः बदलले होते आणि त्याचं मन देखील एकाग्रचित्त झालं होतं. परतल्यानंतर त्यांनी पुन्हा जॉब जॉईन केला.
जॉब आणि वोझ्नियाक पुन्हा चांगले मित्र बनले आणि एकत्र काम करण्यास सुरवात केली. त्या दोघांनाही संगणकात खूप रस होता. वोज्नियाकला स्वतःचा संगणक बनवायचा होता, वोझ्नियाक हा खुप हुशार होता. त्यांना इलेक्ट्रॉनिक्सची चांगली माहिती होती, म्हणून त्याने एक वैयक्तिक संगणक तयार केला. हे पाहून स्टिव्ह जॉब्स खूप खूष झाले आणि त्यांनी ठरविले कि ते दोघे मिळून एक संगणक बनविणारी कंपनी उघडतील आणि संगणक तयार करतील आणि विकतील.
- 1976 मध्ये जॉब आणि वोज्नियाक यांनी जॉब्सच्या गॅरेजमध्ये संगणकांवर काम सुरू केले. त्यांनी एक कंपनी उघडली आणि त्यास ‘Apple‘ अँपल नाव दिले. यावेळी जॉब्स फक्त 21 वर्षांचा होता. apple अँपल कंपनीच्या पहिल्या संगणकाचे नाव Apple 1 हे होते.काही वेळा नंतर, वोझ्नियाक याने Apple 2 वर कार्य करण्यास सुरु केले . ते तयार झाल्यानंतर, ते काही गुंतवणूकदारांसमोर ठेवण्यात आले आणि जॉब्ज आणि वोझ्नियाक यांनी गुंतवणूकदारास बर्याच ठिकाणी गुंतवणूकीसाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला. खूप साऱ्या गुंतवणूकदारांनी अँपल कंपनी मध्ये आपले पैसे गुंतवले. Apple 2 लोकांना खूप आवडले . ही कंपनी खूप लवकर वाढू लागली, 1980 पर्यंत ही एक नामांकित कंपनी बनली. 10 वर्षात Apple कंपनीचे 2 अब्ज पैसे कमावले आणि 4 हजार लोक त्यात काम करू लागले.मोठी कंपनी बनल्यानंतर Apple कंपनीने आपली तिसरी आवृत्ती Apple 3 आणि त्यानंतर लिसा लाँच केली. लिसा स्टीव्ह आणि ब्रेनन यांच्या मुलीचे नाव आहे, लिसाचा जन्म 1978 मध्ये झाला होता. Apple (अॅप्पलच्या) नवीन आवृत्त्या फ्लॉप झाल्या, त्या यशस्वी झाल्या नाहीत.स्टिव्ह जॉब्स वर खूप दडपण आले त्यामुळे स्टीव्हने मॅकिंटोश बनवण्यासाठी आपली सर्व मेहनत आणि सर्व ऊर्जा झोकून दिली.
- १९८४ मध्ये लिसावर आधारित सुपर बाउल निर्माण केले. याला मॅकिन्टोश सोबत लाँच केले गेले. याला खुप मोठ्या प्रमाणात यश आणि प्रसिद्धी मिळाली. आता Apple आयबीएमच्या सहकार्याने वैयक्तिक संगणक तयार करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आणि कंपनीवर अधिक संगणक बनवण्याचा दबाव वाढला.
स्वतः कष्टाने निर्माण केलेल्या अॅपल कंपनीतून स्टीव्ह जॉब यांना सहकार्यांनी बाहेर काढले… त्यांच्यावर ही वाईट परिस्थिती वोढवली. मग स्टीव्ह जॉब यांनी काय केले जाणून घ्या काय किस्सा आहे…
अॅपल मधून बाहेर काढल्यानंतर-
या संगणकाची संकल्पना कधीही लपलेली नव्हती. यामुळे इतर बर्याच कंपन्यांनीही त्याचा अवलंब केला. या इतर कंपन्यांचे संगणक मॅकिंटोश आणि Apple पेक्षा खूपच स्वस्त होते, ज्यामुळे Apple कंपनीचे नुकसान होऊ लागले. यासाठी स्टीव्हला जबाबदार धरण्यात येऊ लागले आणि त्याच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकू लागले. शेवटी 17 september 1985 ला स्टिव्ह ने apple कंपनीचा राजीनामा दिला.
आपणच मेहनतीने उभ्या केलेल्या कंपनीमधुन आपल्यालाच राजीनामा द्यावा लगावा यापेक्षा दुर्दैवी गोष्ट ती कोणती तरीही हार माणतील ते जॉब्स कसले.
Apple मधून बाहेर पडल्यानंतर स्टीव्हला आता काय करावे हे समजत नव्हते. स्टीव्ह जॉब्स यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आयुष्यातील ती एक अवघड वेळ होती. त्याला वाटत होते कि आपण आता हरलेलो आहे आता आपण काहीच करू नाही शकणार. परंतु या विचारांच्या दरम्यान, त्याला वाटले की आपले काम आपल्या हातातून गेले आहे. परंतु आपली क्षमता अद्याप आपल्याकडेच आहे.
Apple कसे बनवायचे हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. स्टीव्हने पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. या संधीचा फायदा घेऊन त्याने विचार केला की आता आपण मुक्त आहोत, आपल्या इच्छेनुसार आणि कोणच्यापण दबावाला बळी न पडता आपण आपलं काम करू शकतो आणि त्यांनी नवीन कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीच नाव होतं नेक्स्ट (Next) कंपनी. जॉब्सने नेक्स्ट कॉम्प्युटर नावाची कंपनी उघडली, यासाठी त्याला रोझ पेरोट हा मोठा गुंतवणूकदार म्हणून मिळाला. नेक्स्ट (Next ) चे प्रथम उत्पादन high एन्ड पर्सनल कॉम्पुटर होते.
12 ऑक्टोबर 1988 रोजी, नेक्स्ट कॉम्प्यूटर एका मोठ्या कार्यक्रमात लाँच झाला. नेक्स्टचे पहिले वर्कस्टेशन 1990 मध्ये आले. जे खूप महाग होते. नेक्स्ट हा apple व लिसा प्रमाणे तांत्रिकदृष्ट्या पुढे होते, परंतु महाग असल्याने बरेच लोक ते विकत घेऊ शकले नाहीत, ज्यामुळे नेक्स्टलाही तोटा सहन करावा लागला. काही काळानंतर स्टीव्हला हे लक्षात आले आणि त्याने नेक्स्ट कंपनीला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये रूपांतरित केले.
त्यानंतर नेक्स्ट कंपनी खूप यशस्वी झाली. वेब ऑब्जेक्ट ,वेब अँप्लिकेशन साठी फ्रेमवर्क तयार करुन विक्री करू लागली.
1996 मध्ये Apple ने जाहीर केले की ती नेक्स्ट कंपनी $ 427 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी करणार आहे. हा करार फेब्रुवारी 1997 मध्ये अंतिम झाला आणि यासह जॉब्स Apple कंपनी मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून परत आले. Apple या वेळी खूप संघर्ष करत होती. Apple कंपनीला नवीन कल्पनांची आवश्यकता होती. जी त्यास पुन्हा उंचावर नेईल. स्टीव्ह आता Apple संचालक पदी काम करीत होते. आता कंपनीने बरीच नवीन उत्पादने बाजारात आणली. यावेळी आयपॉड म्युझिक प्लेयर, आयट्यून्स म्युझिक सॉफ्टवेअर लॉन्च करण्यात आले. दोन्ही उत्पादने खूप यशस्वी झाली आणि Apple (अँपल) ची एक नवीन चांगली प्रतिमा जगासमोर आली. 2007 मध्ये अँपलने आपला पहिला मोबाइल फोन बाजारात आला, ज्याने मोबाइल जगात क्रांती आणली आणि हा फोन एका रात्रीमध्ये विकला गेला. स्टीव्ह आता एक स्टार झाला होता आणि त्याचे नाव 2000 च्या दशकाच्या नव्या शोधामध्ये जोडले गेले.
जगातील सर्वात मोठ्या अॅपल कंपनीचे फाउंडर स्टीव जॉब्स यांना आपल्या जीवनातील अखेरच्या काळात पेनक्रियाटिक कैंसर सारख्या आजाराशी लढावं लागलं. अनेक वर्ष या आजाराशी झुंज दिल्यानंतर 2 ऑक्टोबर 2011 ला कैलिफोर्निया मधील पालो ऑल्टो येथे अखेरचा श्वास घेतला आणि या जगाचा निरोप घेतला. आपल्या मृत्यूपूर्वी स्टीव जॉब्स यांनी 24 ऑगस्ट 2011 ला टीम कुक यांना अॅपलचा नवा सीईओ बनविण्याची घोषणा केली होती.
“कदाचित मृत्यूच या जीवनाचा सर्वात मोठा आविष्कार आहे”- स्टीव जॉब्स
आज स्टीव जॉब्स जरी आपल्यात नसले तरीसुद्धा अॅपल सारख्या प्रतिष्ठित कंपनीचा पाया रचणाऱ्या महान व्यक्तीला विसरता येणं सहज शक्य नक्कीच नाही.
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
भारतातील आध्यात्मिक प्रवासानंतर स्टीव जॉब्स यांनी किमया करून दाखवली. जाणून घ्या एकवेळचा जगण्याचा संघर्ष ते आयफोनची निर्मिती अश्या थिंक डीफरंट व्याक्तीमत्वा बद्दल…
स्वतः कष्टाने निर्माण केलेल्या अॅपल कंपनीतून स्टीव्ह जॉब यांना सहकार्यांनी बाहेर काढले… त्यांच्यावर ही वाईट परिस्थिती वोढवली. मग स्टीव्ह जॉब यांनी काय केले जाणून घ्या काय किस्सा आहे…
Steve jobs information Biography in Marathi language
अँपल फाऊडर स्टीव्ह जॉब्स माहिती मराठी
Apple founder information in marathi
Steve jobs Quotes in Marathi
Inspirational Motivational Biographies in Marathi
Inspirational Motivational Real life Stories in Marathi
Motivational Inspirational Success stories in Marathi
Leave a Reply