स्पॅनिश फ्लू हि महामारी नेमकी आली कोठून ? या महामारीत झालेला जन संघार बघून तुम्ही थक्क व्हाल… स्पानिश फ्लू मध्ये झालेला जन संघर पहिल्या महायुद्धा पेक्षा जास्त होता… अधिक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!

स्पॅनिश फ्लू हि महामारी नेमकी आली कोठून ? Spanish flu Information in Marathi
फ्रान्सच्या सीमेजवळील खंडकामधील घाणीमुळे सैन्य प्रशिक्षण शिबिरात या आजारात सुरुवात झाली.
पहिल्या महायुद्ध संपल्यानंतर परत आपल्या देशात परतणाऱ्या संक्रमित सैनिकामुळे हा स्पॅनिश फ्लू सगळीकडे पसरला होता. या आजारामुळे अंदाजे जगातील 9 ते 10 कोटी लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.
त्याकाळी नुकताच विमान प्रवास सुरु झाला होता त्यामुळे हा आजार रेल्वे व बोटीतून प्रवास करणाऱ्याद्वारे खूप कमी प्रमाणात पसरला.
या विषाणूमुळे शरीरात सायटेनिक स्टार्म नावाची प्रक्रिया होते व फुफ्फुसामध्ये पाणी भरले जाते ज्यामुळे हा आजार इतरांपर्यंत पसरतो. या आजारामुळे शरीराची प्रतिकार शक्ती नष्ट होते यामुळे स्पॅनिश फ्लू मुळे तरुण व निरोगी लोकांचा मृत्यू झाला. यामुळे स्पॅनिश फ्लू या आजाराला डॉक्टर जगातील इतिहासातील सर्वात मोठा जनसंहार मानतात.
स्पेन मधील स्वच्छता व पोषण आहार कमी असणाऱ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा मृत्यू झाला.
त्याकाळी जगातील एक तृतीयांश लोकांना या आजाराची लागण झाली व 50 दशलक्ष लोकांचा बळी गेले. आधुनिक इतिहासातील सर्वात भयानक साथीचा रोग होता.

या रोगाचा प्रसार कसा झाला?
या रोगाच्या प्रसारास पहिले महायुद्ध काहीअंशी जबाबदार असू शकते. कारण वेस्टर्न फ्रंटवर अरुंद, घाणेरडी व ओलसर परिस्थितीत राहणारे सैनिक आजारी पडले. या आजारामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याचा थेट परिणाम होतो ज्याला “ला ग्रिस्पे” आजार म्हणून ओळखले जाते. जे या आजाराने आजारी होते ते परत आपली सैन्यात परतले यामुळे संसर्गामुळे अनेक सैनिक आजारी पडले. काहीँ बरे वाटले पण काही तसेच आजारी राहिले. या सैनिकामुळे हा आजार अनेक शहरे व खेड्यात पोहचला या संसर्गामुळे अनेकजण आजारी पडले हा विषाणू 20 ते 30 वयोगटातील तरुणांसाठी जास्त कठीण होता.
हेंन्नी डेव्हिस यांच्या “the Spanish flu” या पुस्तकाच्या (हेनरी हॉल्ट अँड कॉ 2000) अहवालानुसार दोन आठड्यात 1,000,000 पेक्षा जास्त लोकांना फ्लूची लागण झाली. या विषाणूची लागण स्पेनचा राजा अलफोन्सो बारावा यांच्यासह बऱ्याच अग्रगण्य राजकारण्यांना झाला.
स्पॅनिश फ्लू चा विषाणू नेमकी आला कोठून? Spanish flu Information in Marathi
नॅशनल जिओग्राफिकच्या 2014 च्या विषाणू उपत्ती विषयीच्या नवीन सिद्धांताद्वारे सूचित केले आहे कि स्पॅनिश फ्लू चा विषाणू सर्वप्रथम चीनमध्ये सपडल्याचे सांगितले आहे.
यापूर्वी सापडलेल्या रेकॉर्डमुळे फ्लूचा संबंध 1917 व 1918 मध्ये कॅनडा आलेल्या चिनी कामगार चायनीज लेबर कॉर्पचा वाहतुकीशी होता. मार्क हफ्रिजच्या “दि लास्ट प्लेग” या पुस्तकानुसार हे मजूर प्रामुख्याने ग्रामीण भागातील दुर्गम भागातील शेती कामगार होते. (टोरेंटो प्रेस युनिव्हर्सिटी 2013) या कामगारांनी फ्रान्सला जाण्यासाठी त्यांनी संपूर्ण देश वाहतूक केली असल्याने या दरम्यान त्यांनी सहा दिवस सीलबंद कंटेनरमध्ये घालवले. फ्रांसमध्ये आल्यानंतर त्यांना खंदक खोदणे, गाड्या उतरवणे, ट्रक तयार करणे, रस्ते तयार करणे व खराब टाक्या दुरुस्त करणे यासाठी 90,000 हजार कामगार आणले होते.
हफ्रिज सांगतात 1918 मध्ये 25,000 हजार चिनी मजूरच्या एका तुकडीतील 3,000 लोकांना हा संसर्ग होता परन्तु कॅनेडियन डॉक्टरांनी याना योग्य वैद्यकीय सेवा न दिल्याने ते मरण पावले त्यावेळी वांशिक रूढीवादामुळे या आजाराचं गांभीर्य लक्षात न घेता आजाराचा दोष चिनी आळशीपणा वर लावण्यात आला. हे कामगार काम करत करत 1919 मध्ये फ्रान्सच्या उत्तरेत येई पर्यंत अनेक जण आजारी होते आणि हजारो मरत होते.
स्पॅनिश फ्लूची लक्षणे काय होती?
आजाराच्या सुरुवातीला डोकेदुखी व कंटाळवणे त्यानंतर कोरडा, खाच येणे, भूक न लागणे, पोट समस्या आणि दुसऱ्या दिवशी जास्त घाम येणे पुढे आजाराचा श्वसन अवयवावर परिणाम होत असे मग न्यूमोनिया होत असे. न्यूमोनिया किंवा श्वसनाच्या इतर गुंतागुंती मुळे हा आजार मोठ्या प्रमाणात पसरला होता.
असेच अनेक विषयावर आपण भेटत राहू तुम्हाला लेख कसा वाटलं कमेंट मध्ये कळवा.
करोना व स्पॅनिश फ्लूची तुलना आणि यामागे काही आर्थिक गणिते आहेत का या विषयवर आपण पुढील लेखात पाहू.
-अनिरुद्ध तिडके.
Leave a Reply