कोंढाणा जिंकला पण या युद्धात सिंह गेला म्हणून छत्रपती शिवरायांनी गड आला पण सिंह गेला असे म्हणाले जाणून घ्या सिंहगड किल्ल्याचा इतिहास… Sinhagad Fort information in Marathi सिंहगड किल्ला माहिती मराठी

नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाने कोंढाणा किल्ला पावन केला आणि महाराजांनी किल्ला घेताना आपला सिंह गेला म्हणून या गडाला “सिंहगड” असे नाव दिले. याच लढाईमुळे “गड आला पण सिंह गेला” ही म्हण रुजू झाली. हा किल्ला घ्यायला महाराज स्वतः जाणार हे किळल्यावर तानाजी मालुसरे यांनी “आधी लगिन कोंढाण्याचे मग रायबाचे”.अशी घोषणा केली. पुण्यापासुन जवळपास २० ते २५ किलोमीटर अंतरावर भूलेश्वर या डोंगररांगानमध्ये वसलेला आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून ४४०० मीटर इतकी आहे.
सिंहगड किल्ला इतिहास
हा गिरिदुर्ग या प्रकारचा किल्ला आहे . हा किल्ला एकदम मोक्याच्या ठिकाणी असून या किल्लावरून आपणाला तोरणा, राजगड, लोहगड, विसापूर, पुरंदर, तसेच खडकवासला धरण यांचे दर्शन घडते. हा गड ट्रेकिंगसाठी उत्तम आहे.
सिंहगडाला पूर्वी कोंढाणा किल्ला म्हणून ओळख होती. कौंडीण्य ऋषींमुळे हा किल्ला कोंढाणा म्हणून ओळखला गेला. पूर्वी हा गड आदिलशाहीत होता त्यावेळी दादोजी कोंडदेव किल्ल्यावर सुभेदार म्हणून कार्यरत होते. दादोजी कोंडदेव यांचे १६४७ मध्ये निधन झाल्यावर छत्रपती शिवरायांनी सिद्दी अंबर या कोंढाण्याच्या किल्लेदाराला लाच देऊन हा गड स्वराज्यात आणला. मात्र पुढे शहाजी राजांच्या सुटकेसाठी ई.स.१६४९ ला शिवाजी महाराजांना हा किल्ला विजापूरकरांना (आदिलशाहीला) परत द्यावा लागला. मोगलांना पुरंदरच्या तहात जे किल्ले दिल्या गेले त्यात सिंहगड देखील होता. तानाजी मालुसरेंच्या बलिदानामुळे सिंहगड विशेष प्रसिद्ध झाला. आग्रा येथून सुटका झाल्यानंतर शिवरायांनी मोगलांच्या ताब्यात गेलेले किल्ले परत मिळविण्यास सुरुवात केली होती. जिजाबाईंची कोंढाणा परत स्वराज्यात यावा ही इच्छा शिवरायांनी पूर्ण करण्याचा चंग बांधला होता. त्यावेळी तानाजी मालुसरेंच्या रायबा या मुलाचे लग्न असल्याने हा मनसुबा शिवरायांनी त्यांच्यापासून लपवून ठेवला. परंतु तानाजींना ज्यावेळी हे समजले त्यावेळी त्यांनी मुलाचे लग्न बाजूला ठेऊन शिवरायांना कोंढाणा परत स्वराज्यात आणून देण्याचे वचन दिले. आणि वचनाला जागत आपल्या प्राणांची आहुती देऊन कोंढाणा स्वराज्यात परत आणला. तानाजी मालुसरे यांना वीरमरण आल्यानंतर त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामांनी देखील प्राण पणाला लावत कोंढाण्यावर भगवा फडकवला.
४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री हे युद्ध झाले होते, महाराजांना ज्यावेळी गड जिंकल्याची आणि तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्याची वार्ता कानावर गेली त्यावेळी ते बोलले. गड आला पण सिंह गेला‘.पुढे मोगलांनी ई.स. 1689 ला सिंहगड आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर साधारण चार वर्षांनी विठोजी कारके व नावजी बलकवडे या दोघांनी 1693 च्या सुमारास हा गड पुन्हा एकवार स्वराज्यात आणला. छत्रपती राजाराम महाराजांचे निधन याच सिंहगडावर झाले. या ठिकाणी त्यांची समाधी देखील आहे.
ई.स. 1703 ला मुगलांनी पुन्हा यावर सत्ता काबीज केली. खुद्द औरंगजेबाने जेंव्हा हा गड पाहीला तेंव्हा त्याने या किल्ल्याचे नाव ‘बक्षिंदाबक्ष’ (देवाची भेट) असे ठेवल्याचे इतिहास सांगतो. मराठ्यांच्या ताब्यात हा गड पुन्हा ई.स. १७०५ ला आला. मात्र त्यानंतर तो १८१८ साली इंग्रजांच्या ताब्यात गेल्याची नोंद आहे.
सिंहगडावर एकूण ४८ टाकी होत्या. त्यांपैकी चार-पाच सोडता सर्वांत पाणी असे. गणेश, राजाराम, देव आदी टाकी प्रसिद्घ असून देवटाके व सुरुंगाचे पाणीटाके यांत भरपूर पाणी असे. याशिवाय तीन तळी व एक विहीर आहे. गडावर बालेकिल्ला व त्याची सदर, राजमंदिर, थोरली व धाकटी सदर, त्यापुढील बंगला, राजवाडा, जवाहीरखान्यासह सरकारवाडा, अंमलदाराचा वाडा, पुणे वाडा, इस्तादकोठी, भातखळ्याची कोठी, दोन अंबरखाने, दारुखाना, कल्याण दरवाजा, यशवंत, झुंझार, आले व खांदकडा असे चार भक्कम बुरुज, चौक्या, अमृतेश्वर भैरव, कोंढाणेश्वर, गणपती, नरसिंह इ. मंदिरे, राजाराम व तानाजी यांच्या समाध्या, उदयभानचे थडगे, शृंगारचौकी इ. अनेक वास्तू होत्या. त्यांपैकी बऱ्याच १७७१ मध्ये दारुखान्यावर वीज पडल्याने स्फोट होऊन जमीनदोस्त झाल्या. काहींची दुरुस्ती झाली आणि काही नवीन बांधण्यात आल्या. त्यात लो. टिळकांचा बंगला आहे. आज यांतील थोड्या वास्तू सुस्थितीत अवशिष्ट आहेत. त्यांपैकी छ. राजारामांची समाधी, तानाजीची समाधी, जवाहीरखाना, दारुखाना,राजवाड्याचे अवशेष आणि कोंढाणेश्वर व अमृतेश्वर भैरव ही दोन मंदिरे इ. प्रेक्षणीय आहेत. दरवर्षी फाल्गुन वद्य नवमीला (मार्च-एप्रिल) राजारामांच्या समाधीचा उत्सव असतो, तर तानाजीच्या समाधीचा उत्सव प्रतिवर्षी माघ वद्य नवमीला भरतो.
पुणे दरवाजा :- आपण गड चढून वर गेलानंतर आपण या भव्य प्रवेशद्वाराजवळ पोचतो हा दरवाजा बुलंद व बळकट वाटतो. दरवाजातून आत आल्यावर आपणाला दारूचे कोठार ,घोड्याच्या पागा , प्राचीन टाके पहावयास मिळेल.
कल्याण दरवाजा :- कल्याण दरवाजा हा गडाच्या पश्चिमेला म्हणजेच राजगड, तोरणा या किल्याच्या दिशेला आहे. कल्याण गावातू वर आल्यावर आपण या दरवाजातू आत प्रवेश करता. ह्या दरवाजाच्या दोन्ही बुरजावर हत्ती व माहूत याची कोरीव शिल्पे आहे.
देवटाके:– अमृतेश्वराच्या मंदिराजवळ ह्या देवटाके आहेत. यामध्ये पिण्याच्या पाणी उपलब्ध आहे. महात्मा गांधी ज्यावेळी पुण्यात येत तेव्हा याच देवटाकेतील पाणी आवर्जून मागवत.
कोंढाणेश्वर मंदिर :- हे मंदिर महादेवाचे असून ते यादवकालीन आहे. हे यादवचे कुलदेवत होते. तसेच पुढे गेल्यावर अमृतेश्वर भैरव मंदिर पाहवयास मिळेल या मंदिरात आपला भैरव व भैरवी ह्या दोन मूर्त्या पहावयास मिळतील.
तानाजी मालुसुरे स्मारक:- ह्या गडावर आपनाला तानाजी मालुसरेची या पराक्रमी योद्याचे स्मारक पहावयास मिळेल. इथे त्यांची एक मूर्ती जी तानाजी स्मारक समितीचावतीने बांधण्यात आली आहे. इथे आपला गडावरील काही इतिहासकार जे आपणाला सिंहगडाचा इतिहास पोवाड्यातून सांगतील.
डोणागिरी कडा:- यालाच तानाजीचा कडा असेही म्हणतात. याच कड्यावरून आपल्या घोरपडीच्या साह्याने दोरखंड टाकून गडावर आपल्या मावळ्यांना बरोबर आक्रमण केले.
अक्षय जाधव
कॉलेज कट्टा.
Sinhagad Fort information in Marathi
कोंढाणा किल्ला इतिहास
सिंहगड किल्ला इतिहास
सिंहगड हे नाव कोणत्या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी दिले
Leave a Reply