संत सावता माळी यांनी दिलेला संदेश आजही समाजाला भक्ती आणि कर्म यांची उचित दिशा दर्शवतात. विठ्ठलाला भेटण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही कारण विठ्ठल सर्वत्र आहे. ही Shree Sant Savata Mali Information Mahiti Biography in Marathi language संत सावता माळी यांची माहिती मराठी
Shree Sant Savata Mali Information Mahiti Biography in Marathi language
Sant Sawata Mali Maharaj Mahiti Abhang
आमुची माळीयाची जात।शेत लावू बागाईत।।१।।
आम्हा हाती मोट नाडा। पाणी जाते फुलझाडा।।२।।
शांति शेवंती फुलली। प्रेम जाई जुई व्याली।।३।।
सावताने केला मळा। विठ्ठल देखियेला डोळा ।।४।।
या अभंगातून आपल्या कामामध्येच ज्यांनी विट्ठल पहिला असे संतशिरोमणी श्री सावता माळी महाराज यांची ओळख होते. या अभंगातून सावता महाराज म्हणतात, आम्ही माळी असून बागाईत शेती करतो. आमच्याकड़े मोट आणि नाड़ा असून त्यातून पिकाला पाणी देतो. अशा या शेतामध्ये शांती शेवंती फुलते आणि याच प्रेमाच्या मळ्यात सावता महाराज विट्ठलाला डोळे भरून पाहतात. असा या अभंगाचा मतितार्थ आहे.
संत सावता माळी यांची माहिती
संत सावता महाराज हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील संत होते. त्यांच्या काळ इ.स. १२५० ते १२९५ चा आहे. सावता हा भाववाचक शब्द आहे. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले होते.
आपल्या जन्मस्थळाबद्दल सावता माळी म्हणतात:-
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी

संत सावता माळी यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या माढा तालुक्यात अरण या गावात मध्ये झाला. अरण येथेच त्यांनी आपल्या मळ्यातच विठ्ठलाचे नामस्मरण करत समाधी घेतली. त्या ठिकाणी समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. पंढरपूरला जाताना वारकरी आवर्जून अरण येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत सावता माळी यांनी त्यांच्या अभंगांमधून आणि जगण्यामधून कर्म हाच ईश्वर हा संदेश महाराष्ट्राला दिला.
स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।
सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।
त्यांच्या अभंगांत वात्सल्य, करुणा, शांती, भक्ती हे रस आढळून येतात. संत सावता माळी यांनी सांगितले, की परमेश्वराची आराधना करताना भाव महत्त्वाचा असतो. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांपेक्षा भक्तिभाव महत्वाचा आहे. त्यांनी आपल्याला कामातच देव आहे, देवाला भेटण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही कारण देव सर्वत्र आहे. असा संदेश दिला.
संत सावता माळी यांनी शेती करत परमेश्वराची आराधना केली. शेतात भरपूर कष्ट करावेत. गाडगेबाबा ज्याप्रमाणे देव दगडात नसून माणसात आहे. माणसांची सेवा करावी असं सांगत त्याचप्रमाणे सावता महाराज म्हणत की प्रत्येकाने आपल्या कामातच देव शोधावा. त्याला विशिष्ट ठिकाणी शोधण्याची गरजच नाही कारण तो सर्वत्र आहे. म्हणून सावता माळी हे बंडखोर, कर्ते सुधारकच होते असे म्हणावे लागेल.
कांदा मुळा भाजी अवघी | विठाबाई माझी
लसण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||
मी शेतात पिकवलेली कांदा, मुळा, भाजी, हेच माझे विठ्ठल आहेत या सर्वांमध्ये, मळ्यातल्या फळ भाज्यांमध्येच मला विठ्ठल दिसतो.
Sant Savata Mali Mandir Aran Madha Solapur Katha Story Marathi
पैठणच्या कूर्मदास या भक्ताला भेटण्यासाठी विठ्ठल निघाले असताना वाटेत ते सावता महाराजांचा मळ्यात थांबले. पंढरीनाथाबरोबर संत ज्ञानेश्वर व संत नामदेव हेही होते. भक्तीची पराकाष्ठा हे त्या दोघांना दाखवायचे होते. विठ्ठल त्या दोघांची नजर चुकवून सावता माळी यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, सावता माझ्या मागे दोन चोर लागलेत. मला लपायला जागा दे. त्यावर सावता महाराज म्हणाले, “देवा, या जगात अशी कोणतीच जागा नाही तेथे तू दिसू शकणार नाही.” विठ्ठल म्हणाले, “तू मला तुझ्या उदरात लपव.” त्याबरोबर सावता महाराजांनी खुरप्याने आपले पोट फाडून देवाला स्वतःचा उदरात लपवले. इकडे देवाचा शोध घेत संत ज्ञानदेव आणि नामदेव सावता महाराजांपाशी आले आणि म्हणाले, “आमचा देवाला कुठे पहिले आहे का ?” सावता महाराज काहीच बोलले नाहीत. नामदेव आणि ज्ञानदेवांची व्याकुळता बघून विठ्ठलाने सावता महाराजांना त्यांचा उदाराचा बाहेर काढायला सांगितले. देव बाहेर आल्यानंतर नामदेवाला आणि ज्ञानदेवांना झालेल्या आपल्या भक्तीचे गर्वहरण देवाने यावेळी केले.
पंढरपुर पासून अरण हे गाव जवळच आहे परंतु सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाहीत. पंढरपूरला जाणाऱ्या वारीतील लोकांची ते अरण येथे सेवा करत. यावरून पुन्हा त्यांचा कर्म भक्तीचा उजाळा होतो.
संत सावता महाराजांनी शेवट पर्यंत आपल्या मळ्यातच कर्म करत विठ्ठलाचा भक्तीची उपासना केली. आपल्या मळ्यामध्येच विठ्ठलाचे नामस्मरण करत समाधी घेतली.
त्यांनी दिलेला संदेश आजही समाजाला भक्ती आणि कर्म यांची उचित दिशा दर्शवतात. आज काम न करता जास्त मोबदला मिळावा. अशी अपेक्षा काही लोकांमध्ये वाढत आहे. कामचुकारपणा, भ्रष्टाचार या गोष्टी देखील वाढत आहेत. या सगळ्यांना सावता महाराजांचा संदेश, आपल्या कामाशी प्रामाणिकपणा हीच खरी विठ्ठलभक्ती आहे हे लक्षात घ्यावे.
-प्रियांका पुंड.
ही माहिती Shree Sant Savata Mali Information Mahiti Biography in Marathi language Savata Mali Mandir Aran Madha Solapur Katha Story संत सावता माळी यांची माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा.
कॉलेज कट्टा या संतेस्थळाला पुन्हा भेट द्या ‘कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ!’ जिथे दैनंदिन जिवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Sant Savata Mali History Hindi
Leave a Reply