आदरणीय व्यासपीठ आणि समोर जमलेल्या माझा मित्रांनो, आपल्या राष्ट्र ध्वज तिरंग्याला प्रणाम करून मी माझे दोन शब्द सुरु करतो. Short Speech 15 August Independence Day Speech Bhashan for Students in Marathi language
Short Speech 15 August Independence Day Speech Bhashan for Students in Marathi language भारतीय स्वातंत्र्य दिन भाषण निबंध मराठी माहिती
आपण स्वतंत्रता दिवस का साजरा करतो ? तर ब्रिटीश राजवटीपासून आपण मुक्त झालो. लोकराज्य आले म्हणून.
आझादी खून मांगती है | स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्या थोर युगपुरुषांचे मी स्मरण करतो.
मित्रांनो आपल्यावर भारत देशावर ब्रिटिशांनी तब्बल 150 वर्ष राज्य केले. हे काही सुराज्य नव्हते. व्यापाराचा दृष्टीने आलेल्या ब्रिटिशांना कायमस्वरूपी राज्य करायचे हा त्यांचा हेतू, या देशाचे आर्थिक शोषण करण्यासाठीच होता. त्यांचा दृष्टीने आपण गुलाम होतो. ते स्वतःचा रंगला उच्च समजत. भारतातील प्रत्येक गोष्ट लुटण्यासाठी आहे. हे त्यांनी सिद्ध केले आहेच.
ब्रिटीशांचा आगोदर ही आपल्या देशावर परकीय आक्रमण झाली. मुघल आणि इतरही राज्यकर्ते याच हेतूने आले होते.
असे म्हंटले जात होते की ब्रिटीशांचा राज्यावर कधी सुर्य मावळत नाही. याचे कारण असे की, त्यांचे कुशल राजकारण, आधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञानाची जोड.
भारतात त्यांनी फोडा आणि राज्य करा ही राजनीती वापरूनच राज्ये काबीज केले. त्यावेळेस भारतात अनेक हिंदू आणि मुघल राजांमध्ये वाद होते. सत्तासंघर्ष होता. या गोष्टीचा फायदा घेऊन काही राजा ज्यांचा त्यांना उपद्रव नाही अशांचा साथीने त्यांनी अनेक राज्य जिंकली.
जर आपण त्यावेळी एक असतो तर आपल्यावर ब्रिटिशांना राज्य करताच आले नसते.
Short Speech 15 August Independence Day Speech Bhashan for Students in Marathi language भारतीय स्वातंत्र्य दिन भाषण निबंध मराठी माहिती
ब्रिटीशांचा अन्याय सहन होत नव्हता. 1857 चा उठाव एक सशस्त्र उठाव होता. हा स्वातंत्र्यासाठी केलेला पहिला मोठा उठाव होता पण ब्रिटिशांनी तो मोडून काढला. त्यावेळेस ब्रिटीश राजवटीला भारतात 100 वर्षे पुर्ण झाली होती.
या उठावानंतर ब्रिटीशांनी भारतीयांना त्यांचा राज्यकारभारात काही पदे देण्यास सुरवात केली पण महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार नव्हताच. भारतीय फक्त कारकून म्हणूनच राहिले. पहिल्या महायुद्धात प्रचंड मोठ्या संखेने भारतीय सैनिकांनी ब्रिटीशांची साथ दिली.
भारताला पुर्ण स्वातंत्र्य हवे होते. यासाठी महात्मा गांधी आणि कॉंग्रेस पार्टी यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला होता. त्याचबरोबर अनेक स्वातंत्र्यसेनानी यांनी देश स्वातंत्र्याचा विडा उचलला होता. लाल बहादूर शास्त्री, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू आणि इतरही.
भगत सिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद आणि सुखदेव यांनी क्रांतिकारी मार्ग अवलंबला होता. त्यांचे बलिदान आणि देशप्रेम हे अजरामर आहे.
आपल्या तिरंग्याचे तीन रंग यात भगवा त्याग, शौर्य आणि धैर्याचे प्रतिक आहे. पांढरा रंग शांततेचे आणि स्वच्छतेचे मध्यभागी असलेले अशोकचक्र प्रगतीचे. हिरवा रंग हा आनंदाचे आणि भरभराटीचे प्रतिक आहे.
आपण आज स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. पण खरच मित्रांनो आपण स्वतंत्र उपभोगात आहोत का? कारण आपण आजही त्याच जुन्या विचार सरनिंचा, रूढीचां विळख्यात आहोत जे तेव्हा आणि आजही आपल्यासाठी घातक होते आणि आहेत. यात धर्मभेद, जातीभेद, वंशभेद, स्री, पुरुष भेद या गोष्टींवर आपला समाज आजही विखुरला जातो. आजही हिंदु-मुस्लीम दंगली होतात. याचप्रमाणे परकीय जरी गेले असले तरी त्यांचा वस्तू आपण आजही विकत घेतो. यात दैनंदिन जीवनात लागणाऱ्या कित्येक वस्तू परदेशी कंपन्यांचा आपण वापरतो.
चालू काळात सुशिक्षित वाढत आहेत. पण अशा शिक्षणाचा उपयोग फक्त नौकरी मिळवण्यासाठी होतो. हे सुशिक्षित आपल्या शिक्षणाचा वापर करून एखादा व्यवसाय का करत नाहीत?
सुशिक्षित आणि काही वर्ग राजकारण या क्षेत्राला घाण ठरवतात. जर तुम्ही या क्षेत्रात जाणार नाहीत मग तुम्हाला राजकारण समजलेच नाही. त्यांनी फक्त चहा पीत गप्पा माराव्यात.
15 आँगस्ट 1947 स्वातंत्र्यानंतर हे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. भारत मातेची राष्ट्रीय एकता टिकवण्याची जबाबदारी आपली आहे.
जय हिंद जय भारत!
मित्रांनो हे Short Speech 15 August Independence Day Speech Bhashan for Students in Marathi language भारतीय स्वातंत्र्य दिन भाषण निबंध मराठी माहिती स्वतंत्रता दिवस का साजरा केला जातो? भाषण कसे वाटले हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा. कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या कारण कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणरी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Masttt
Verry nice….