
Savitribai phule information in Marathi
सावित्रीबाई फुले मराठी माहिती. सावित्रीबाई फुले माहिती मराठी मध्ये. सावित्रीबाई फुले यांचे कार्य. स्त्री शिक्षण आणि सावित्रीबाई फुले. स्त्री शिक्षण माहिती. सावित्रीबाई फुले माहिती मराठीत. सावित्रीबाई फुले जयंती भाषण. सावित्रीबाई फुले निबंध. सावित्रीबाई फुले मराठी लेख. क्रांतीज्योती….. Savitribai phule information in Marathi
मातृत्वाचं दर्पण घेऊन जिचा जन्म झाला, संपूर्ण जनतेला स्वतःच्या नावाची लेखी ओळख जिने करून दिली,चूल आणि मूल या संकल्पनेतून महिलांना बाजूला काढून त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ज्यांनी करून दिली, त्या क्रांतीज्योती म्हणजेच सावित्रीबाई फुले. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगाला परिचित असणाऱ्या सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात सावित्रीबाईंनी मोठी किमया केली होती, हे इतिहास सिद्ध झाले आहे.
सावित्रीबाई या मराठी शिक्षणाच्या प्रसारक आणि एक महिला समाजसुधारक होत्या. मराठीतील पहिल्या कवयित्री होण्याचा बहुमान देखील त्यांनी मिळविला होता.त्यापैकी एक सुंदर कविता…
Savitribai phule poem in Marathi. Savitribai phule yanchi kavita.सावित्रीबाई फुले मराठी कविता. सावित्रीबाई फुले चारोळ्या.
ज्ञान नाही विद्या नाही ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का ?
दे रे हरी पलंगा काही पशुही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही तयास मानव म्हणावे का ?….
वरील काव्यपंक्तींमध्ये खूप गूढ अर्थ दडला आहे. …..असाच सुंदर अर्थ त्यांच्या प्रत्येक कवितेत दडला आहे.
Savitribai phule information in Marathi. Savitribai phule essay in Marathi
सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
1 मे, इ.स. 1847 रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. 1 जानेवारी, इ.स. 1848 रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सा-या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.1847-1848 साली केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या.
सावित्रीबाईंनी सुरु केलेल्या शाळेत सुरुवातीला सहा मुली होत्या. 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 एवढी पोहोचली.पण हे यश सनातनी उच्च वर्णीयांनी पचत नव्हते त्यांनी धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला. असा दिंडोरा पिटायला सुरवात केली. प्रसंगी सावित्रीबाईचा अंगावर शेण फेकले. संघर्ष करत सावित्रीबाईनी हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालू ठेवला.घर सोडावे लागले. अनेक आघात झाले तरी सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंग सांगतात त्यांचा प्रवास किती खडतर होता.
या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही 2-3 मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा 2016 सालीही चालू राहिली.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच 1876–77 च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे 1897 मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले.
जनहितासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, शिक्षणासारख्या पवित्र कामासाठी ज्यांनी समाजाच्या शिव्या ऐकल्या, दगड आणि चिखल फेकणाऱ्या जनतेला आपल्या मायेची उब देऊन त्यांच्या दारात शिक्षणाची गंगा ज्यांनी आणली त्या सावित्रीबाईंचा दुर्दैवाने स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. 10 मार्च 1897 मध्ये प्लेगच्या साथीमुळे त्यांचे निधन झाले.
आज महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत. किंबहुना त्या सर्वच ठिकाणी पुरुषांच्या तुलनेत आघाडीवर आहे. घरातील स्त्री शिकली म्हणजे दोन्ही कुळाचा उद्धार होतो अशी म्हण आपल्या समाजात आहे. परंतु आज याच महिलांच्या चारित्र्याशी रोज जीवघेणा खेळ याच समाजाकडून खेळला जातो, ज्या समाजाला सवित्रीसारख्या महिलेने साक्षर केले जीवन जगण्याची दिशा दिली….
त्यांच्या या महान कार्यासाठी मी एवढेच म्हणेल कि,
झाले बहू होतील बहू पर
या हिऱ्यासम दुसरे रत्न जगी होणे नाही…. सावित्रीबाई फुले यांचे विचार. सावित्रीबाई फुले यांचे चरित्र. सावित्रीबाई फुले व्यक्ती व कार्य या माहितीने तुम्ही नक्कीच प्रेरित झाला असाल. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची माहिती कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे आवश्य कळवा.
-प्रियंका पुंड.
priyanka.pund123@gmail.com
खूप सखोल माहिती दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद.
खूप छान माहिती लिहिली आहे..
खूप खूप धन्यवाद!!!