जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे संत होते. त्यांचे कार्य समस्त समाजासाठी आदर्श व मार्गदर्शक असे आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग आज इसवी सन २१ व्या शतकात ही यथार्थ उपयोगी आणि मार्गदर्शक ठरतात. Sant Tukaram Maharaj information essay speech in Marathi language

Sant Tukaram Maharaj information essay speech in Marathi language
उदा या अभंगातील संदेश आजही लागू आहे.
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ॥ १ ॥
तैसे चित्तशुद्धी नाही । तेथे बोध करील काई ॥ २ ॥
जर तुमचे आचरण, मन, जीवन निर्मळ नसेल तर बाह्य अंगाला कितीही साबण लावला तरी तुमचे अंतकरण हे निर्मळ नसणार आहे. अशाने तुमची चित्तशुद्धी होणार नाही. चित्तशुद्धी नसेल तर बोध प्राप्ती होणार नाही. साबणेने फक्त बाह्य अंग स्वच्छ होईल पण अंतकरण चित्तशुद्धीसाठी साबणाचा काहीच उपयोग नाही.
Sant Tukaram Maharaj information essay speech in Marathi language जगद्गुरू संत तुकाराम महाराज निबंध भाषण माहिती
अशा प्रकारच्या अभंगातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भक्ती मार्गातून उत्तम जीवण जगण्यासाठी तसेच पुढे बोध प्राप्ती आणि मुक्ती मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतात. म्हणूनच म्हणले जाते ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस वारकरी संप्रदायात ज्या संतांनी मोलाचे योगदान केले यात संत परंपरेत श्रेष्ठ श्री संत ज्ञानदेव महाराज यांच्याप्रमाणेच संत तुकाराम महाराजांचा यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणून तुकाराम महाराजांना कळस म्हणले जाते.
श्री विठ्ठलाचे नामस्मरण करून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ…
Sant Tukaram Maharaj information essay speech in Marathi language जगद्गुरू संत तुकाराम महाराज निबंध भाषण माहिती
विठ्ठल भक्तीची ओढ तुकोबांच्या कुटुंबात होतीच. त्यांच्या पूर्वीचे आठव्या पिढीचे प्रमुख विश्वंभर बुवा हे विठ्ठल भक्त होते. यांना शेतात विठ्ठल–रखमाईंच्या मूर्ती सापडली. या मूर्तीची स्थापना त्यांनी नदीकाठावरील घरात केली या घराचे पुढे देऊळवाडा असे नामकरण झाले.
तुकोबांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई असे आहे. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव आंबिले आहे. त्यांना दोन बंधू होते. सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. त्यांचा मोठा भाऊ सावजी यांचे संसारिक जीवनात मन रमत नव्हते… विठ्ठल भक्तीच्या ओढीने त्यांनी संसारिक जीवनाचा त्याग केली व विरक्ती स्वीकारली. आणि विठ्ठलाच्या शोधात निघाले. म्हणून तुकोबांवर घराची जबाबदारी आली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला होता. परंतु त्यांची पहिली पत्नी रखमाई ही अशक्त आणि आजारी असल्यामुळे पुढे रखमाईच्या मृत्युनंतर पुणे जिल्ह्यातील खेड येथे राहणाऱ्या आप्पाजी गुळवे ह्यांच्या अवलाई (जिजाई) नावाच्या मुलीशी त्यांचा दुसरा विवाह झाला.
जगद्गुरू संत तुकारामांना चार मुले होती. कन्या भागीरथी व काशी या मुली आणि नारायण आणि महादेव ही दोन पुत्र. यापैकी दोन आपत्ये आजाराने मरण पावली. जिजाई स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. त्यांनी तुकाराम महाराजांची काळजी घेतली.
संत तुकाराम महाराजाकडे वडिलोपार्जित महाजनकी होती म्हणजे बाजारपेठेच्या व्यापारव्यवहारांतील वजने–मापे, मालाची देवघेव इत्यादींवर देखरेख ठेवणारा आणि व्यापारी कर वसूल करणारा अधिकारी. याच प्रमाणे मालकीची आणि इनामाची शेती आणि सावकारीही होती.
परंतु संत श्रेष्ठ तुकोबांना गोर गरीब जनतेचे दुखः सहन होत नव्हते. एका प्रचंड मोठ्या दुष्काळात त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या धान्यांची कोठारे गोर गरिबांसाठी उघडी केली. स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता त्यांनी सर्वांना धान्यवाटप केले… दुष्काळ परिस्थितीमध्ये वडिलोपारजीत सावकारकीमध्ये गहाण असलेल्या जमिनी, दागिने, वस्तू, ज्याच्या त्याला परत केल्या. गहाण ठेवलेल्या असल्याची पुरावे कागदपत्रेही त्यांनी नष्ट केली.
आत्मज्ञानी गौतम बुद्धांनी राजऐश्वर्याचा त्याग केला होता त्याप्रमाणेच जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांनी देखील यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. आणि भंडारा डोंगरावर जाऊन विठ्ठलाचे चिंतन करू लागले. त्या काळात त्यांची पत्नी जिजाई यांनी त्यांची देखभाल केली.
पुढे किर्तनाद्वारे तुकोबा समाजाला प्रबोधन करू लागले.
संत तुकारामांचे कीर्तन विचार त्या काळातील कर्मठ, जातीरुढीशी घट्ट बांधलेल्या लोकांना पटत नव्हते. पण लोकांमध्ये होत असलेला बदल पाहून, त्यांनी तुकोबांचा छळ करायला सुरवात केली. प्रसंगी तुकारामांनी लिहिलेली गाथा त्यांना स्वतःलाच इंद्रायणी नदीत बुडवायला भाग पाडले. पण म्हणतात ज्ञान हे दिल्याने वाढते त्याचा प्रसार होतो. या कर्मठ लोकांच्या असंख्य प्रयत्नानंतर ही तुकोबांचे अभंग त्या काळी लोक म्हणू लागले…आणि आजही हे अभंग मार्गदर्शन करतात.
अभंग
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले
तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा.
-संत तुकाराम
फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ-गमन झाले. दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराजांनी संसारी असून सुद्धा परमार्थ कसा करावा याचे उत्तम उदाहरण स्वतःच्या रूपानेच आपल्या सर्वांना दिले आहे.
बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठ्ल…श्री ज्ञानदेव…तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय…
-अभिजित हजारे.
कॉलेज कट्टा.
मित्रांनो, Sant Tukaram Maharaj information essay speech in Marathi language जगद्गुरू संत तुकाराम महाराज निबंध भाषण ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ! अश्या पद्धतीची माहिती वाचण्यासाठी कॉलेज कट्टाला आपला ईमेल आयडी भरून सबस्क्राइब करा.
Leave a Reply