Sane Guruji Story in Marathi
साने गुरुजी कोण होते? बलसागर भारत होओ आणि खरतो एकची धर्म या कविता आजही प्रेरणा देतात. आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवायचे आहेत तर Pandurang Sadashiv Sane Marathi साने गुरुजी यांचे साहित्य वाचायला द्या त्यांचाबद्दल ही महत्वपूर्ण माहिती नक्कीच तुमचात बदल घडवेल.
Sane Guruji Story in Marathi Sane Guruji Information Marathi Sane Guruji Mahiti Marathi
साने गुरुजी कोण होते त्यांचे साहित्य वाचल्यावर मुलांवर चांगले संस्कार घडतील
बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनी राहो। ही काव्यपंक्ती आजच्या जमान्यात कुणी ऐकली नसेल तर मग आश्चर्यच म्हणावं लागेल. आपल्या शालेय जीवनात आपण ही प्रार्थना कधीतरी एकदा का होईना ऐकलेली असते नव्हे ती म्हणलेली ही असते. सर्वच जण मनोभावे ही प्रार्थना म्हणत असतात. ही प्रार्थना ज्यांनी लिहली ते थोर व्यक्तिमत्व साने गुरुजी या नावाने ओळखले जाते.
साने गुरुजी हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. श्यामची आई, नवा प्रयोग, सुंदर पत्रे, हिमालयाची शिखरे, क्रांती, समाजधर्म, आपण सारे भाऊ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.
साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न आणि श्रीमंत समजले जाते. त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती देखील तशी होती पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात त्यांचा जन्म झाला.
पांडुरंग सदाशिव साने Sane Guruji’s Shyam’s Mother
२४ डिसेंबर इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांचा आईचे नाव यशोधाबाई साने असे होते. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सालस, गुणी, कष्टाळू आणि सात्विक मनोवृत्ती असलेल्या पंढरीची पुढे गुरुजी हीच ओळख झाली. लहान वयातील शारीरिक-मानसिक जडण-घडण करण्याची जबाबदारी ही मुख्यत: आई वरच पडते. त्यांची आई तशीच होती. त्या म्हणायच्या, “पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसेच मन घाण होऊ नये म्हणूनही जप हो!” खोटे कधी बोलू नको, ‘ कोणत्याही प्रकारचे काम करण्याची लाज बाळगू नको.” दिन दुबळ्याना मदत करण्यास पुढे हो. अश्या अनेक गोष्टी त्यांना लहानवयात रुजवण्यात आल्या. त्या प्रेम करीत, पण चुकी झाल्यास कठोर शिक्षा देत असत. त्यामुळे मोठेपणी ते सत्यनिष्ठ, परोपकारी, प्रामाणिक बनले. पालगडचे पाच वर्ग शिक्षण झाल्या नंतर ते मामा कडे पुण्याला गेले, तेथे त्यांनी अनेक धार्मिक पोथी-पुराने यांचे वाचन केले पण आईकडे जाण्याच्या ईच्छेने ते परत पालगडला आले. त्यासाठी त्याना खूप बोलणी खावी लागली. पण ते भरपूर कामे करून आईची मदत करीत असत त्यामुळे घरच्यांचा राग दूर करत. नंतर ते इंग्रजी शिक्षणा करीता आत्याकडे दापोलीला राहिले तेथे त्यांनी आपली वाचनाची हौस भागविली. संस्कृत, ईंग्रजी, मराठी अशी अनेक पुस्तके त्यांना तेथे वाचनास मिळत. त्यानंतर त्याना महिती पडले कि औधला मोफत शिक्षण व जेवण मिळते. तेव्हा घरच्या परवानगीने ते औंधला गेले. काही दिवसातच तेथे प्लेग ची साथ आल्यामुळे ते परत आले. नंतर ते पुण्याला गेले. १९२२ मध्ये बी.ए. ची पदवी उत्तीर्ण झाले. पुढे अमळनेरला तत्वज्ञान मंदिरात काम करीत एमए झाले नंतर खानदेश एजुकेशन सोसायटी शाळेत नोकरी मिळाली. मुलांना शिकविण्याची त्यांची पद्धत आणि त्यामागची कळकळ पाहून उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्धी झाली. काही दिवस वसती गृहाचे काम चालविले. मुलांना चांगले संस्कार देण्याची त्यांना संधी मिळाली. थोर पुरुष्याचे चरित्रे लिहिली. त्यावेळीच त्यांच्या मनात आपण देशासाठी काही तरी करावे असे वाटू लागले. नेत्यांची भाषणे, गांधीजींच्या चळवळीने जनतेला मिळणारे संदेश या सर्व गोष्टींने त्यांच्या मनावर देशा विषयीचा भावना बळावल्या. नंतर १९३० मध्ये त्यांनी शाळा सोडली आणि ते आश्रमात दाखल झाले. सत्याग्रहाच्या कामात भाग घेऊन भाषणे करू लागले त्यांच्या भाषणाने तरुणांना भाराऊन टाकले. त्यांच्या अंमळनेरच्या भाषणात त्यांच्यावर खटला भरण्यात आला. १५ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यातही त्यांनी लोकशिक्षण, लेखन, स्फूर्ती गीते चालूच ठेवले. स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई, दुखी सारख्या कथा, खरा सत्याग्रही, क्रांती, आस्तिक, अश्या कथा कादंबरी, नाटके त्यांनी लिहिलीत. त्यांची “शामची आई” हि कादंबरी फार प्रसिद्ध झाली. स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत राहून त्यांनी देश्याच्या स्वांतंत्र्यासाठी अनेकांना प्रेरणा दिली.
आधी केले मग सांगितले. या विचारांचे ते होते. समाजात एकोपा राहावा असे त्याना वाटे. साधना साप्ताहिकांचे संपादन, कुमार संमेलनाचे अध्यक्षपद, मंदिर प्रवेशाच्या निमित्ताने पंढरपुरला प्राणांतिक उपोषण असे समाज कार्य करताना त्यांनी कुमारांना संदेश म्हणून सांगितले, “देशी-विदेशी वाड्मयाचा अभ्यास करा. अनुवाद करा. सर्वत्र हिंडून वाड्मय गोळा करा आणि देश समाज याची सेवा करा. सेवा दलात त्यांनी प्रत्यक्ष कार्य केले होते. ते मनाने फार हळवे होते देशाच्या स्वातंत्र्या नंतर घडलेल्या काही घटनांनी अस्वस्थ झालेले गुरुजी अखेर तिमीरातून तेजाकडची वाटचाल ११ जून १९५० साली थांबवत सानेगुरुजींनी या जगाचा निरोप घेतला.
-प्रियंका पुंड.
Sane Guruji Story in Marathi Sane Guruji Information Marathi Sane Guruji Mahiti Marathi Pandurang Sadashiv Sane Marathi Sane Guruji Books in Marathi साने गुरुजी विचार साने गुरुजी माहिती साने गुरुजी information साने गुरुजी श्यामची आई साने गुरुजींच्या गोष्टी. पांडुरंग सदाशिव साने Sane Guruji’s Shyam’s Mother.
Leave a Reply