कमी बोलणारा, टीकाकारांना आपल्या बॅटने उत्तर देणारा आपला आवडता क्रिकेटर म्हणजेच सचिन तेंडूलकर! त्याचा बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर जास्त विश्वास होता म्हणून त्याची बॅट सतत धावांचा पाऊस पाडे. Sachin Tendulkar Cricket Player Information Mahiti Biography Marathi language .
Sachin Tendulkar Cricket Player full Information Mahiti Biography in Marathi language
Sachin Tendulkar Jivan Charitra Profile History in Marathi language
My Favorite Cricketer Player Sachin Tendulkar Short Essay Note speech in Marathi language
मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव अशा अनेक नावानी आपण त्याला संबोधतो. सचिन हा खरतर गोलंदाज होण्यासाठी क्रिकेटमध्ये आला होता पण तो सर्वोत्तम फलंदाज बनला. त्याचबरोबर त्याची गोलंदाजीतली कामगिरीही चांगली आहे. त्याच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. ज्यावेस धावा बनत नव्हत्या त्या त्या वेळेस टीकाकारांनी त्याला निवृत्त होण्याचा सल्ला दिला पण त्याने संयमाने अपयशाने खचून न जाता पुन्हा धावा बनवल्या.
आपल्याला नव-नवीन विक्रम ज्याचा मुळे माहित झाले असे नाव म्हणजे ‘सचिन रमेश तेंडुलकर’. आपल्या भारत देशात क्रिकेटला धर्म मानतात आणि या धर्माचं दैवत आहे ‘सचिन तेंडुलकर’.
सचिनचा जन्म मुंबईत दादर मध्ये 24 जुलै 1973 रोजी झाला. वडील रमेश तेंडुलकर कादंबरीकार होते तर आई रजनी तेंडुलकर insurance industry मध्ये काम करत होत्या. चार भावंडांमध्ये सचिन हा सर्वात लहान आणि खोडकर स्वभावाचा होता.
सध्या आपण ज्या सचिनला ओळखतो आणि देव मानतो त्या सचिनपेक्षा लहान सचिन खूप वेगळा होता. सचिनला क्रिकेटची आवड मोठा भाऊ अजितमूळे लागली अजितनेच त्याला ‘रमाकांत आचरेकर’ सरांकडे शिकण्यासाठी पाठवलं. सचिनचा सराव शिवाजी पार्कवर चालू झाला आणि सचिन आणि शिवाजी पार्क यांच्यातील नातं बहरायला लागलं.
क्रिकेटसाठी सचिनने नवीन शाळेत म्हणजेच शारदाश्रम विद्यामंदिर मध्ये प्रवेश घेतला. आचरेकर सरांच्या देखरेखीत सचिनचा खेळ आणि त्याच बरोबर वयक्तिमत्व देखील घडत होते. आचरेकर सर सचिनसाठी नव-नवीन युक्ती शोधून काढत. त्यातील एक म्हणजे यष्टीवर 1 रुपया ठेवायचा आणि सचिनला फलंदाजी करायला सांगायचे आणि जो सचिनला बाद करेल त्याला तो 1 रुपया मिळायचा नाहीतर सचिनला. असे सचिन ने 13 रुपये मिळवले. सचिन सांगतो, खूप पैसे आणि प्रसिद्धी मिळाली पण त्या एका रुपयांची गोष्टच वेगळी होती.

Sachin Tendulkar Jivan Charitra Profile History in Marathi language
Sachin Tendulkar Cricket Player Information Mahiti Biography Marathi language
14 वर्षांचा सचिन झोतात आला जेव्हा 24 फेब्रुवारी 1988 रोजी त्याने शारदाश्रम विद्यामंदिर कडून खेळताना St.Xavier’s High School विरुद्ध विनोद कांबळी सोबत मिळून 664 रणांची भागीदारी केली. ज्यात सचिनने 326 धावांची खेळी केली होती आणि त्या भागीदारीचा पण अजून पर्यंत एक विक्रमच आहे.
पुढे सचिन 15 नोव्हेंबर 1989 ला पाकिस्तान विरुद्ध कराची मध्ये त्याचा पहिला कसोटी सामना खेळाला जेव्हा तो फक्त 16 वर्ष वयाचा होता.
सचिनने 24 मे 1995 रोजी अंजली मेहता सोबत लग्न केले. पेशाने डॉक्टर असलेल्या अंजलीने सचिन सोबत लग्न झाल्यावर घर सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे सचिनला त्याच्या खेळावर पूर्ण लक्ष देण्यासाठी खूप मदत झाली.
सचिन नेहमी सांगतो अंजलीमूळे मला घरची अजिबात चिंता नसायची त्यामुळे मला माझा पूर्ण वेळ खेळासाठी देता आला आणि जेव्हा धावा निघत नसत तेव्हा अंजलीने खूप साथ दिली. “सारा आणि अर्जुन” ही दोन मुले लहान होती तरी अंजलीने पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आणि सचिन ला पूर्ण लक्ष खेळावर देण्यास सांगितले.
सचिनला त्याच्या पूर्ण कारकिर्दीत खूप दुखापती झाल्या. पण “TENIS ELBOW” ही पण दुखापत असते हे जगाला सचिन मूळ कळालं. ही दुखापत सचिनला 2004-05 मध्ये झाली ती इतकी गंभीर होती की सचिनला हाताने पेन पण उचलता येत नव्हता. सगळ्यांना वाटलं सचिन संपला, धावा पण निघत नव्हत्या आणि त्यामध्ये ही दुखापत! संजय मांजरेकरने तर आपल्या लेखात सचिनचा उल्लेख “ENDULKAR” असा केला होता पण म्हणतात ना कोणी काही बोलू जे देव ठरवतो तसेच होते. अभाळातल्या देवाला पण ह्या क्रिकेटच्या देवाची खूप काळजी होती इतक्या दुर्धर आजारातून सचिन पूर्ण बरा झाला. सचिन फक्त बरा झाला नाही तर पूर्ण देश एका मोठ्या आजारातून बरा झाला असे वाटलं तेव्हा सगळ्यांना! त्यानंतर सचिनने कधी मागे वळून बघितलं नाही.
10 डिसेंबर 2005 मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळताना सचिन ने सुनील गावस्कर यांचा 34 शतकांचा विक्रम मोडला. त्यानंतर सचिनने विक्रमांची मालिकाच बनवायला सुरुवात केली. एकदिवसीय असो नाहीतर कसोटी क्रिकेट सचिन जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू झाला होता.
24 फेब्रुवारी 2010 मध्ये ग्वालियार मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध सचिनने एकदिवसीय क्रिकेट मधले पहिले द्विशतक केले. असं करणारा तो तेव्हा जगातील एकमेव खेळाडू होता.
16 डिसेंबर 2010 मध्ये सचिनने दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळताना त्याच्या कारकीर्दीमधले 50 वे कसोटी शतक ठोकले. त्याच सामन्यात सचिनने 14500 धावा पूर्ण केल्या.
सचिनचे विश्वचषक जिंकण्याच स्वप्न अखेर 2 एप्रिल 2011 रोजी वानखेडेवर पूर्ण झाले.
My Favorite Cricketer Player Sachin Tendulkar Short Essay Note speech in Marathi language
माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर यांची माहिती निबंध भाषण मराठी मध्ये
अखेर तो दिवस उजाडला ज्याची सगळे क्रिकेट विश्व आतुरतेने वाट बघत होते. 16 मार्च 2012 हाच तो ऐतिहासिक दिवस जेव्हा सचिनने ढाक्या मध्ये खेळताना एकदिवसीय सामन्यात बांगलादेश विरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमधले ‘ शतकांचे शतक’ पूर्ण केले.
अखेर डिसेंबर 2012 मध्ये सचिनने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आणि अश्या प्रकारे एकदिवसीय क्रिकेट मधल सचिन नावाचं वादळ शांत झाले.
मग पुढे सचिन 16 नोव्हेंबर 2013 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची अखेरची कसोटी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेवर खेळला हीच त्याच्या कारकिर्दीची 200 वी कसोटी होती.
कधीही न थांबणारी मुंबई त्या दिवशी फक्त सचिनसाठी थांबली होती वानखेडे वर आपल्या लाडक्या सचिनला बघायला जमली होती. त्याच दिवशी सचिन ला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान भेटला.
24 वर्षांपूर्वी चालू झालेला हा प्रवास थांबला. सचिन तब्बल 24 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाला आणि 24 वर्ष रणजी खेळाला. यादरम्यान त्याने विक्रमाची मालिका उभी केली तो जेव्हा जेव्हा मैदानात उतरत होता तेव्हा तेव्हा नवीन विक्रम उभे राहत होते.
अनेक चढउतार आले तरी सचिन हरला नाही प्रत्येक संकटांवर मात करून उभा राहिला. सचिन सांगतो सुनील गावस्कर आणि सर विवं रिचर्ड त्याचे आयडॉल आहेत. आज हाच सचिन जगातल्या करोडो लोकांचा आयडॉल आहे. आजही सचिन पासून लोकांना प्रेरणा, आत्मविश्वास मिळतो.
यशाची प्रत्येक उंची गाठलेला सचिन स्वभावाने तितकाच विनम्र आहे. सचिन म्हणतो, “मला देव म्हणू नका, मी माणूस आहे. मी चुका करतो पण देव चुका करत नाही.” हर्षा भोगले एकदा म्हणाले होते. सचिन चांगला खेळाला की भारत चांगला झोपतो.
सचिनने अगणित विक्रम केले पण कधी हुरळून गेला नाही. आज क्रिकेट मधला जवळजवळ प्रत्येक विक्रम त्याच्या नावावर आहे पण अजूनही तो विनम्र आहे.
असं बोलतात की क्रिकेट हा “GENTLEMAN” चा खेळ आहे आणि हे सचिनने त्याच्या खेळातून आणि कृतीतून यथार्थ दाखवून दिलं. 24 वर्षांची इतकी मोठी कारकीर्द आणि सचिन कोणत्याच विवादात नाव नाही. असे बोलतात की क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलियन कोणाचा रिस्पेक्ट करत नाहीत पण त्यांना पण सचिनने रिस्पेक्ट करायला शिकवलं.
120 करोड लोकांच्या स्वप्नांचे ओझे 24 वर्ष हा अवलिया आपल्या खांद्यावर पेलत राहिला. त्याचा कारकिर्दीत ज्या ज्या वेळेस भारतीय टीम संकटात होती तो वन मॅन आर्मी सारखा उभा होता. प्रसिद्धीच्या अतिउच्य शिखरावर असताना पण ज्याला कधी गर्व झाला नाही असा हा सचिन. सचिन फक्त क्रिकेट खेळाला नाही तर त्यांनी क्रिकेट खेळणारी पुढची पिढी पण तयार केली.
असा हा ‘एकमेवाद्वितीय सचिन’. लाखो भारतीय ज्याला देव मानतात हाच तो सचिन.
शेवटी याच्या विषयी इतकंच बोलतो “झालेत बहू होतीलही बहू परंतु यासम हाच”.
-अक्षय जाधव
कडूस राजगुरूनगर.
मित्रांनो तुम्हाला माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर यांची माहिती निबंध भाषण मराठी मध्ये pdf. Sachin Tendulkar Cricket Player full Information Mahiti Biography in Marathi language .
ही माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. त्याचबरोबर College Catta या वेबसाईटला, याच प्रकारची महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी पुन्हा भेट द्या कारण College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Read More Sachin Tendulkar Cricket Player Information Mahiti Biography Marathi language
सचिन तेंडूलकर यांचावर वाचनीय पुस्तके
माहितीपूर्ण लेख
छानच👍
Super nice lekha…
खुपच
न
Very nice