Sabudana making process in Marathi
उपवासाला खाल्ला जाणार साबुदाणा कसा बनतो?
साबुदाणा कसा बनतो हे बऱ्याच लोकांना माहित नही. शाबुदान हे मांसाहारी आहे का शाकाहारी? याबद्दल देखील बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत. आपण सर्व उपवासाला आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या शाबूदाणा खिचडी बद्दल जाणुन घेऊयात काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या आवडत्या कॉलेज कट्टा वर college Catta. साबुदाणा कसा तयार होतो किंवा बनतो.
sabudana tree सॅगो पाम sago. टॅपिओका.
हा एक प्रकारच कंद आहे. साबुदाणाचे कंद मुळात दक्षिण अमेरिका येथले आहे. पोर्तुगाल व्यापाऱ्यांनी ते आफ्रिकेत आणले आणि तेथून त्यांनी १९०० शतकात भारतात आणले. साबुदाण्याचे कंद टॅपिओकाची भारतात मुख्यतः तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश येथे शेती केली जाते. त्याची लागवडी साठी हलकी भुसभुशीत मुरमाड जमीन योग्य आहे.
या कंदाच्या टरफाल्या मध्ये हलक्या प्रमाणात सायनोजानिक ग्लायकोसाईड विषारी रसायन असतं. जमिनीतून काढल्यानंतर लगेचच त्याच्यावर उत्पादन प्रक्रिया सुरु करावी लागते. नाहीतर ती कंदमूळ खराब होतात. साबुदाणा कंदच पिक येण्यासाठी ९ ते १० महिने लागतात.
ही कंदमुळे पाण्यात उकळून त्याचं टरफल काढून टाकलं जात व त्याचे छोटे तुकडे केले जातात. हे तुकडे उन्हामध्ये सुकवतात व स्टोर केले जातात. दक्षिणेकडील राज्यामध्ये हे तुकडे विक्री साठी उपलब्ध असतात.
तामिळनाडू मधील सेलम शहरामध्ये कंदापासून स्टार्च बनवण्याच्या कंपन्या सुरु झाल्या. यामध्ये टरफल काढलेलं कंद उन्हात वळवून या कंदांचा रस काढून त्याच्यापासून स्टार्च बनवलं जातं. पुढे या उद्योगामध्ये प्रगती होऊन त्याच्यापासून स्टार्चच्या छोट्या गोळ्या बनवण्यात यश मिळाल आज त्यालाच आपण साबुदाणा म्हणतो. सेलम शहरात जशी जशी मागणी वाढत होती तसतसे तेथे साबुदाणा शेतीला व उद्योगाला चालना मिळाली.
Sabudana making process in Marathi. sabudana production method. भरतात साबुदाणा बनवण्याची पद्धत.
- शेतातून आणलेल्या कंदांना पाण्यात उकळूले जाते.
- धुतलेल्या कंदांचे ६ते ८ इंच तुकडे केले जातात.
- पिलिंग मशीनचा वापर करून त्याचं टरफल काढतात.
- या तुकड्यांना कृशिंग मशीनने पाण्यासोबत क्रश केले जाते. हे द्रव दुधासारखं दिसतं.
- याला द्रव्याला पुन्हा फिल्टर करून त्यातले तंतुमय पदार्थ वेगळे काढले जातात त्याचा पशु खाद्यासाठी उपयोग होतो.
- फिल्टर केलेलं द्रव स्थिर ठेऊन त्यातलं पाणी काढाल जात व उरलेला पांढरा पदार्थ pressure वापरून सुकवला जातो
- याच पांढऱ्या भुकटी पासून मशीन मध्ये गोल गोल दाणे बनवले जातात.
- हे साबुदाण्याचे दाणे गरम भट्टीच्या तव्यावर थोडस नारळ तेलं टाकून भाजले जातात किंवा काही कारखान्यामध्ये रोस्टर ड्रायर ने सुकवले जातात.
- नायालन साबुदाणा कच्च्या दाण्यांना मेटल च्या भांड्यामध्ये वाफेवर शिजवले जातात नंतर हवेने थंड केले जातात.
पुन्हा हा साबुदाणा उन्हात वळवला जातो. अश्याप्रकार साबुदाणा बनवला जोतो आणि तो पूर्णपणे शाकाहारी आहे. साबुदाणा कसा तयार होतो किंवा बनतो या तुमचा प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.
Leave a Reply