
ऋषी कपूर स्वेटर दिखाइए”
कारण जगात त्यांची “स्वेटरमॅन” म्हणून सुद्दा ओळख आहे ,
मी जी आठवण { अनुभव } तुम्हाला सांगतोय,
तसा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल .
तर हिवाळा सुरु झाला कि स्वेटरच्या दुकानांमध्ये गर्दी व्हायची .
वडिलांसोबत आम्ही सुद्दा स्वेटर घ्यायला जायचो ..
नवीन स्वेटर घ्यायचा आनंद प्रत्येकाला च असतो .
तसाच आनंद आम्हाला सुद्धा होता ..
स्वेटर च्या दुकानात आल्यावर खूप गर्दी असायची ..
कारण सुद्दा तसेच होते .
आज जसे आपल्या कडे स्वेटर खरेदीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत, तेव्हा तसे पर्याय उपलब्ध नव्हते .
तालुक्याच्या ठिकाणी जास्ती जास्त,
५ ते ६ दुकानात स्वेटर उपलब्ध असायचे ,
त्यात सुद्दा अमुक दुकानात च भारी आणि नवीन माल असायचा ,
म्हणून त्याच दुकानात खूप गर्दी असायची ,
त्या गर्दीत आम्ही आल्यावर वेगवेगळे स्वेटर बघायचो ..
आणि त्या गर्दीतून खूप वेळा एक वाक्य बऱ्याच लोंकाच्या तोंडून ऐकायचो ते वाक्य होतं ..
“ऋषी कपूर स्वेटर दाखवा” … “ऋषी कपूर स्वेटर दिखाइए”
मग काय माझा सुद्दा तोच हट्ट ..
मला सुद्दा ऋषी कपूर स्वेटर घ्यायचं आहे ..
गरजेच्या वस्तूला एका अभिनेत्याचं नाव दिलं गेलं ,
ओळख दिली गेली,
हि त्या अभिनेत्याच्या अभिनय क्षमतेची आणि लोकप्रियतेची पावती आहे,
ऋषी कपूर … त्यांनी जरी त्यांच्या अभिनयाने रोमान्स आपल्याला शिकवला तरी त्यांच्या मनात हि खंत नेहमीच होती …
त्यांनी एका मुलाखतीत त्यांची खंत व्यक्त केली होती …
“एक अभिनेता म्हणून माझं कधीच कौतुक झालं नाही,
याला जबाबदार मी स्वतःलाच मानतो कारण
प्रेक्षक आणि समीक्षकांसमोर कोणतीही नवी गोष्ट आपण केली नाही, मी अभिनेत्रीसोबत रोमान्स करायचो. झाडांच्या आजूबाजूला नाचत होतो.
उटी, काश्मीर आणि स्वित्झर्लंडमध्ये गाणी गात होतो.
सगळ्या जगात माझं नाव स्वेटरमॅन पडलं होतं.
मला कधीच वेगळ्या भूमिका दिल्या गेल्या नाहीत.
त्याच वेळी माझ्या समकालीन अभिनेत्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याची संधी मिळत होती. “
पण जेव्हा ऋषी कपूर यांनी अभिनयाची सेकंड इनिंग सुरु केली ,
तेव्हा त्यांच्यातला तो अभिनेता बघायला मिळाला ,
जो एकाच पठडीतल्या “ट्रेंड” मुळे अडकला होता ,
अभिनयाची कसर सेकंड इनिंग मध्ये ते भरून काढत होते ..
Manto , Mulk , 102 Not Out , D Day , Patiala House ,
Do Dooni chaar , Agneepath
या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची तिव्रता बघायला मिळाली ..
ह्या सोबतच ऋषी कपूर अगदी स्पष्ट आणि सत्य बोलत होते ..
ते बीबीसीच्या एका मुलाखतीत म्हणाले होते
“बॉडी बिल्डिंगचा अभिनयाशी काय संबंध आहे?
घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा अभिनयाशी काय संबंध आहे?
शरिरातले स्नायू बळकट बनवण्याआधी चेहऱ्यावरचे हावभाव तरी शिकून घ्या. अभिनय शिका. सध्याच्या काळात चांगला अभिनय करू शकणारे अभिनेतेच टिकू शकतात.
इतर कामात कितीही पारंगत असले तरी अभिनयाचा दर्जा साधारण असलेले कलाकार इथं काम करू शकणार नाहीत.
त्यांची इतक्या वर्षांची अभिनयाची तीव्रता ,
आता कुठे सुरु झाली होती … पण …
“७० mm कें महफ़िल सें रुसवा कर गये आप हमें”
भावपूर्ण आदरांजली ऋषीजी !
लेखक : हेमंत गवळे (यु ट्युबर)
Naughty Vision Unlimited
-कॉलज कट्टा
Leave a Reply