Reshim Udyog Mahiti in Marathi Reshim Udyog Project Marathi Silkworm Farming in Maharashtra
रेशीम शेती करून तुम्ही महिना एक लाख कमऊ शकता फक्त एक एकर जमिनीमध्ये ! विश्वास बसत नसेल तर ही माहिती वाचा रेशीम शेती कशा प्रकारे करावी? शेड कशा पद्धतीचे असावे? रेशीम आळी कुठून आणावी रेशीम शेती करण्यासाठी शासनाचे अनुदान कसे मिळवावे योजना कोणती आहे तुमचा सगळ्या प्रश्नांची उत्तरे Reshim Udyog Mahiti in Marathi या लेखात मिळतील.
रेशीम उद्योग धंद्यातील यशाची सूत्रे रेशीम शेती कशी करावी रेशीम उद्योग माहिती मराठी रेशीम शेती कशी करावी
Reshim Udyog Mahiti in Marathi Reshim Udyog Project Marathi Silkworm Farming in Maharashtra
रेशीम उद्योग हा खूप मोठे आर्थिक उलाढाल असलेला उद्योग आहे. रेशीम धागा हा खूप महाग असतो. महाराष्ट्र सरकारचे रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न चालूच आहेत. जागोजागी रेशीम उद्योग केंद सरकारने उभारले आहेत. तेथून मार्गदर्शन, रेशीम आळ्यांची अंडी पुंजी तसेच औषधे लागणारे साहित्य तुम्ही खरेदी करू शकता.
रेशीम शेती अनुदान रेशीम उद्योग अनुदान रेशीम शेती योजना
यासाठी तुम्हाला तुमचा भागातील रेशीम उद्योग संचालनालय मध्ये संपर्क करून रेशीम शेतीसाठी नोदणी करावी लागेल. नोदणी केल्यानंतरच तुम्हाला रेशीम शेती अनुदान, सवलती व सुविधा दिल्या जातील.
तुतीची लागवड पद्धत तुती लागवड माहिती
तुती ही एक रानटी वनस्पती आहे. तिचा पानाचा आकार मोठा असून पुढे अरुंद आहे. तुती हे रेशीम किटकाचे खाद्य आहे.
- तुती लागवडीला कसदार जमीन लागते. तुती लागवड करताना दोन सरीचा मधील अंतर 4 ते 5 फूट ठेवावे आणि ओळीमधील दोन झाडांमध्ये 3 फुटांचे अंतर ठेवावे म्हणजे तुती पोसेल तिची वाढ उत्तम प्रकारे होईल.
- तुती ही रानाटी वनस्पती असल्याने तिला पाणी कमी लागते एक एकर उसाला जेवढे पाणी लागते तेवढ्या पाण्यात तीन एकर तुती तुम्ही आरामात जगवू शकता.
- पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन किंवा पारंपारिक पाटाने पाणी देऊ शकता.
- तुती लागवडी पासून 45 दिवसात तुती कापणीला येऊन आडिच ते तीन महिन्यात तुम्ही उत्पन्न मिळऊ शकता.
- एकदा लावलेली तुती तुम्ही 15 वर्षांपर्यंत आरामात जगवू शकता तुम्हाला पुन्हा तुती लावण्याची गरज नाही.
- एका एकरमध्ये तुम्ही 200 किलो रेशीम उत्पादन मिळऊ शकता.
ही तुती लागवड माहिती तुती लागवड अशा प्रकारे करावी.
रेशीम शेतीसाठी शेड कशाप्रकारचे असावे ? Reshim Udyog Shed
- शेडचा आकार 65 फूट लांब आणि 34 रुंद एक एकर तुतीसाठी.
- रेशीम शेतीसाठी शेडची गरज लागते, शेड बांधण्यासाठी शासन अनुदान ही देते.
- शेड बांधताना ते स्वच्छ करण्यास सोपे राहील अशा पद्धतीने शेड बांधा.
- अळ्यांना वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी स्वच्छतेला खूप महत्व आहे.
- आळी शेडमध्ये आनण्यापूर्वी ते रेशीम कोश विकल्यानंतर संपर्ण शेड तसेच आळी ठेवण्यासाठी केलेले रँक लोखंडी असो किंवा बांबूचे निर्जंतुक करून घ्या.
- शेड अशा पद्धतीने बांधा जेणेकरून तिथे इतर प्राणी किंवा कीटकांना शिरकाव करता येणार नाही म्हणजे ते आळीला खाणार नाहीत.
- मुंग्यापासून संरक्षणासाठी साधा उपाय म्हणजे रँकचे पाय वाटी, प्लेट मध्ये ठेवून त्यात पाणी ओतावे जेणेकरून मुंग्या वर चढणार नाहीत.
- शेडचा आसपासचा परिसर स्वच्छ असावा जेणेकरून तेथून रोगजंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही.
- चंद्रिका जाळी जिच्यावर आळी सोडली जाते ती देखील सुरवातीला आणि शेवटी निर्जंतुक करून घ्यवी.
- शेडमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी त्यांचा हातांद्वारे देखील रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
Reshim Udyog Shed अशा प्रकारे बांधावे.
रेशीम आळीचे संगोपन कशा प्रकारे कराल?
- रेशीम आळीला कमीत कमी 25 डिग्री सॆल्सिअस ते 35 डिग्री सिल्सिअस तापमान लागते. यापेक्षा जास्त किंवा कमी तापमानात त्या जगू शकत नाहीत.
- आठ दिवसांची रेशीम आळी किंवा तुम्ही अंडी रेशीम संचालनायातून विकत घेऊ शकता.
- आळीचा जीवनचक्र 30 दिवसात पूर्ण होते शेवटचे 5-6 दिवस आळी कोश तयार करते.
- आळ्यांना हिरवा तुतीचा पाला खाऊ घालावा सकाळी आणि संध्याकाळी खाऊ घालावा.
- मोल्ड नंतर हिरवा पाला वाढवावा.
- तुतीची पिवळी पाने खाऊ घालू नयेत यामुळे रेशीमचा दर्जा कमी होतो पर्यायाने उत्पन्न कमी होते.
- आळीने धागा बलावायला सुरवात केली कि तिला पाला टाकणे बंद करून रँकवर चंद्रिका हातरा जेणेकरून आळ्या कोश चंद्रिकेवर येऊन बनवतील.
- एक एकर तुतीची लागवड करून तुम्ही वर्षभरात 4 ते 5 वेळेस रेशीम कोश तयार करू शकता.
- एका एकरातील तुतीपासून 200 किलो पर्यंत तुम्ही कोश विकू शकता.
- कमीत कमी दोन एकर तुती लाऊन तुम्ही वर्षभरातून 8 वेळा उत्पन्न मिळवू शकता.
- सध्या बाजारभाव कोशाचा दर्जावर अवलंबून आहे 400 ते 500 रुपये प्रती किलो.
- एका एकरात तुती कापणीला येण्यासाठी 45 दिवस आणि त्यानंतर एक महिना यात 200 किलो कोश, 1 लाख रुपये उत्पन्न तुम्ही अडीच महिन्यात मिळाऊ शकता.
- खर्च 10000 रुपये एका खेपेला.
- हा माल तुम्ही बेंगलोरला रोख विकू शकता.
रेशीम उद्योग हा खर्या अर्थाने शेतकऱ्याला उत्पन्न मिळऊन देणारा उद्योग आहे.
तुम्हाला रेशीम उद्योगाबाबत ही रेशीम उद्योग माहिती मराठी कशी वाटली हे आम्हाला नक्की प्रतिक्रियेद्वारे कळवा. अधिक माहितीसाठी रेशीम शेती योजना, रेशीम संचालनालय क्लिक करा.
मागेल त्याला शेततळे योजना माहिती
Reshim Udyog Mahiti in Marathi Reshim Udyog Project Marathi Reshim Udyog Shed रेशीम शेती व्यवसाय.
Leave a Reply