बिल फोर्ड यांनी रतन टाटांचा अपमान केल्यावर रतन टाटांनी काय केले जाणून घ्या काय किस्सा आहे? भारतीय उद्योजक, दानशूर आणि संयमी व्यक्तिमत्व… रतन टाटा यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती. Ratan Tata information Biography in Marathi Ratan Tata Real life Success Story in Marathi
बिल फोर्ड यांनी रतन टाटांचा अपमान केल्यावर रतन टाटांनी काय केले जाणून घ्या काय किस्सा आहे?
Ratan Tata quotes in Marathi
‘बरोबर निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही… मी घेतलेले निर्णय बरोबर करून दाखवतो…’
-रतन टाटा.
‘I don’t believe in taking Right decision I take decision and make them right’
– Ratan Tata
रतन टाटा यांची माहिती मराठी
रतन टाटा या नावाला कोणत्याच परिचयाची गरज नाही. कोरोना काळात त्यांनी केलेल्या मदतीमुळे तर भारतीयांच्या मनात त्यांच्या विषयी आदर अजुनच वाढला आहे. उद्योग जगतातील संत म्हणून त्यांना संबोधले तरी माझ्या दृष्टिने त्यात काहीच वावगं नाही कारण त्यांच कर्तुत्व त्याच उंचीच आहे आणि त्यांनी आपल्या कृतितुन हे सिद्ध देखील केलं आहे.
तसं टाटा हे नाव खुप विश्वासाचे आहे. पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती.
Ratan Tata Family information Biography in Marathi
जमशेदजी आणि दोराबजी पासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत साऱ्यांच्या कर्तबगारीने सतत चढत रहिलेल उद्यगतोरण म्हणजेच ‘टाटायन‘.
रतन टाटा यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी बॉम्बे, म्हणजे मुंबई येथे झाला होता. आणि ते नवल टाटा यांचा मुलगा आहे. रतन टाटा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले, हे खरे असले, तरीही त्यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले.
अवघ्या १० वर्षांचे वय असताना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला. त्यांची पहिली भाषा गुजराती आहे. त्यांनी ८ वी पर्यंत चॅम्पियन स्कूलमध्ये शिक्षण घेतले, त्यानंतर कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि शिमला येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. आणि १९५५ मध्ये न्यूयॉर्क शहरातील रिव्हरडेल कंट्री स्कूलमधून पदवी घेतली.
Ratan Tata Real life Success Story in Marathi
आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे,या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या १० वर्षांच्या मुक्कामामध्ये होटेलमध्ये भांडी घासन्यापासुन ते कारकुणाच्या नोकरीपर्यंत सर्व कामे केली. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मैनेजमेंटची पदविही घेतली. याच काळात टाटा समुहाचे तत्कालीन प्रमुख जे.आर.डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. टाटा समुहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो हे पाहून जे.आर.डी.टाटा प्रभावित झाले. आजिची तब्येत बिघडल्यामुळे भारतात आलेल्या रतन यांना जे.आर.डी यांनी टाटा उद्योग समुहामध्ये येन्याचे निमंत्रण दिले. १९६२ च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समुहात दाखल झाले. मात्र समुहाच्या परंपरेनुसार १९६२-१९७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करन्यास सांगितले. जमशेदपुरच्या टाटा स्टील मध्ये अगदी कोळसा उचलन्यापासुन ते भट्टीपाशी काम करन्यापर्यंचते सर्व अनुभवातुन त्यांना जावे लागले. अस म्हणतात की सोन तापल्यावर निखरत हेच रतन टाटा यांच्या बाबतीत झाले.
१९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समुहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविन्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रतन यांनी असे सुचविले की कंपनीला उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स ऐवजी उच्च तंत्रज्ञान उत्पादनांच्या विकासात गुंतवणूक करावी.१९७२ ते १९७५ पर्यंत, नेल्कोने शेवटी बाजाराचा हिस्सा 20% पर्यंत वाढविला आणि त्याचा तोटा देखील वसूल केला. परंतु १९७५ मध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आणि त्यामुळे आर्थिक मंदी झाली. यातच नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली. रतन टाटा यांच्या वाट्याला आलेले ते पहिले अपयश होते. १९७७ मध्ये त्यांच्यावर एम्प्रेस मिल या बंद पड़ावयास आलेल्या मिलची जबाबदारी देण्यात आली. मिलच्या यंत्रसमग्रीमध्ये बऱ्याच वर्षांपासून गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगरांची संख्याही मोठी होती. आणि उत्पादनही कमी होते. या मिलमध्ये ५० लाख रूपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्दोगसमुहला केली. पण नानी पालखीवाला,अजित केरकर, आणि रूसी मोदी या संचालकांनी याला विरोध केला. तेव्हा ही मिलही बंद करण्यात आली. हे रतन टाटा यांच्या नशीबी आलेले दूसरे अपयश. पण या अपयशामुळे टाटा अनुभवाच्या शाळेत बरेच काही शिकले होते.
रतन यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टाटा मोटर्सची न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंद झाली. १९९८ मध्ये टाटा मोटर्सने टाटा इंडिकाला बाजार मध्ये आणले. १९८१ मध्ये, रतन यांना टाटा इंडस्ट्रीज आणि या समूहाच्या इतर धारक कंपन्यांचे अध्यक्ष बनविण्यात आले. उच्च तंत्रज्ञानाच्या व्यवसायात नवीन उद्योजकाचे प्रवर्तक म्हणून ते जबाबदार होते.
यांनतर रतन हेच टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख होणार हे स्पष्ट झाले.
- पुढे १९९१ जे.आर.डी यांनी स्वतःच उद्दोगसमुहाची सर्व सुत्रे रतन टाटा यांच्याकडे सोपवून निवृत्ती घेतली. त्यांनातर सुरु झालेली यशाची मालिका यामुळे त्यांनी अनेक विक्रम रचले.
- लैंड रोव्हर, जग्वार, यासारख्या जगातील अनेक नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या.
- भरारीने देशातील तरुणांना नवी ऊर्जा दिली. मोठी स्वप्न पाहण आणि ती स्वप्न सत्यात उतरवणे हा टाटांचा स्वाभावच.
- यातील १ स्वप्न म्हणजे१००००० किमतीची सर्वसमान्यांसाठी कार ती म्हणजे नॅनो. १० जानेवारी २००७ रोजी नवी दिल्लीतील ऑटो एक्सपोमध्ये या कारचे उद्घाटन करून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. टाटा नॅनोच्या तीन मॉडेल्सची घोषणा करण्यात आली आणि रतन टाटाने कारला केवळ 1 लाख रुपये बाजारभाव देण्याचे आश्वासन पूर्ण केले, तसेच या किंमतीला कार उपलब्ध करुन देण्याच्या आपल्या आश्वासनाचा हवाला देत ते म्हणाले, “वचन म्हणजे वचन दिले आहे”.
बिल फोर्ड यांनी रतन टाटांचा केला अपमान काय किस्सा आहे?
गोष्ट आहे १९९९ मधली आहे. इंडिका लाँच होऊन केवळ एकच वर्ष झाले होते. रतन टाटा हे फोर्डचे मुख्यालय डेट्रॉईटला गेले होते हे सांगण्यासाठी की टाटा मोटर्सचेला तुम्ही विकत घ्या. त्या दिवशी बिल फोर्डने यांनी त्याचा भरपूर अपमान केला होता. त्या दिवशी ते म्हणाले की तुमचे टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनाची खरेदी करुन मी तुमच्यावर उपकार करीत आहे. टाटा यांना बरेच सुनवण्यात आले की, एखादी गाडी तयार करणे शक्य नसताना तुम्ही या व्यवसायात का आलात? त्यावेळी रतन टाटा यांना खूप वाईट वाटले. त्याच रात्री, ते संपूर्ण टीमसह डेट्रॉईटवरून मुंबईला परतले. ते हट्टी स्वभावाचे होते. टाटा मोटर्सवर वर स्वतंत्र वेळ दिला. काही दिवसांनंतर टाटा मोटर्सने चांगली सुरुवात केली, परंतु बिल फोर्डची कंपनी कर्जात बुडाली. २oo९ साली फोर्ड कंपनी डुबण्याच्या काठावर आली तेव्हा टाटा समूहाने त्यांना एक प्रस्ताव पाठवला की आम्ही तुम्हाला खरेदी करतो. अगदी त्याचप्रमाणे, फोर्डची संपूर्ण टीम डेट्रॉइटहून मुंबईला आली आणि म्हणाली, “आपण आमच्या जैगुआर लैंडरोवर खरेदी करून आमच्यावर उपकार करीत आहात.” रतन टाटा यांनी जैगुआर लैंडरोवरला ९६oo कोटी रूपयांत विकत घेतली.
रतन टाटा यांनी टाटा समुहात न घडणारी अशी एक महत्वाची गोष्ट केली. आणि ती म्हणजे पारसी धर्मात न जन्मलेल्या अशा काही गुणी लोकांना त्यांनी बॉम्बे हाउस मध्ये अत्युच्य पदांवर बसवले. जे.आर.डी. टाटांच्या अती सज्जनपणाचा फायदा घेत वर्षानुवर्षे कंपनी आपली जहांगीरी बनवून आपल्याच सग्यासोयऱ्यांबरोबर मनमानी करणारे कितीही वय झाले तरी निवृत्ती न घेणारे टाटा समुहातील मठाधिपति त्यांनी घरी पाठविले. निवृत्तीचे वय ७५ वर्षे करण्यात आले. त्यांनी टाटा समुहामध्ये नवीन रक्त आणले आणि लंगडणाऱ्या कंपन्या धावू लागल्या. त्यांनी आपणच केलेला नियम काटेकोरपणे पाळला. त्यांनी स्वतः वयाच्या ७५ व्यावर्षी निवृत्ती घेतली.
रतन टाटा यांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळेच सचोटी आणि गुणवत्ता म्हणजे टाटा हे समिकरणच निर्माण झाले.
२oo८ मध्ये २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात हॉटेलमध्ये जखमी झालेल्या सर्वांचे उपचार टाटा यांनीच केले होते. हॉटेलच्या शेजारी असलेल्या दुकानांत जखमी झालेल्या सर्व लोकांना टाटा यांनी मदत केली होती. जोपर्यंत हॉटेल बंद होते तोपर्यंत कर्मचार्यांना त्या दिवसासांचे पूर्ण वेतन दिले जात असे. मुंबईच्या ताज हॉटेलचे बांधकाम जमशेदजी टाटा यांनी केले, ज्यांनी टाटा कंपनीची स्थापना केली होती. हे हॉटेल १९o३ मध्ये ४ कोटी २१ लाख रुपयांच्या बजेट मध्ये बांधले गेले होते.
रतन टाटा हे भारताचे किंवा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती का नाहीत? हाच प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. उत्तर असे की, ते एक उद्योजक आहेत आणि अंबानी कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर हा एका कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि टाटा सन्स हे टाटा ट्रस्टद्वारा चालवले जाते. ट्रस्टमधे कोणत्याही एका माणसाचा हिस्सा नाही हे सर्वजण जाणून आहेत. ६६% टाटाची मिळकत ही ट्रस्टमधे जाते. रतन टाटाच्या सेवानिवृत्तीनंतर टाटा सन्सच्या नव्या चेअरमनची नेमणूक करावी, असा निर्णय घेण्यात आला होता. तर अंबानीला आपले व्यवसाय अधिकार आहेत, त्यांचा व्यवसाय ते आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातात सोपवू शकतात. आणि म्हणूनच रतन टाटा सर्वात श्रीमंत नाही.
यामुळेच वर त्यांचा उल्लेख उद्योग जगतातील संत असा केला आहे.
अक्षय जाधव कडूस राजगुरुनगर
Ratan Tata information Biography in Marathi
Ratan Tata Real life Success Story in Marathi
Ratan Tata Family information Biography in Marathi
रतन टाटा यांची माहिती मराठी Ratan Tata quotes in Marathi
Motivational Inspirational Success stories in Marathi Best Motivational Inspirational Short story in Marathi
I don’t believe in taking Right decision I take decision and make them right- Ratan Tata
रतन टाटा यांच्याबद्दल ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply