
रामकृष्ण परमहंस भारतातील एक महान संत, अध्यात्मिक गुरु व विचारवंत होते. त्यांनी सर्व धर्मांच्या एकतेवर जोर दिला होता. लहानपणापासून त्यांचा असा विश्वास होता की देवाचे दर्शन घेता येते, त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम आणि भक्तीचे आयुष्य व्यतीत केले. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदाचे प्रमुख गुरु देखील होते.
तर चला मग जाणून घेऊया रामकृष्ण परमहंसांच्या जीवनावर आधारित चरित्र.
Ramkrishna Paramhans Information Biography in Marathi Language
जन्म
रामकृष्ण परमहंसांचा जन्म १८ फेब्रुवारी १८३६ रोजी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील कामरपुकूर ग्रामी झाला. त्यांच्या बालपणीचे नाव ‘गदाधर’ असे होते. वडिलांचे नाव खुदिराम तसेच आईचे नाव चंद्रादेवी असे होते. परमहंसांच्या भक्तांनुसार, रामकृष्णांच्या आई-वडिलांनी त्यांच्या जन्मापूर्वीच अलौकिक घटना आणि देखावे अनुभवले होते. ‘गया’ मध्ये असतांना त्यांच्या वडिलांच्या स्वप्नात भगवान गदाधर हे स्वतः आले आणि त्यांनी सांगितले होते की ते त्यांचे पुत्र म्हणून जन्म घेतील.
परिवार
वयाच्या सातव्या वर्षी परमहंसांच्या डोक्यावरून वडिलांची छाया उठून गेली. अश्या प्रतिकूल परिस्थितीत संपूर्ण कुटुंब सांभाळणे कठीण झाले व आर्थिक अडचणी डोळ्यासमोर येऊ लागल्या. त्यांचे मोठे बंधू रामकुमार चट्टोपाध्याय कलकत्ता मधील एका शाळेचे संचालक होते. ते गदाधर यांना आपल्या सोबत कलकत्ताला घेऊन आले. रामकृष्ण हे अत्यंत निरागस आणि सभ्य अंतरंगाचे होते व सतत आपल्या कामात ते मग्न असे.
दक्षिणेश्वर येथे आगमन
सतत प्रयत्न करूनही रामकृष्ण यांचे मन अभ्यास आणि अध्यापनात गुंतू शकले नसे. त्यांचे मोठे बंधू रामकुमार १८५५ मध्ये दक्षिणेश्वर काली (राणी रसमनी यांच्या द्वारे बांधले गेलेल्या) मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून नियुक्त करण्यात आले. रामकृष्ण आणि त्यांचा भाचा मिळून रामकुमार यांना मंदिरात मदत करू लागले. रामकृष्ण यांना काली मंदिरात देवीचा पुतळा सजवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. १८५६ मध्ये रामकुमार यांच्या मृत्यूनंतर रामकृष्ण यांना काली मंदिराचे पुजारी म्हणून नेमले गेले.
रामकुमार यांच्या निधनानंतर रामकृष्ण परमहंस हे अधिक ध्यानधारीत झाले. त्यांना दक्षिणेश्वर काली मंदिरातील मातेची मूर्ती आपली आई आणि ब्रह्मांडाची आई म्हणून दिसू लागली. असं म्हटलं जातं की रामकृष्ण यांना काली मातेचे दर्शन ब्रह्मांडाची आईच्या रूपात झाले होते.
विवाह
दक्षिणेश्वरमधील अध्यात्मिक अभ्यासामुळे रामकृष्णांचा मानसिक संतुलन बिघडले असल्याची अफवा पसरू लागली. रामकृष्ण यांची आई आणि त्यांचे मोठे बंधू रामेश्वर यांनी त्यांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. रामकृष्णांची आई आणि मोठे भाऊ रामेश्वर यांचा असा विश्वास होता की रामकृष्णाचे लग्न झाल्यावर त्यांचे मानसिक संतुलन सुधारले जाईल तसेच लग्नानंतर ते आपल्या जबाबदाऱ्यांमुळे आपले लक्ष अध्यात्मिक अभ्यासाकडे वळतील. १८५९ मध्ये २३ वर्षांच्या परमहंसांचे लग्न ५ वर्षाच्या शारदमणी मुखोपाध्याय सोबत संपन्न झाले. लग्नानंतर शारदामणी जयरामबाटी मध्ये राहत होत्या व १८ वर्षांच्या झाल्यानंतर त्या रामकृष्णांसोबत दक्षिणेश्वर मध्ये राहू लागल्या.
साधना
कालांतराने परमहंसांचे मोठे बंधू रामेश्वर यांचे देखील निधन झाले. या घटनेनंतर रामकृष्ण अत्यंत दुःखी झाले. जगातील नित्यता पाहून त्यांनी मनामध्ये मोह उमटविला. त्यानंतर स्वताहून रामकृष्णांनी मंदिराची पूजा आणि प्रार्थना करण्यास सुरुवात केली. दक्षिणेश्वरमधील पंचवटीमध्ये त्यांनी ध्यानधारणा सुरु केली. देवाला पाहण्यासाठी ते विचलित झाले आणि त्यांचे हे कर्म पाहून लोकं त्यांना मूर्ख समजू लागले.
त्यानंतर भैरवी ब्राह्मणी दक्षिणेश्वर मध्ये दाखल झाले व त्यांनी रामकृष्णांना तंत्र शिकवले. तोतापुरी महाराजांकडून त्यांनी अद्वैत वेदांत ज्ञान प्राप्त केले. सेवानिवृत्तीनंतर त्यांचे नाव गदाधर पासून श्री रामकृष्ण परमहंस ठेवले गेले. इतकंच नव्हे तर रामकृष्णांनी हिंदू धर्मासोबतच इस्लाम तसेच ख्रिश्चन धर्मही पाळला होता.
मृत्यू
इसवीसण १८८६ मध्ये श्रवणी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे प्रतिपदेवर आपला प्राण सोडला. १६ ऑगस्टच्या पहाटे आनंदघन विग्रह रामकृष्ण यांनी या नश्वर देहाचा त्याग केला.
-नीरज भावसर.
मित्रांनो, Ramkrishna Paramhans Information Biography in Marathi Language तुम्हाला कशी वाटली हे खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या College Catta संकेतस्थळावर पुन्हा आवश्य भेट द्या. कारण ‘College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ’ जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सहज सोप्या भाषेत सादर केली जाते.
रामकृष्ण परमहंस मराठी माहिती रामकृष्ण परमहंस यांचे विचार रामकृष्ण परमहंस निबंध भाषण
Leave a Reply