आज प्रत्येक भारतीय घरात देवी देवतांची चित्रे आहेत. यांचे चित्रकार राजा रवी वर्मा कोण आहेत जाणून घ्या
Raja Ravi Varma information Biography in Marathi
राजा रवि वर्मा यांची माहिती मराठी
राजा रवि वर्मा
सर्व हिंदू देवतांना आपल्या अपूर्व प्रतिभेने मानवी रूपात साकारणारे चित्रकार म्हणजे राजा रवि वर्मा.
अस म्हणतात कोणत्याही व्यक्तिची ओळख ही त्यांनी जगाला दिलेल्या मुल्यांवर किंवा जगाला दिलेल्या वर्षावर अवलंबून असते. सामान्य माणसांना अस वाटल की समोरची व्यक्ति आपल्याशी जोडली गेली नसती तर आपल आयुष्य जरा कमी चांगल असत, तर समजून चला कि ती कोणी साधिसुधी व्यक्ति नाही तीच समाजात काही वेगळे स्थान आहे. राजा रवि वर्मा त्यातीलच एक व्यक्ती. नावात जरी राजा असल तरी त्यांच्याकडे ना कोणते राज्य होते न कोणती जमीन. रवि वर्मा यांना ही पदवी तत्कालीन व्हाइसरॉय यांनी त्यांची प्रतिभा वाढविन्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दिली होती.
चित्रकला सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याची प्रबळ इच्छा असलेले आणि म्हणूनच स्वतःची लिथोप्रेस सुरू करणारे राजा रवि वर्मा यांचा जन्म केरळमधील किलीमोनुर नामक गावात २९ एप्रिल १८४८ मध्ये झाला. त्यांचे काका तंजावर शैलीचे चित्रकार, आई उमा अंबाबाई तंपुराटटी एक सिद्ध कवयित्री होती, तर वडील एजिमाविल भट्टतिरिप्पाट हे संस्कृतचे विद्वान होते.रवि वर्मा ६ वर्षांचे असतानाच त्यांनी घराच्या भिंतींवर जंगली प्राणी, विशेषतः हत्ती व इतर लहान लहान चित्रं रेखाटली होती. ते रेखाटन कौशल्य आणि सहजता पाहूनच त्यांच्या चित्रकार काकाने स्वतःला अवगत असलेली चित्रकलेची तंत्र आणि सिद्धांत त्यांना शिकविले. याच काकांचे राजवाड्यात येणे-जाणे असल्यामुळे रवि वर्मा ९ वर्षांचे असताना ते त्यांना राजवाड्यात घेऊन गेले. तेव्हा त्यावेळचे महाराज आयील्यम तिरुनाल या छोट्या चित्रकाराच्या कलेने प्रभावित झाले आणि त्यांनी रवि वर्मा यांना राजमहालात राहण्याचे आदेश दिले.
Raja Ravi Varma information Biography in Marathi
राजा रवि वर्मा यांची माहिती मराठी
त्यावेळी राजचित्रकार रामस्वामी नाईकर यांचा पाश्चात्य चित्रशैलीत हातखंडा होता. तसेच डच भित्तीचित्रकार थिओडोर जॉन्सन हेही त्रिवेंद्रमला भेटी देत असत. या दोघांच्या संपर्कामुळे आपण चित्रकारच व्हायचे, असे रवि वर्मा यांनी निश्चित केले. राजमहालातील तेव्हाच्या ९ वर्षांच्या कालावधीत रवी वर्मा यांनी अनेक अपरिचित रंग-तंत्रात प्रयोग केले, रंग मिश्रणातील कौशल्य आत्मसात केले. निसर्ग दृश्ये, मानवाकृतीचा तपशीलवार अभ्यास केला. त्याकरिता त्रावणकोरच्या राजाने आपल्या संग्रहातील युरोपीयन कलाकारांच्या तैलचित्रांचा खजिना त्यांना उपलब्ध करून दिला. १८७० च्या या काळात चित्रकलेला व्यावसायिक दर्जा वा कलाकाराला सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. तरीही याच राजांनी रवी वर्मा यांना चित्रकला हा महत्त्वपूर्ण व्यवसाय असल्याचे सांगून त्यांना प्रोत्साहित केले.
त्यावेळी इंटरनेट, सोशल मीडिया नव्हतं तरीही घराघरातील प्रत्येक व्यक्ति त्यांना ओळखत होती. एकीकडे त्यांना अपार लोकप्रियता मिळत होती त्याचबरोबर त्यांना नावे ठेवणाऱ्यांची पण कमी नव्हती. मात्र राजा रवि वर्मा यांची कल्पनाक्षमता या सर्वांच्या पलिकडचि होती. रवि वर्मा यांनी चित्रकलेत असे प्रयोग केले जे त्याआधी कुणीही केले नव्हते. आणि म्हणूनच त्यांची चित्रकारिता त्यांना अनेक नवनव्या उंचीवर घेऊन गेली.
आज घरात देवीदेवतांचे फोटो असण फार कॉमन आहे. मात्र आजपासून तब्बल सव्वाशे वर्ष आधी अशी परिस्थिति नव्हती. तेव्हा केवळ देवळांमधेच देवीदेवतांच्या मूर्ती होत्या. सोबत जात, धर्म अश्या गोष्टिही होत्या. आज आपल्याला जे कैलेंडर, वह्या किंवा पुस्तकांमधे जे देवीदेवतांचे फोटो दिसतात ते राजा रवि वर्मा यांच्यामुळे आणि त्यांच्या कल्पनाक्षमतेमुळे.
खरतर रवि वर्मा यांची ओळख निर्माण झाली ती त्यांच्या प्रसिद्ध तैलरंगाच्या चित्रांमुळे. त्यांचे अनेक नावाजलेले पेन्टिंग्ज हे ऑइल पेंट मध्येच रंगवलेले आहेत. त्याचे कारण म्हणजे एकतर तैल रंगानी चित्राचा रंग उजळून दिसतो आणि अनेक वर्ष अशी चित्रे संभाळून ठेवणे सोप्प होते. त्यांना नावे ठेवनारे देखील त्यांच्या चित्राची तारीफ करत असत. रवि वर्मा यांच्यासारखा चित्रकार देशात झालेला नाही अस त्यांच्याबरोबर बोलल जात.
आपल चित्रकलेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवि वर्मा यांना त्यांच्या चित्रांचा विषय सूचत नव्हता. त्यासाठी त्यांनी भारतभ्रमण केले. अनेक ठिकाणी फिरले आणि भारताचा आत्मा समजून घेण्याचा प्रयत्न केला. खुप फिरल्यानंतर त्यांच्या लक्षात आल की भारताचा आत्मा हा भारतीय महाकाव्य आणि भारतीय ग्रंथ यात आहे. त्यांनी ठरविले की या ग्रंथांमधील चरित्रांवर आधारित आपण पेन्टिंग्ज काढले पाहिजे. रवि वर्मा यांनी अनेक पौराणिक कथांमधील पात्रांना आपल्या चित्रांमधुन क्यानव्हास वर उतरविले. त्यांनी अनेकदा दक्षिण भारतीय सुंदर स्रियांवर हिंदू देविंची चित्रे दर्शविलित.

रवि वर्मा असे चित्रकार होते ज्यांनी पहिल्यांदा हिंदू देवी देवतांना सामान्य माणसांसारखं दर्शविले. आज आपण पोस्टर्स किंवा कैलेंडर्स वर माता सरस्वती, माता लक्ष्मी, दुर्गा माता,राधा कृष्ण यांचे जे फोटो पाहतो ती रवि वर्मा यांचीच कल्पनाक्षमता आहे. ज्या देवी देवतांची आपण पार्थना करतो प्रत्येकाच्या घराघरात जे फोटो आहेत त्यांना कदाचित हे माहित नसेल. त्यांच्या फेमस चित्रांमध्ये देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी यांची चित्रे आहेत. त्यांची अनेक चित्रे आजही बडोद्यातील लक्ष्मी विलास पैलेस मध्ये सुरक्षित आहेत. विचारात मग्न असलेली युवती, दमयंती-हंसा यांच संभाषण,संगीत सभा,अर्जुन आणि सुभद्रा, विरहाने व्याकुळ झालेली युवती, शकुंतला, रावनाद्वारा केला गेलेला जटायुचा वध, इंद्रजीत-विजय, नायर जातीची स्री, द्रौपदी कीचक, राजा शांतनु आणि मत्स्यगंधा, शकुंतला आणि राजा दुष्यंत ही त्यांची काही प्रसिद्ध चित्रे आहेत.
राजा रवि वर्मा यांच्या चित्रांची प्रचंड मागणी होती म्हणून त्यांनी एक प्रेस देखील सुरु केली. १८९४ मध्ये त्यांनी मुंबईत कलर लिथोग्राफिक प्रेस खरेदी करून मुंबईत थाटली आणि आपल्या चित्रांच्या विविध कॉपीज काढून त्यांनी त्यांची विक्री सुरु केली. यापूर्वी कोणत्याही चित्रकाराने अस केलेल नव्हतं. त्यांना या व्यवसायातून फार फायदा झाला नाही. मात्र समाजातील ज्यांना देवळात जाऊ दिले जात नव्हते त्यांच्यापर्यंत ते पोहचलेत. मात्र अनेकांना तेही पचन्यासारख नव्हतं.
राजा रवि वर्मा यांनाही मोठ्या प्रमाणात आलोचना सहन करावी लागली. मकबूल फिदा हुसैन यांनी ज्याप्रमाणे समाजाची आलोचना सहन केली तसेच काहीस राजा रवि वर्मा यांच्यासोबत झाले. अर्थात तो १२५ वर्षे जुना भारत होता. त्यांच्यावर आरोप होते ते उर्वशी, रंभा, यांच्यासारख्या अप्सरांचे अर्धनग्न चित्र रेखाटन्याचे. अनेकांनी याला हिंदू धर्माचा अपमान अस म्हटल. देशात विविध ठिकाणी त्यांच्यावर केसेसही झाल्यात ज्यामध्ये त्यांचे बरेच आर्थिक नुकसानही झाले. सोबतच त्यांना मानसिक त्रासाचाही सामना करावा लागला. अस म्हणतात की मुंबईत असणारी त्यांची प्रेस जाळण्यात आली. त्यात केवळ प्रेसच साहित्य नाही तर अनेक बहुमुल्य चित्र आणि पोट्रेट देखिल भस्मसात जालेली. अनेकजण यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना या व्यवसायात तोटा झाल्याने त्यांनी एका जर्मन चित्रकाराला आपली प्रेस विकल्याचे बोलल जात.
राजा रवि वर्मा यांच्यावर असाही आरोप झाला की देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी यांच्या चित्रातील फोट हे त्यांची प्रेमिका सुगंधाशी मिळते जुळते होते. लोक अस म्हणतात की रवि वर्मा आपल्या चित्रकलेसाठी सुगंधाची मदत घेत. सुगंधा नामक मुलीला कुणा वैश्येची मुलगी मानले गेले. अनेकांनी या विषयावरुन हिंदू धर्माला अपवित्र करण्याचा आरोपही लावला. यावरुनही त्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला.
देवदेवतांना आपल्या सामान्यजनांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवून दिले. इतकेच नाही, तर त्या-त्या देवतेचे तेच रूप अजरामर केले.
राजा रवी वर्मा यांना आधुनिक भारतीय कलेचे जनक अशी उपाधी दिली गेली.
त्यामुळेच आधुनिक भारतीय कलेचे जनक म्हणून त्यांना नावाजले जाते.
लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत, असे म्हणतात. पण या दोन्ही देवतांना चितारून राजा रवि वर्मा यांनी ही उक्ती खोटी ठरवली. एवढंच नाही, तर अखेरपर्यंत या दोघी त्यांच्याकडे सुखेनैव नांदल्या. राजा रवि वर्मा यांना वयाच्या ५६ व्या वर्षी त्यावेळचा सर्वात मोठा सन्मान ‘केसर-ए-हिंद‘ देण्यात आला. हा सन्मान म्हणजे आजचा भारतरत्न असा मानला जातो. हा सन्मान पटकविणारे राजा रवि वर्मा पहिले कलाकार होते. राजा रवि वर्मा यांचा मृत्यु २ ऑक्टोबर १९६० मध्ये झाला.
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
Raja Ravi Varma information Biography in Marathi
राजा रवि वर्मा यांची माहिती मराठी
Leave a Reply